होलीकेला होळीच्या शुभेच्छा!!!

काय वर्णन करावे त्या होलीकेचे! समस्त देशावर जिचा पहिला हक्क आहे. अरे चुकले, जिचाच फक्त हक्क आहे. अशा आदरणीय, महान! होलीका यांना माझा हात, पाय, अजून काय असते साष्टांग दंडवत घालून होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तस् होळी तर गेल्या सात वर्षांपासून चालूच आहे. किती कृष्ण वैकुंठवासी झाले, हे त्या विधात्यालाच माहित. पण छान! असंच चालू द्या.

नक्कीच एक दिवस देशाची राख होईल. तोपर्यंत, आहेच आपले ‘आम कृष्ण’. होलीकेच्या मांडीवर बसून नाहीतरी अजून वेगळे काय होणार? मला या गोष्टीवर मनापासून विश्वास आहे की, होलीका देशाला ‘इतिहास’ बनवणार. पण हे घडलं तरी तो निष्पाप ‘कंस’ या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ असेल. त्यावेळेसही तो मी निर्दोष आहे हेच ‘वाचून’ दाखवेल. त्या वेड्या ‘कृष्णाजीपंत’ प्रमाणे नाही. शाळेत तोंडी परीक्षेला किंवा होणाऱ्या वकृत्व स्पर्धेला मलाही अस ‘वाचून’ दाखवता आले असते तर, माझा एकदा तरी नंबर आला असता. ते जाऊ द्या, महान, हेल होलीके! आम्हा वेड्या आणि मुर्ख आम कृष्ण लोकांची एकच या दिवसाप्रकरणी विनंती आहे. अस, थेंब थेंब अमृत पाजून मारण्या ऐवजी एक घाव आणि अनेक तुकडे करून टाक. म्हणजे मरतांना अशी तडफड होणार नाही.

लहान तोंडी मोठा घास घेतो आहे. परंतु एकदाचे काय ते पेट्रोलचे, दुधाचे आणि ज्या वस्तू ‘आम कृष्ण’ला हव्या असतात त्यांचे भाव वाढून टाका.  म्हणजे, कस नेहमी आधी किती स्वस्ताई होती, असा शब्दच फुटणार नाही. त्यामुळे एकतर देशाचा ‘इजिप्त’ होईल. नाहीतर आम्हीच ‘ममी’ होवून जाऊ. लिटरचे भाव वाढवण्यापेक्षा मिलीमीटरचे भाव वाढवा. आणि धान्य तोळ्याने विकायला सुरवात करा असा वटहुकूम काढा. पगारातून कर दहा -वीस टक्के घेण्यापेक्षा, पगारातील दहा-वीस टक्के रक्कम द्या. म्हणजे दहा राजा येऊन गेले तरी घोटाळ्यांचा ‘दुष्काळ’ पडणार नाही. आणि पडूही नये.

देशाचा खजिना फक्त आणि फक्त होलीकेसाठी आणि तिच्या लाडक्या बाबासाठी आहे. नाहीतरी होलीकेचे मिस्टर यांनी दीड हजार ‘दमडी’ स्वीस बँकेत ठेवला आहे. तो तसाच पडून आहे. तो वाढायला नको? ते काही नाही. महान, परम प्रतापी होलीके सरकार वाचवण्यासाठी चाळीस कोटी खूप लहान रक्कम आहे. पुढे जावून त्या दुष्ट आणि नीच विरोधी पक्षांनी अभद्र ‘अविश्वास प्रस्ताव’ आणला तर त्यावेळी अख्खी संसद विकत घ्यायला किती पैसे लागतील याचे गणित आत्ताच सोडवावे लागेल. त्यासाठी ह्या होळीच्या दिनानिमित्ताने शुभारंभ करायला हरकत नाही. होलीका तुम आगे बढो, आम्ही तुझ्या चपला ‘उचलू’. आणि हव तर तुलाही उचलू. देशातील सर्व बाळ आणि आबाळ कृष्ण तुझ्या चपलेशीच आहोत. तुझ्यासाठी आमच्या जमिनी आदर्श घोटाळ्यात जावोत. आमचा ‘कर’ भविष्यातील फोर जी, फाईव्ह जी साठी वापर.

तोच कर तू आमच्या वस्तूंवर लादून आम्हाला आम्ही अजूनही ‘पारतंत्र्यात’ असल्याची जाणीव करून दे. आम्ही ‘श्री’कृष्ण नसून गुलाम कृष्ण आहोत याची जाची जाणीव आम्हा वेड्यांना करून दे. आणि हेही त्या निष्पाप ‘कंसा’ला कळू न देता. पुन्हा एकदा सर्व ‘आम कृष्ण’, आम राधा, आम यशोदा आणि गोकुळातील सर्व गोप्या आणि गोप्या परिवाराकडून होलीके, होळीच्या तुला खूप खूप शुभेच्छा!!!

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s