जो तेरा है वो मेरा…

एक ‘हवेची शेपूट’ नावाची मोबाइल नेटवर्क सेवा पुरवणारी कंपनी आहे. तसं कंपनीचे महात्म्य अनेकांच्या तोंडून ऐकल्याने, मी कधी तिच्या वाटेने गेलो नव्हतो. आता घरच्यांच्या आग्रहास्त घेतलं शेपटीचे एक सिम. मग तिथून झाली या ‘करुण कहाणी’ची सुरवात. म्हणजे ती ‘शेपूट’ कधी कधी सापडायची. कोकणच्या वेड्यावाकड्या वळणात तर सोडाच पण हायवेच्या सरळ सपाट गुळगुळीत रस्त्यातही ती कधी मुळी मला सापडलीच नाही.

तसंही इतरांपेक्षा स्वस्त म्हणून मीही कधी फार किरकिर नाही केली. धकतय तोपर्यंत धकू द्यायच ठरवलं. झालं! इथूनच पुढे ‘शेपटी’ वाढायला लागली. कधी मिस कॉल सर्व्हिस, तर कधी ‘हेल्लो ट्युन’ दर महिन्याला एक नवीन सर्व्हिस न मागताच सुरु व्हायची. आणि शेपटीच्या शेपट्याना विचारलं की, माझ्या मोबाइलवरून आम्हाला रिक्वेष्ट आल्याची ‘धक्कादायक बातमी’ सांगायचे. गेलेले पैसे आधीच गेलेले असायचे. आणि मग ती सर्व्हिस एक दिवस वापरून बंद व्हायची.

बर शेपटाची वेबसाईट त्याच्या पुढची. बँकेतून पैसे कट व्हायचे. आणि हे रिचार्ज अन-सक्सेसफुल. भाग्यवान असाल तर पैसे रिफंड. नाहीतर ‘अक्कलखाती’. एकशे एकोणपन्नास रुपये घेतल्यावर ते दोन जीबीचा नेट रिचार्ज ‘फ्री’ देणार. अजबच आहे. असो! ते सुद्धा धड नाही. म्हणजे फेरारीच्या गाडीला हातागाडीची चाकं लावल्यावर जी अवस्था होईल. ती अवस्था आमच्या नेटची. सुरवातीला दोन महिने कोणतेही नाटक न करता चालले. नंतर मात्र ‘शेपटी’ हलवायला सुरवात.

रिचार्ज करून नेट चालू का नाही म्हणून कस्टमर केअरला फोन केला तर, त्या कस्टमर केअरवालीने कस्टमर केअरच्या ‘काळ्या यादीत’ सुरवातीला माझ्या ‘सौ’ नंतर माझा आणि नंतर माझ्या आईचा मोबाइल नंबर सामाविष्ट केला. ह्याला म्हणतात शंका समाधान. तसं तुमचा प्रश्न योग्य रीतीने सोडवण्यात आल्याचे तीन ‘एसेमेस’ मिळाले. पण, नेट काही चालू झालं नाही. शेवटी, असलेला ‘बेलेन्स’ संपवायचा. आणि एका सिमचे चार भाग करून शेपटीच्या विळख्यातून सुटका करून घेण्याच्या निर्णय एकमताने घेतला. एकूणच, ब्रीदवाक्याला जागणारी ही कंपनी आहे. ते ब्रीदवाक्य माहिती असेलच ‘जो तेरा है वो मेरा…’.

Advertisements

3 thoughts on “जो तेरा है वो मेरा…

  1. कायदे ह्यांना का बाधत नाहीत? बऱ्याच तक्रारी असूनसुद्धा ग्राहक मंचाणे सुद्धाकाही केलेले ऐकवात नाही 😦

  2. जोपर्यंत आत ह्यातले सिम काढून टाकून देऊन नुसता फोन कानाला लावली तरी बोलणे एकू येईल असा निरोप लाभत नाही तोपर्यंत सध्याचे महानाट्य चालू ठेवा, असेल जर खिशात देशी मेवा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s