आयटीतील म्हणी

  • मायक्रोसॉफ्ट तिथ बग.
  • पीएम आला आणि लेक्चर देवून गेला.
  • आपला तो टास्क दुसऱ्याचा तो टाईमपास.
  • रात्र थोडी टास्क फार. Continue reading
Advertisements

अण्णा यांस

‘प्रौढ’ प्रताप पारनेर, एनजीओ कुलावतंस, राळेगण प्रतिपालक, उपोषणाधीश्वर, अण्णांना हजारदा दंडवत.

इनंती इशेष, आपली ती परवाची पत्रकार परिषद ऐकली. ऐकून काळजाचा ठोका चुकला. म्हणून पत्राचा खटाटोप केलाय. तुम्ही बाळासाह्यबास्नी लई वंगाळ बोललात. म्हंजी कस हाय माउली, त्या रामलीला मैदानावरचा तो तुमच्यातला अचल, निश्चल सूर्य पाहिल्यावर. अख्खा देश त्या सूर्याच्या प्रकाशाने न्हाहून गेला. दहा-बारा दिवस का असेना. तुमच्यामुळ आम्हाला खरी ‘लोकशाही’ पाहायला मिळाली. माउली, तुमच्या उपोषणान त्या संसदेला नमवल. एक देशाची वज्रमूठ बनली. आणि या सरकार, प्रसासन आणि भ्रष्टाचाराबद्दल मनातील चीड, राग मोकळा करायचा मार्ग मिळाला. तुम्ही म्हटलं अगदी तसाच्या तस देशान केल. आणि म्या सुद्धा. Continue reading

पुन: हरी ब्लॉग

कशी सुरवात करू तेच समजत नाही आहे. अनेक दिवसांनी, पुन्हा: एकदा ब्लॉग सुरु करतो आहे. खर तर काय बोलावं, आणि कशी वाक्यरचना करावी यातच घोळ होतो आहे. खूप दिवसांनी बोलतोय म्हणून कदाचित अस घडत असेल. पण, मनात आनंद मात्र नक्की होतोय. मध्यंतरी मी, एक-दोन ब्लॉग सुरु करून पाहण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात मन नाही रमलं. आजकाल कामामुळे वेळ काढणे म्हणजे फारच अवघड बाब बनली आहे. पण, ब्लॉग सुरु करण्याची ‘इच्छा’ फार डोकावत होती. चला, आतापासून पुन्हा हरी ब्लॉग.
Continue reading