सुपर अचिव्हर

कोण म्हणते ‘अंडर अचिव्हर’? ‘टाईम’पास करू नका. तुम्ही तुमच्या एवढ्या टायमात जे करू नाही शकला ते, आमच्या एकट्या ‘सिंग’ने करून दाखवले. उद्या कदाचित जग ‘ओबामा’ला विसरेल पण ‘सिंग’ यांना विसरणे शक्य नाही. हो! खरंच.. काय केल काय त्या ओबामाने? एक लादेन.. बस्स. आणि म्हणे, गांधीजींचा ‘अवतार’. नावात सिंग असून देखील अजून कसाब आणि गुरु जिवंत आहेत. तस् म्हणाल तर ही सुद्धा एक अचिव्हमेंट नव्हे काय?

शेवटचा आम आदमी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कसाब आणि गुरूला आम्ही जिवंत ठेवणार, असा प्रणच घेतलाय सिंगने. आणि सर्वात मुख्य गोष्ट, ज्या अचिव्हमेंट मुळे जग सिंग यांना लक्षात ठेवेल. आणि ते म्हणजे ‘टूजी’. जगातील सर्वात मोठा ‘घोटाळा’ एकमेव, वन आणि ओन्ली सिंग यांच्या काळात घडला. आणि सन २००४-२०१२ च्या काळात ज्यांना कळू लागले असे प्रत्येक जण सिंग यांना विसरू शकत नाही. ही अचिव्हमेंटच आहे. आणि म्हणे ‘अंडर अचिव्हर’. टाईमपास करतात. सांगा ना! तुमच्या ओबामाने अस ‘लक्षवेधी’, तुमच्या भाषेत ‘अचिव्हमेंट’ काय केल?

आणि काय हो, ‘राजकीय नपुंसक’ काय म्हणता? सिंग यांनी आपली ताकद दाखवली तर काय घडेल, याचा तुम्ही विचारच करू शकत नाही. जरा राष्ट्रपतीपदाची निवडणूक होवून जाऊद्यात. मग डिझेलच्या भडक्याने तुम्ही होरपळून, काळे कोळसे बनाल. आधी पेट्रोलच्या चटक्यांना सहन करायची ताकद नाही. आणि आता.. मग एवढे सगळे असतांना सिंग अंडर अचिव्हर नव्हे तर सुपर अचिव्हर आहेत.

Advertisements

2 thoughts on “सुपर अचिव्हर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s