आदर्श देशा

देशाने आदर्श घ्यावा अस ‘महान’ राज्य. राष्ट्रीय नेत्यांना लाजवेल असे या राज्याचे ‘आदर्शवादी’ नेते. मी तर म्हणतो, या आदर्शवत राज्याचा कारभार हाकणाऱ्या नेत्यांना, या सरकारला आणि विशेषतः सरकारी कर्मचारी, नाही चूक झाली. या सरकारी ‘जावई’बापूंना ‘भारतरत्न’ कमी पडेल म्हणून, ‘आदर्शरत्न’ पुरस्काराने सन्मानित करायला हवे. खर तर, या महान आणि अनमोल नेते, जावई बापूं मंडळींचा महीमा माझ्यासारख्या बापुड्या ‘आम आदमी’ काय वर्णावा?

यांच्या ‘आदर्श’ कृत्यांचे वर्णन करायला सीबीआयला दहा हजार पाने लागली. त्यांच्यासमोर माझा हा एक ‘ब्लॉग’ म्हणजे सूर्यासमोर ‘काजवा’. तो सीबीआयचा न्यायालयात दाखल केलेल्या ‘आदर्श’ कृत्यांचा प्रतापगड पाहून मन भरून आले. खरच हे पाहून ‘आदर्श तो झाकी है| पुरा हिमालय अभी बाकी है||’ असे आपसूक मुखात येते. महिन्याभरापूर्वी बाजूच्या पिंपरीत विहिरीभर ‘गांजा’ सापडला होता. आणि परवा म्हणे ‘शे दीडशे’ एकरावरील लाखो रुपयांचा मुरूम चोरीला गेला. दीडशे एकर परिसर कुठे तर आमच्या पिंपरी चिंचवडच्या ‘प्राधिकरणात’. काय आदर्श वर्णावा आणि काय नको अस झालंय बघा मला.

‘लवासा’चा आदर्श निर्माण होतो न होतोच. पुण्याच्या आजूबाजूला अजून चार नव्या ‘लवासा’ला परवानगी देवूनही टाकली. याला म्हणतात ‘स्पीड’. याला म्हणतात ‘करून दाखवलं’. नाहीतर मुंबईची पालिका. अजून ‘खड्ड्यातच’. बर, होईल का अशी काम या विरोधकांना? ही अशी ‘मिशन इम्पोसिबल’ पॉसिबल करणारी टॉम क्रूझ मंडळी याच राज्यात सापडतील. तिकडे दिल्लीत ‘राष्ट्रकुल’चा घोळ बाहेर निघण्याची बातमी आली. आणि इकडे पुण्यात एक कंपनी अख्खी जाळून खाक. एकही हार्ड डिस्क शिल्लक राहिली नाही. पुढे जावून ही बातमी समजली की, ती कंपनी राष्ट्रकुलच्या व्यवहाराची नोंद ठेवणारी होती. बघितलंत! याला म्हणतात ‘आदर्श’ व्यवस्था. उगाचंच ‘राज’ इतर राज्यांचे गोडवे गातो.

आता परवाचीच गोष्ट घ्या ना. त्या दोन हंसांना आणि त्या एका ‘असोका’ला सीबीआय बोलाविणे धाडले तर, मंत्रालयाचे तीन मजले ‘खाक’. का तर कागदपत्रे होती ना! तस् आधी ‘आदर्श’ माहितीची आदर्श हार्ड डिस्क गायब झाली होती. आणि तशाच प्रकारच्या फायली गायब होण्याचे ‘आदर्श’ प्रकारही घडलेले. पण एवढे सगळे होवून देखील कुणीच ‘जबाबदार’ धरले गेले नाही. हे तर सोडाच, पण मुंबई हल्ल्यानंतर देखील कुणाला शिक्षा अथवा कारवाई झाली? कुणाची जबाबदारी? तर उत्तर ‘माहीत नाही’. या आदर्श राज्याच्या ‘आदर्श’ गोष्टींचे आदर्श अगदी पुराणात देखील सापडतील. किल्लारीचा भूकंपानंतर घडलेले ‘आदर्श’ व्यवस्थापन. ते कालच्या ‘तेलगी’ आणि आजच्या ‘आदर्श’पर्यंत. सोवळे आदर्श घालून दिलेले आहेत. त्यामुळे देशानेच नव्हे तर जगाने आदर्श घ्यावा असे राज्य. ‘महा आदर्श राष्ट्र’.

Advertisements

One thought on “आदर्श देशा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s