स्वतःवर ताबा

स्वतःवर ताबा ठेवणे, कदाचित जगातील सर्वात अवघड गोष्ट आहे. म्हणजे, सकाळी साखर झोपेतून उठतांना ते रात्री विचार चक्रे थांबवून शांत झोपण्यापर्यंत स्वतःवर ताबा ठेवण्याची कसरत करणे फारच जिकीरीचे काम असते. कदाचित, काही गोष्टीत स्वतःवर ताबा ठेवणे काहींना सहज शक्य असेल. पण, आवडत्या गोष्टी करण्याची मुभा असून देखील एखाद्या विशिष्ट कारणामुळे ती गोष्ट न करण्याचे बंधन घालणे खुपच कठीण असते. आता फक्त स्वतःवर बंधन घालणे, याचाच अर्थ स्वतःवर ताबा असणे असा नव्हे.

शाळेत जाणाऱ्या एखाद्या मुलाला जेवढा अभ्यासाचा कंटाळा येतो तेवढाच कंटाळा विकेंडच्या दिवशी ‘काम’ करणाऱ्या एखाद्या कामगाराचा असतो. खर तर ‘कंटाळा’ हा एक वेगळा विषय आहे. अगदी साधे उदाहरण, वाहन चालवतांना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे. हेही फार अवघड. एखादा वाहन ‘वीर/वीरांगना’ भुर्रकन कट देवून अथवा कुत्सित नजरेने पुढे जाते. त्यावेळी, स्वाभाविक घडणारी प्रतिक्रियेवर ताबा ठेवणे तेवढेच कठीण असते. वाहनाचा वेग वाढवण्याचा अथवा वेगात वाहन चालवण्याचा मोह आवरणे. हे देखील स्वतःवर ताबा असण्याचे एक लक्षण आहे.

आता स्वतःवर ताबा ठेवण्याचा काय फायदा? या प्रश्नाचे उत्तर ताबा ठेवण्यानंतरच कळू शकते. एखाद्या न पटणाऱ्या मुद्यावर. किंवा एखादा न पटलेला विषयाकडे पाहून वाढणारा अथवा येणारा राग. आणि त्यावेळी स्वतःवर ताबा ठेवण्यासाठी लागणारी मेहनत फारच अवघड असते. एखादी न पटणारी गोष्ट दुर्लक्ष करणे. ही देखील एक खूप मोठी कला आहे. स्वतः शांत राहणे. अथवा कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा तोल ढळू न देणे. हे स्वतःवर ताबा असल्याचे लक्षण आहे. परंतु याचा अर्थ, एका गालात चापट खाल्ल्यावर दुसरा गाल पुढे करणे. किंवा स्वस्थ बसणे असा नव्हे. अन्याय सहन करणे याचा अर्थ स्वतःवर ताबा आहे असा देखील मुळीच नव्हे.

स्वतःवर ताबा ठेवल्याने कदाचित वेगात वाहन चालवण्याची मजा मिळणार नाही. परंतु, वाचणारे पेट्रोल आणि त्याहून पुढे जावून वेगाच्या भरात घडण्याची शक्यता असलेला अपघात निश्चितच टळू शकतो. न आवडणारे विषय किंवा न आवडणाऱ्या व्यक्तीं विषयी किंवा त्यांच्या वागण्याविषयी स्वाभाविक उमटणारी ‘प्रतिक्रिया’ देण्याची पद्धतीवर ताबा ठेवल्यास भविष्यात त्याचा निश्चितच फायदा होवू शकतो.

हेही तितकेच खरे की, स्वतःवर ताबा ठेवणे अथवा नियंत्रण ठेवणे, बोलण्या इतके किंवा फुकाचे सल्ले देण्याएवढे सोपे नक्कीच नाही. काहींना कदाचित काही विषयात स्वतःवर ताबा मिळवणे शक्य झाले असेल. परंतु, स्वतःवर संपूर्ण ताबा मिळवणे हे हिमालयात तपश्चर्या करण्या इतकेच कठीण काम आहे.

Advertisements

4 thoughts on “स्वतःवर ताबा

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s