कलाम का लांब?

काय बोलावं? सांगा आता कुणाला सांगाव? आता ‘अपेक्षा’ कुणाकडून करावी? ‘सोनिया’च्या सरकारने महागाईचा नांगर फिरवला. घोटाळे, करवाढ, भाववाढ!! त्यात आमच्या ‘ताई’ची प्रतिभा काय वर्णावी? स्वतःच्या पोराबाळांनापासून नातवंडांनापर्यंत सगळ्यांकडून ‘जगाचा भूगोलाचा’ अभ्यास गिरवून घेतला. परवाच्या निवडणुकीत पुत्ररत्न कोटींचा दानधर्म करतांना पोलिसांना ‘घावले’ म्हणे! काय महिमा म्हणावा घराण्याचा! कुमारी ‘मीरा’ आपल्या लाडक्या ‘कान्हाला’ शोधण्यात कोटी दस कोटी अर्पण केलेत. कुणास ठाऊक ‘कान्हाचे’ दर्शन घडले की नाही! आता याच्यापुढे कुणी किती आणि कसे उपकार केलेत याच वर्णन करू??

त्यात ‘कलाम’ साहेब तुम्ही अशी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत साभार ‘माघार’ घेऊन उपकाराचा कळसच केला. माहिती आहे! मजसारख्या बापड्याला तुम्हाला बोलण्याचा काय तो अधिकार? पण, साहेबानु तुम्हीच आमच्या देशाचे ‘राष्ट्रपती’ व्हावे, अस साऱ्या देशाला वाटते. मनापासून सलाम करावा अस व्यक्तिमत्व. तुमचा रुतबा, तुमचा अधिकार आहे तो. त्या जागेला शोभणारे व्यक्तिमत्व आणि मुख्य म्हणजे कर्तुत्व आहे. नाहीतर ते बंगाली बाबूमोशाय, काय त्याचे कर्तुत्व तर, चाळीश वर्षे ‘गांधी’ घराण्याची सेवा. आणि देशाचा कारभार कसा चाललायं हे दिसतंच आहे. बाबूमोशाय बंगालीमधून इंग्लिश की इंग्लिशमधून बंगाली बोलतात हे अजूनपर्यंत न सुटलेल कोडं. आणि दुसर ते पवारांच ‘पिल्लू’. इतके दिवस कुठ होत देव जाणे. अचानक निवडणुकीच्या तोंडावर ‘रेस’मध्ये.

देशाला तुमच्या नेतृत्वाची आणि मार्गदर्शनची गरज आहे. नाहीतर इतके दिवस ‘रडगाणे’ चालू होते. पुढेही चालू राहील. माहीत नाही हे अजून किती दिवस चालणार. तुम्हीच एकमेव आशास्थान आहात. ममताजी बद्दल खरच अभिमान वाटतो. तुम्ही कृपा करून, पुन्हा फेरविचार करावा. कधी नव्हते ते इतके शल्य, इतकी अस्वस्थता आज तुमच्या या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील ‘माघारी’मुळे जाणवते आहे.

Advertisements

3 thoughts on “कलाम का लांब?

  1. ” ‘कलाम’ साहेब तुम्ही अशी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत साभार ‘माघार’ घेऊन उपकाराचा कळसच केला. ”
    लेख आवडला.

  2. Deshala “MAHAGAI, DARIDRYA, BHRASHTACHAR, BEKARI, HINSACHAR, ANAITIKTKATA, ASURKSHITATA, ASAMAJIKATA ” ahsa anek dushta chakrat geli 60 varshe adkavoon swatachi poli bhajun khanarya Gandhi Gharanyacha jo paryant ant… hot nahi to paryant apan “PANTPRADHAN & RASHTRAPATI” ya mhatvanchya padanvar ashi “NISHKRIYA” netemandali anubhavat rahanar……..Dheekkar…….aso ya congress gharanyala matdan karnarya “shandh ani nirlajja “matadarancha…….

    Itar pakshana nam matra sandhi vagalata …ya shandha janatene sandhich dili nahi……tyachya parinamanchi phale sarv janatela bhogavi lagatat..tasech matadan na karnarya jante mule dhekhil tyacha parinam samajal ashi nishkriya netemadali nivadoon alyamue hoto.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s