लिफ्ट

मला दोन गोष्टी बिलकुलही पटत नाहीत. एक म्हणजे ‘लिफ्ट मागणे’. आणि दुसरे ‘भीक मागणे’. दोन्हीही गोष्टी जरी वेगवेगळया असल्या तरीही साम्य आहे. रोज रस्त्याच्या कडेला हे ‘दीन’करराव हात दाखवत उभे असतात. का कुणास ठाऊक, मेहनतीचा कंटाळा येतो! की लागलेली सवय! दुसऱ्याच्या मदतीवर विसंबून राहतात. भीक मागणारे भिकारी जसे नशिबाच्या समोर गुढगे टेकून, आपला आत्मसन्मान गहाण टाकून दुसऱ्यांकडे ‘याचना’ करतात. तसे हे ‘लिफ्ट’वाले, आळसासमोर गुढगे टेकून, कोणी तरी लिफ्ट देईल या आशेने रस्त्यावर उभे.

बर चांगले धडधाकट. एकवेळ वयोवृद्ध आहेत, अपघातग्रस्त आहेत. तर बाजूने जाणारा आपसूकच मदतीला धावून जातो. हे बघाल तर, नुकतीच मिसरूढ फुटलेले. कधी कधी तर शाळकरी मुले सुद्धा , रस्त्याच्या कडेला हात दाखवत उभे असतात. बर, त्या रस्त्यावरून सिटी बसेसचा अभाव आहे. आजूबाजूला विरळ वस्ती आहे. अस असेल तर गोष्ट वेगळी. पण, हे बस स्थानकात उभे राहून तर कधी चौकात उभे राहून हात दाखवतात. हे असले ‘आळसकुमार’ पाहिले की तळपायाची आग मस्तकात जाते.

मदत मागणे म्हणजे काही गुन्हा नव्हे. हे मला मान्य आहे. पण देवाने चांगले दोन पाय, दोन हात आणि विशेष म्हणजे त्यावर एक ‘डोक’ फ्री दिले. अस असून देखील ते फक्त मोबाईलची गाणी बदलण्यासाठी किंवा आलेल्या मेसेजचा रिप्लाय देण्यासाठीच त्याचा वापर हे आळसकुमार करतात. असो!

Advertisements

7 thoughts on “लिफ्ट

  1. अशा मोबाईल गाणी एकण्यात दंग आणि भिक्षा मागण्यात गुंग व्यक्तीमत्वांच्या डोक्यात कसे रहायचे हेच तर शिकायचे असते आपल्या सुरक्षिततेच्या कारणास्तव

  2. http://www.esakal.com/esakal/20120618/4770879674613790708.htm
    लक्षात आले नसेल तर सांगतो की चीनि महामदोदयांनी इकडे वेळेवर जाहीर भेट देऊन चौथे महायुद्ध टाळले…

  3. अण्णा, अप्पा आणि तात्या… च्या घोळात पहिल्या कर्माप्पा लामांचे चक्षूसौदर्य न्याहाळण्यासारखे वाटल्याने तसेच भास आभास दुसऱ्या दलाई लामांना होऊ नयेत म्हणून अख्खे जग प्रयत्न करतेय त्यात त्याचा दुधाबरोबर प्रिंगाळीच्या खारीचा वाटा…

  4. बुकगंगा ने फेसबुक वर एक लेखक स्पर्धा ठेवली आहे, तिथे फेस बुक वर काही लोकं आपलं नाव लाइक करा म्हणून भिक मागत फिरताहेत.

  5. पोस्ट आवडली , पण सगळेच सारखे नसतात. काहीना परिस्थीती मुळे असे करावे लागते . सर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s