जय महाराष्ट्र!

जय महाराष्ट्र! आज मी या ब्लॉग मधील शेवटची नोंद ‘खरडतो’ आहे. मला समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. ब्लॉग ‘मी’ विषया भोवती फिरत होता. मुळात ‘मी’ हाच एक विषय होता. प्रत्येक वेळी ‘मी’ विषय माझ्याबद्दल होता. माझ्या प्रत्येक गोष्टी माझ्या पुरत्याच होत्या. थोडक्यात, एकटाच ‘ओनर’ होतो. परंतु, आता ‘भागीदारी’ झाली आहे. ‘मी’ चे पन्नास टक्के शेअर परवा मी एका व्यक्तीला दिले आहेत. त्यामुळे आता ‘मी’ माझा राहिलेलो नाही. थोडक्यात स्टेटस ‘सिंगल’चे ‘एंगेज्ड’ झाले आहे. त्यामुळे आता इथेच थांबणे योग्य राहील.

पुढे जावून स्टेटस ‘मॅरीड’ होईल. मला फक्त अस म्हणायचे आहे की, माझ्या प्रत्येक गोष्टीवर अगदी मनावर सुद्धा आता त्या व्यक्तीचा हक्क आहे. तुम्हा सर्वांमुळे माझ्या जीवनाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे एक चांगला मार्ग दिसला आहे. खर तर या ब्लॉगला शोभा तुम्हा सर्वांमुळे आहे. ज्या गोष्टी घडल्या. ज्या गोष्टी मी करू शकलो त्यात सर्वांचा पाठिंबा खूप महत्वाचा होता. येणाऱ्या प्रतिक्रिया माझ्यासाठी नेहमीच मार्गदर्शक होत्या. अनेकांना माझ्या ब्लॉगमुळे जाम इरिटेट झालेलं. पण हरकत नव्हती, माझ्या चुका माझ्या लक्षात आणून देणंही तितकंच महत्वाच होत. अनेकांना मी माझ्या गोष्टी अस शेअर करणे चुकीचे वाटलेले. परंतु विषय ‘मी’ असल्याने कदाचित तस् जाणवलं असेल.

असो, शेवटी फार पकवत नाही. मी यापुढे नोंदी जरी टाकणार नसलो तरी यदाकदाचित एखाद्या नोंदीवर प्रतिक्रिया द्यावीशी वाटली तरी हरकत नाही. आणि इमेलद्वारे मी तसा प्रत्युत्तर देण्याचा माझा प्रयत्न नक्कीच राहील. आणि मी ब्लॉग देखील काढून टाकणार नाही. एखादा नवीन विषय असलेला ब्लॉग मी सुरु करण्याचा विचार करतो आहे. पण त्यात ‘मी’ हा विषय नसेल. सध्याला तरी माझ फेसबुकचे खाते मी वापरतो आहे. तुम्हा सर्वांचे सदैव नम्रपणे तिथे स्वागतच असेल. आणि मला आवडेलही. तुमच्या सर्वांच्या या मदतीमुळे ब्लॉगबाळ खूप धावला अगदी सव्वा दोन लाखाच्या घरात पोहचला. तो थकला वगैरे नाही. फक्त वेळ आणि आलेली परिस्थिती पाहता आता इथे थांबणे योग्य राहील.

बाकी या मराठी भाषेची सेवा करण्याचे मिळालेले भाग्य. या भूमीत आणि इतक्या चांगल्या लोकांचा मिळालेला सहवास कधीही विसरणार नाही, याची खात्री देतो. परमेश्वर, तुम्हा सर्वांना चिरायू करो. मान, शक्ती आणि सुखासमाधानाचे जीवन देवो. तुम्हा सर्वांच्या इच्छा सदैव पूर्ण करो. ही त्या परम विधात्या परमेश्वराला प्रार्थना. जय महाराष्ट्र!!!

Advertisements

19 thoughts on “जय महाराष्ट्र!

 1. अभिनंदन!!! प्रत्येकच चांगल्या गोष्टीला शेवट हा असतोच. काही दिवस विश्रांती घेतल्यावर पुन्हा सुरु कर लिहिणं.. पण स्वतःबद्दल नाही, तर इतर ललीत लेखन. शुभेच्छा!

 2. हेमंत, तुझ्या पारदर्शी, साध्या शब्दांची नेहमीच आठवण राहील.
  या पुढेही, अनेक कसोटीच्या प्रसंगांत, खंबीर, शांत मनाने निर्णय घेत जा. आमच्या अनेक शुभेच्छा!

  1. हा हा हा 😀 Perfect said, BTW हेमंत ‘मी’ या विषयाव्यतिरीक्त देखील तू खूप काही लिहितोस आणि वाचायला देखील चांगले वाटते, पर्सनल लाईफ लिहिण्या बद्दल वहिनीनी डोस दिला असला तरी तुझे इतर लिखाण चांगले आहे, ते जरूर लिहीत रहा…. Good Luck

 3. अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!
  “मी” ह्या विषयासंदर्भात जर लिहायचे नसेल तर तु आता इथुन पुढे “आम्ही” बद्दल तर लिहु शकतोस ना रे ? 😉
  इथुन पुढे येणारे अनुभव खरेतर फार मजेशीर/वेगळे असु शकतील..
  – योगेश

 4. मित्रा चांगल्या गोष्टी नेहमी चालू ठेवल्या पाहिजेत
  तू खाजगी गोष्टी लिहाव्यात अशी कोणाचीच मागणी नाही……
  general topics varache लिखाण तू चालू ठेऊ शकतोस……….
  परत एकदा विचार कर …….
  🙂

 5. Hey Hemant,
  I have been reading your blog since you started it, but really never replied to any of your posts.
  So finally you got your life partner as per your wish.
  Congrats.. man..really nice to see you are getting married.
  Wish you a very happy married life and a very successful career.

  Will miss your blog posts.
  I am sending friend request on facebook. Pls accept it..

  Congrats again man.

 6. नव्या इंनिंग साठी शुभेच्छा! लवकरच नवीन ब्लॉग च्या रूपाने अवतरा… कारण तुझ्या सहजसुंदर, सोप्या पण परिणामकारक लिखाणाची सवय झाली आहे ना…
  मी पण निगडी मधेच राहतो, कधी तरी भेटू…

 7. हेमंता,
  लग्न ठरल्या बद्दल हार्दिक अभिनंदन. तुझ्या पुढील आयुष्यासाठी आमच्या सर्वांच्या हार्दीक शुभेच्छा. हो तुझ म्हणण खरय आता तुझा बराच वेळ “तीकडे” पण द्यावा लागणार !
  आपण फोनवर भेटतच राहू.

  अजय.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s