मुलगी झाली

एक गोड बातमी आहे. उशिरा सांगतोय, याबद्दल क्षमस्व! गेल्या महिन्यात, म्हणजेच नोव्हेंबरच्या दोन तारखेला दुपारी अडीचच्या सुमारास आमच्या घरी ‘कन्यारत्ना’चे आगमन झाले. बाळ आणि बाळाची आई दोघेही सुखरूप आहेत. बाळाचे दोन्ही आजी आजोबा जाम खुश आहेत. आणि बाळाचे बाबा बाळाच्या लीलात मग्न झाल्याने बोलायला उशीर झाला.

बस्स! याच्यापुढे मला अस, फॉर्मल बोलणे कठीण झालंय. जाम मस्ती चालू असते. त्यामुळे सगळा वेळ त्यातच जातो. चेहरा आणि हसणे आई प्रमाणे. बाकीच्या सवयी तिच्या बाबांप्रमाणे. खरच, गेले काही दिवस इतके सुंदर गेले आहेत की, कधी दीड महीना उलटला कळलेच नाही.

तिच्या सवयी असल्या मजेदार आहेत ना. म्हणजे झोपतांना दोन्ही हात वर करून झोपते. आणि दुध पितांना पहीलवान ज्या पद्धतीने दंड फुगवतो त्याप्रमाणे. आणि तिच्या आवडीची गोष्ट म्हणजे भिंतीवरील पंखा. म्हणजे तो दिसला की झालं. बाईसाहेब एखाद्या ध्यानस्थ स्वाध्वीप्रमाणे मग्न होतात.

मग जसा अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसला होता. तसा हिला पंखा. हे सगळंच मजेदार. मी देवाचा आणि माझ्या बायकोचा, दोघांचाही मनापासून आभारी आहे. एवढी ‘अनमोल’ भेट. खरंच, हा माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण आहे. आणि याक्षणी मी स्वतःला परिपूर्ण आणि समाधानी मानतो. तृप्तीचा आनंद खरंच वेगळा असतो. यात ना अपेक्षा आणि ना अभिलाषा. तिचे रोजचे नवनवीन कृत्ये पाहून मनाला जो आनंद मिळतो तो अवर्णनीय आहे.

Advertisements

11 thoughts on “मुलगी झाली

  1. आज मितीला दोन हजार तेरा सालामध्ये आपल्या “लग्न का करावे?” ह्या आपल्या लेखाला प्रतिसाद म्हणून कमितकमी तीन मुलींची, किंवा स्त्री प्रजातीय, नांवे आपणांस लाभली आहेत… तरी आपले (_तें_)काम झाले असे आज जाहीर करायला आमची काय हरकत नाय…!!!

    परवाच (म्हणजे साधारण १५-१ दिवसांपूर्वी) आमच्या एका जुनाट वड-पिपंळ वृक्षासलमान मित्राने आमच्या-त्याच्या भेटीत अनावश्यक रित्या (म्हणजे आम्ही न विचारताही) त्याची जन्मतारीख सांगितली (_रेड्याच्या तोंडी वेद वदवणे जरा सोपे असावे बहुदा_) आणि ती तुम्च्या पुत्रीजन्माशी मॅच झाली तेव्हाच आम चेशं कास माधा नज़ाले…!!!

    आज पुन्हा निःसंशयात्मक प्रतिसाद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s