सुपर अचिव्हर

कोण म्हणते ‘अंडर अचिव्हर’? ‘टाईम’पास करू नका. तुम्ही तुमच्या एवढ्या टायमात जे करू नाही शकला ते, आमच्या एकट्या ‘सिंग’ने करून दाखवले. उद्या कदाचित जग ‘ओबामा’ला विसरेल पण ‘सिंग’ यांना विसरणे शक्य नाही. हो! खरंच.. काय केल काय त्या ओबामाने? एक लादेन.. बस्स. आणि म्हणे, गांधीजींचा ‘अवतार’. नावात सिंग असून देखील अजून कसाब आणि गुरु जिवंत आहेत. तस् म्हणाल तर ही सुद्धा एक अचिव्हमेंट नव्हे काय? Continue reading

Advertisements

आदर्श देशा

देशाने आदर्श घ्यावा अस ‘महान’ राज्य. राष्ट्रीय नेत्यांना लाजवेल असे या राज्याचे ‘आदर्शवादी’ नेते. मी तर म्हणतो, या आदर्शवत राज्याचा कारभार हाकणाऱ्या नेत्यांना, या सरकारला आणि विशेषतः सरकारी कर्मचारी, नाही चूक झाली. या सरकारी ‘जावई’बापूंना ‘भारतरत्न’ कमी पडेल म्हणून, ‘आदर्शरत्न’ पुरस्काराने सन्मानित करायला हवे. खर तर, या महान आणि अनमोल नेते, जावई बापूं मंडळींचा महीमा माझ्यासारख्या बापुड्या ‘आम आदमी’ काय वर्णावा?

Continue reading

अनुभव

खर तर ‘केलेल्या चुका’चे गोंडस समानार्थी शब्द कोणता असेल तर तो ‘अनुभव’. म्हणजे, जसे एखाद्या औषधाच्या गोळीला बाहेरील आवरण साखरेप्रमाणे गोड असते तसे. प्रत्येक जण आयुष्यात नित्यनियमाने ‘चुका’ ह्या करीतच असतो. त्यातूनच तो शिकतो. काय ‘नाही’ केल्यावर गोष्ट ‘अचूक’ बनते. हे कळल्यावर तो ‘अनुभवी’, ‘कुशल’ वगैरे बनतो. ‘चुकी’ घडल्यावर जे शिकायला मिळते त्यालाच ‘अनुभव’ म्हणतात.

Continue reading

भ्रष्ट्रमेव जयते

हाईला! तू तू.. तुम्ही नाव पाहून गडबडला? नाही नाही.. ‘शो’च नाव नाही बदललं. तो कार्यक्रम असणार. रविवारी! होता है! होता है! आणि होणार. हा त्याच पद्धतीचा, पण थोडा, वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा. चिंता करू नका अरेs ‘आल ईझ हेल’. मला ओळखले ना? मी आपल्या सर्वांचा लाडका ‘गरीब खान’. या कार्यक्रमाचा होस्ट. या निर्दयी, निष्ठुर आणि शॉर्ट टर्म मेमरी लॉस जनतेच्या त्रासाने त्रासलेल्या नेत्यांच्या ‘मन’मध्ये काय चाललेलं. त्यांच्या ‘महान’ आणि ‘आदर्श’ कृत्यांच्या आढावा त्यांच्याच तोंडून. त्यांनी केलेल्या  विकासाच्या (स्वतःच्या) आणि त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी. मला खात्री आहे, हा माझा नवीन ‘शो’ तुम्हा सर्वांना नक्की आवडेल. चला, एका ब्रेकची वेळ झाली. Continue reading