अनुभव

खर तर ‘केलेल्या चुका’चे गोंडस समानार्थी शब्द कोणता असेल तर तो ‘अनुभव’. म्हणजे, जसे एखाद्या औषधाच्या गोळीला बाहेरील आवरण साखरेप्रमाणे गोड असते तसे. प्रत्येक जण आयुष्यात नित्यनियमाने ‘चुका’ ह्या करीतच असतो. त्यातूनच तो शिकतो. काय ‘नाही’ केल्यावर गोष्ट ‘अचूक’ बनते. हे कळल्यावर तो ‘अनुभवी’, ‘कुशल’ वगैरे बनतो. ‘चुकी’ घडल्यावर जे शिकायला मिळते त्यालाच ‘अनुभव’ म्हणतात.

थोडक्यात ‘सिनिअर’ हा ‘सिनिअर’ असतो. प्रत्येक बाबतींमध्ये, ‘चुकांमध्ये’ सुद्धा. एखादा व्यक्ती ज्यावेळी ‘अनुभवाचा’ बढेजाव करतो. त्यावेळी न कळत तो तितक्याच प्रमाणात केलेल्या ‘चुकांची’ कबुली देत असतो. अनुभव प्रत्येकवेळी नव्याने भेटत असतो. परंतु, यातून आपण काय बोध घेतो, हे महत्वाचे. नाहीतर, फक्त अनुभवाची पोतडी वाढते. आणि त्याच्या ‘गर्वाचे’ ओझे सांभाळत कधी ‘अपमानाची’ ठेच लागते. होणाऱ्या वेदनेची दाह ‘मुकामार’प्रमाणे असतो. दिसतही नाही. आणि सहनही होत नाही.

One thought on “अनुभव

  1. लघुभागवतामृतासहित भक्तीभावसारनाथकृपाप्रमाणित सर्वग्रंथांकित थोडीफार माहिती येथे नक्की लाभते….
    http://hi.bharatdiscovery.org/india/%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s