बेगरफिशर

कसला गहजब चाललाय? अस काय झालं की, ढग कोसळल्याप्रमाणे सगळीकडून आरडाओरड चालू झाली? आम्ही त्या बिचाऱ्या ‘बेगरफिशर’ला मदत करायची काय ठरवली की, सर्वच उठून बोलायला लागले. बघा कस आहे की, आधी सरकार काही करत नाही म्हणून ओरडायच.. आणि करतो म्हटलं की, तरीही टाहो फोडायचा. दुसरा काम धंदा नाही काय? तो गरीब ‘विजय ढोल्या’ आमच्या दरबारी शरण आला. शरण आलेल्याच रक्षण करणे हा आमचा धर्मच आहे. तसं आम्ही ‘निधर्मी’ आहोतच.

विरोधकांच एक वेळ ठीक आहे. कारण त्यांच्याकडे दुसर काही कामच उरलेलं नाही. पण, मँगो मॅन? तुम्ही का चीडचीड करता? चला तुमच्या शंकांचं निवारण करूयात. तुमच म्हणणे अस आहे की, कर्जबाजारी शेतकऱ्यांना आम्ही कधी काहीच मदत केली नाही. आणि ‘बेगरफिशर’ला अस ताबडतोप हालचाल करतो आहोत. पहा, शेतकरी कर्जबाजारी असला तरी त्याच्याकडे शेती, जनावरे असतात. पण इकडे बिचाऱ्या ‘बेगरफिशर’कडे एकही स्वतःचे विमान नाही. साधी इंचभर जागा सुद्धा नावावर नाही. मग मला सांगा, खरा गरीब कोण?

बर, दुसरी शंका अशी की, जीवनावश्यक गोष्टींची भाववाढ करतांना आम्ही काहीच मदत केली नाही. कर्जावर व्याजदर वाढवले. तर पहा अस आहे की, जेवढी भाववाढ केली आहे. तितकी पुढे आम्ही करणाऱ्या भाववाढीच्या मानाने खूपच अत्यल्प आहे. पहा, काही दिवसानंतर पेट्रोल मिलीग्रॅम मध्ये मिळेल. कदाचित पाचशे रुपये लिटर मागे लागतील. आणि हजार रुपये गॅसला लागतील. आणि भाज्या आठशे रुपयेच्या आसपास जातील. मग मला सांगा, त्यामानाने आताची भाववाढ किती अत्यल्प आहे. उगाचंच आपली चीडचीड. मान्य आहे आम्ही व्याजदर वाढवले. आणि लवासाला तिकडे सुट दिली.

अहो! मागीलच उत्तरात हे उत्तर लपल आहे. पुढे वाढणार्या व्याजदराच्या मानाने आता कमीच आहे. उरला प्रश्न लवासाचा. आता जमीन हडपली. निसर्गाची हानी केली. सगळ मान्य. पण जाणता राजानेच केलेलं हे काम आहे. काहीतरी त्यामध्ये हित असेल म्हणूनच केल असेल ना! विकास समजा. कुणाचा हे मात्र विचारू नका. चला झालं ना समाधान. बिचाऱ्या ‘बेगरफिशर’ला मदत करणे काय गुन्हा आहे? ढोल्यांच्या विजयाचा दारूचा गुत्ता आहे. म्हणून काय झालं. देशाची ती सुद्धा एक शान आहे. म्हणूनच तर आमचे विरोधक नाही म्हणत का, ‘सरकारचा हात बेगरफिशरच्या साथ| आणि उरलेल्यांच्या कमरेत लाथ||’ कालच आमच्या बाबा राहुने बालदिन काय मस्त साजरा केला नाही का? 

सियावर कह गये, एक दिन युपीए राज आयेगा|
कसाब खायेगा बिर्याणी, अन्ना भूख रह जायेगा ||

शोक मत कर ए पगले, उस दिन होगा ऐसा मेल|
न रहेगा कोई मंत्री ऐसा, जो न गया हो तिहार जेल||

Advertisements

3 thoughts on “बेगरफिशर

  1. अर्रर, जबऱ्या
    एक वाचनात आलेलं – A tale of two Rahuls. One puts his head down, fights hard, but never gets noticed. Other just raises his hand and India cheers.

  2. शेवटच्या चार ओळी म्हणजे कहर आहे.
    २०१४ ची आतुरतेने वाट पाहत आहे.
    एअर इटलीया मधून ही ब्याद स्वदेशी पाठवून देऊ.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s