राजे

एक माणूस सिंहासारखा. एक राजा पहाडासारखा. त्याच आयुष्य म्हणजे एका स्वातंत्र्याची विजयगाथा. तो माणूस पण राष्ट्रासाठी देव. त्याचे मोठेपण, त्याची दूरदृष्टी. त्याच्या योजना. त्याची शून्यातून सर्वस्व उभे करण्याची ताकद. त्या महान व्यक्तीची आज जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या एकूणच महान शौर्यगाथा भरलेल्या जीवनाचा आढावा माझ्यासारख्या कसपटाला प्राप्त होणे हे अनमोल भाग्य.

परमेश्वराने ज्या लोकांच्या भाळी गुलामी लिहिली. त्यांना राजांनी स्वराज्याची देणगी दिली. हे स्वराज्य! हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. महाराष्ट्र राजांमुळे लढला, मर्दुमकी दाखवली. स्वतःची ताकद! स्वतःची हिम्मत. मर्द मराठा अटकेपार झेंडा रोवण्यात यशस्वी झाला. त्या राजाची आज जयंती. शत्रू अनेक होते. स्वकीय आणि परकीय. दोघेही स्वराज्यावर उठलेले.बलवान शत्रूची ‘शकले’ केली. काय वर्णावा तो आयुष्याचा प्रवास. एक धूमकेतू! एक वादळ. ज्या वादळाच्या वेगापुढे सगळ्या शाही हादरून गेल्या.  आणि स्वराज्य निर्माण झाल.

ते राज्य होत राजांच. शिवाजी महाराजांच. ते राज्य होत रयतेच. आकाशात मुक्त भरारी घेणाऱ्या त्या मुक्या पक्षाचं. गोठ्यातल्या गायीच. शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच. गोर गरीब जनतेच. त्याच्या राज्यात न होती दडपशाही. ना होती आक्रोशाची घंटा. तो राजा होता. कदाचित या देशाच्या इतिहासातील एकमेव राजा, ज्याचे राज्य अजूनही ह्या स्वराज्यातील रयतेच्या मनावर आहे. राजे अजूनही आहेत. आणि स्वराज्य देखील. ह्या वाढणाऱ्या अत्याचाराचा फडशा नक्की पडेल. या पापशाहीला यमसदनी धाडण्याचे, इथल्या भ्रष्ट राज्यकर्त्यांची मुंडकी नक्की धडावेगळी होतील.

राजांची तलवार नक्की म्यानातून निघेल. पुन्हा हिंदवी स्वराज्य सूर्याच्या लख्ख प्रकाशाप्रमाणे उजळून निघेल. हा गडद झालेला अंधार दूर होईल. राजांचा मापदंड आणि न्याय होईल. रयत पुन्हा सुखी होईल. राजांचा महाराष्ट्र मर्द आहे. सध्याला आजारी माणसाप्रमाणे जमिनीवर लोळत आहे. पण तो उठेल. हर हर महादेवाची आरोळी पुन्हा ठोकली जाईल. सूर्याच्या तेजाप्रमाणे फडकणारा भगवा पुन्हा तेजाने फडकेल. राजांचे आदर्श आणि या भूमीत मिळालेला श्वास, हजारो जन्मांचे मिळालेले भाग्य. ते कसे वाया जातील? महाराजांना, छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुजरा!

Advertisements

One thought on “राजे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s