सेक्स

बस्स! नाव काढू नका. अगदी निषिद्ध विषय. ‘सेक्स’बद्दल बोलणे म्हणजे घाणेरडे. वाईट अगदी! लहान मुलांसमोर तर बिलकुलच नाही. असेच विचार येतात ना! माझ्याही मनात येतात. जसे पहाल तसे हे जग आहे. म्हटलं तर वाईट, म्हटलं तर चांगल. हा विषय ही तसाच. कदाचित, चर्चा देखील करणे ‘पाप’ वाटेल.

एक साधा, सरळ सोप्या गोष्टीचा विचार करा. आपण जी गाणी ऐकतो. कधी विचार केलाय. जी गाणी मोठ्या प्रमाणात गाजलेली आहेत. त्यातली बहुतांश गाण्याचे अर्थ काढून पहा. आपल्याला ‘शीला की जवानी’ चालते. पण ‘सेक्स’ शब्द चालत नाही. कोणत्या अभिनेत्रीने बिकनी सीन दिला, तर हे भले मोठे पानभर वर्तमानपत्रात त्याची बातमी. किसिंग तर आजकाल ‘नॉर्मल’ झालं आहे. सारस बागेपासून ते सुरस चित्रपटांपर्यंत.

छोटे कपडे घालून, विचित्र प्रकारचे अंग हलवून जे नृत्य केले जाते. त्याची आपण वाहवा करतो. पण ‘सेक्स’वर जाहीरपणे बोलायला तयार नसतो. बाकी कोणताही विषय काढा. तासनतास त्यावर गप्पा ठोकू. ओबामाने काय करायला पाहिजे पासून ते राज ठाकरेचे काय चुकले पर्यंत. पण हा विषय काढला की, घाणेरडे वाटते. मुलीं असे कपडे का घालतात? पुरुषांनी अस करायला पाहिजे. हे सगळे प्रश्न केवळ ‘न बोलण्यामुळे’ निर्माण झालेले आहेत. आई तर सोडाच पण वडीलही आपल्या मुलीशी किंवा मुलाशी या विषयावर बोलत नाहीत. बोलत असतील तर खरंच ती मुले भाग्यवान म्हणायला हवेत. आणि आम्ही अस सार्वजनिक ठिकाणी ‘चोरून पाहणे’ सोडून कधी पहातच नाही.

कधी धर्माच्या नावाखाली तर कधी ‘अश्लील’ म्हणून विषय टाळतो. खर तर आपण हे आपली ‘सेक्स’ विषयावर असलेली भीती आणि लज्जा लपवतो. पण या सगळ्यामुळे प्रश्न किती गंभीर स्वरूप घेत आहे. भविष्यकाळ गडद स्वरूप घेत आहे. याचा विचार एकतर आपल्या डोक्यात येत नाही आहे किंवा आपण तो विचार करणे टाळतो आहोत. कुठल्या संस्कृतीची जपणूक आपण करतो आहोत? ‘कामसूत्र’ हा आपल्याच पूर्वजांनी निर्माण केला आहे.

कदाचित आज आश्चर्य वाटत असेल? आज ह्याची ‘सटकली’ वगैरे की काय.. अस काही नाही. सध्याची परिस्थिती का निर्माण झाली? याचा जो तो आपआपल्या परीने विवेचन करतो आहे. हे मिडीयावाले, काय झालं नाय तरी ‘फुकटची बोंबाबोंब’ करून विषय सोडवण्या ऐवजी त्याचा गुंता अधिकच वाढवत आहेत. म्हणून माझ मत मांडले. कदाचित, अनावधानाने काही बोलले गेले असेल तर, माफी असावी.

Advertisements

15 thoughts on “सेक्स

 1. वा आठल्ये साहेब, बिनधास्त पोस्ट. आवडली. खरं तर “काम” हा विषय नैसर्गिक तरी पण अस्पृश्य. शरीराच्या मुलभूत गरजांपैकी एक. तरी पण त्याबद्दल शास्त्रीय असं कमी बोललं जातं. त्याचेच परिणाम आता दिसून येत आहेत. किती फरक झालाय या १०-१२ वर्षात. आम्ही कॉलेज मध्ये असताना करिष्मा कपूर चं एक गाणं “सेक्सी सेक्सी मुझे लोग बोले” हे बदलून “बेबी बेबी मुझे लोग बोले” असं करायला भाग पाडलं होतं आणि आता तर एका चित्रपटात तर “मुझे मुंबई की सबसे बडी रंडी बनाना है” अशी वाक्य होती. असो. भारतामध्ये ज्या कामशास्त्रावर अख्ख एक मंदिर उभं आहे तिथे अजूनही हा विषय “अब्रम्हण्यम” या सदरात मोडतो याचे नवल वाटते.

 2. हेमंत
  सेक्स बद्दल बोलायचं म्हणजे काय बोलायचं?
  हा विषय उघड्यावर बोलायची जरी तुमची तयारी असली, तरीही काय बोलायचे हे समजले पाहिजे. मुला-मुलीला आई वडील संभोग करूनकोस, असे सांगू शकत नाहीत, आणि ते करणे वाईट आहे हे मुलांना पण माहिती असतेच- मग काय बोलायचं?..

  आई वडिलांनी या विषयावर काय बोलावे अशी अपेक्षा आहे? नुकताच एक सिनेमा पाहिला बिपी नावाचा. एकदम भंकस सिनेमा निघाला.हा विषय फार नाजूक आहे, या विषयावर बोलायचे तर नात्याची नाजूक नक्षी असलेली किनार पण विस्कटू शकते हे विसरून चालणार नाही.पूर्वीच्या काळी मंदिरात अशी चित्रे काढून त्याचे ज्ञान दिले जायचे, हल्ली इंटरनेट आहेच.. सगळं काही आपोआप शिकवायला..

 3. श्लोक ८० ते एक्क्याण्णव “जरा” वाचू पहावे, आपले उत्तर तेथेत सापडेल, संगणकापासून जरा दूरच रहा, संगणकाशी अतिसलगी उपयुक्त नाही… ।। श्री मनाचे श्लोक ।।

 4. seX and Xes हे दोन शब्द परस्परविरोधी नसून दोन्ही अर्थ फारच गुंतागुंतीचा आहे, आपल्या जुन्या सर्व फेल झालेल्या मैत्रीणीपैकी एखादी उदार होऊन तिने पत्र वगैरे पाठवले असू शकते, थोडे दिवस अभ्यास केला (तोंडाला फेसबुक येईपर्यंत) की नक्की कोण अवतरले आहे ते सकाळी आरशातच दिसेल…

  अहो, न्यूटनच्या डोक्यावर “आपले” सफरचंद (सेब) कसे पडले ते आम्हांस अजून कळले नाही तर तुम्हांस कसे कळेल?

 5. एक्सेसफुल ते सक्सेसफुल हा प्रवास फारच रंजक आणि रोचनीय असतो, पण त्यात सेक्स कुठे असतो ते अजून सापडले नाही, सापडले की ते “न्या”हाळूनच मग प्रकृती तपासतात साधारण प्रसृतीगृहात असा आमचा एक गोड गैरसमज आहे, अजून नीमार्क प्यायलो नसल्याने गुढीपाडव्याचे वस्त्र प्रथम आणून ठेवतो असा बहुदा प्रवाद असावा काही अन्य “वि-नि+”धर्मीयांमध्ये…

  म्हणजे चुकून फुलपात्र भरूनच लाभले तर पाणी टाकून देऊ नयेस त्याचा सदुपयोग करावा, नंतर ते पात्र फूल पाण्याने नीट धुवून विसळून घ्यावे नंतर त्यात हवे ते पाणी भरून निवांत प्यावे… हाच नाही का सिंपल डिंपल करिमयोग…???

 6. ek youngster(21 years ) mhanun sangto….
  majhya vayatlya mulanche he prashna aasu shaktat…
  1.gharche sanskar agdi changle aastat… aasa prashna padto ki aare he sex vait tar nahi …je evdha bobata hoto nav kadhla tari….
  2. kiti mhanla tari aapan parents shi hya vishayavar khulun bolu shakat nahi he hi titkach khara….mag bolaycha tari konashi……mala vata docter kadun hya goshtinchi sakhol mahiti milna ha ek changla pariyay aasu shakto…..ek sessionach aasayla hava hya vishayacha tyachya barober…
  3.rahila goshta baghun shiknyacha tar tyache fayde 1 % aastil tar to te tyahun kityek aahet

  mala vata kahi goshti natural aastat tya koni shikvaychi garaj padat nahi tyatlich sex hi ek goshta aahe… ho fakta thoda awareness hava shankacha nirasan vhayla hava

 7. चोवीस परगणा आणि छत्तीस चौरंगी लेन समान इसेक्स, ससेक्स वगैरे भूप्रांत इंग्लंडात आहेत, जरा अभ्य़ास केला तर तिबेट आणि जपान ह्यातले साम्य आणि वैषम्य जाणवून जीवनात रसग्रहण करायची इच्छा निर्माण होते, रसपान करायला रसवंती पेक्षा पुलंची फुलवंती अधिक उपायुक्त ठरणार…

  बारा बलुतेदार हा राज्यकारभाराचा भाग होता… माणसे जोडल्याशिवाय हात कोणासमोर जोडायचे ते सापडणे जरा कठीणच काम असते…

 8. महाराज,
  अशी अनेक जिवंत मंदिरे उपलब्ध असतात, त्याचे जरा बरेसे निवडुन मग त्याचा स्वामी बनून देवाची यथेच्छ पूजा करून निर्गुण निराकार निर्विकल्प समाधीचे ध्यासपर्व गाठायचे हे ध्येय असावे लागते.

  आपण ज्याला एक मंदीर असे संबोधले तो सर्वांना दाखवायचा सॅम्पल फ्लॅट आहे, उगाच तिथेच रहायचा किंवा तशी अनेक मंदीरे बांधायचा अनाहुत सल्ला द्यायची चूक करू नका…

  असो आपला ऋणानुबंध नसताना चुकून गाठ पडली म्हणून एवढेच बरळतोय, अन्यथा अख्खी बरणीभर लोणचे वाढले असते… तोंडी लावायला…

  माफीचा साक्षीनामादार,
  आपला लेखागार

 9. महाराज,
  निर्गुण निराकार निर्विकल्प समाधीचे ध्यासपर्व गाठायचे म्हणजे कमीत कमी एक पुजारी आणि एक पुजारीण आवश्यक आहे. एकट्याने हे साध्य नाही. आणि माझ्या कमेंट मध्ये कुठेही कुठल्याही प्रकारचे मंदिर बांधण्याचा सल्ला दिल्याचे दिसत नाही.
  बाकी ऋणानुबंध बद्दल म्हणाल तर अख्खी बरणी भर लोणचे दिलेत तरी चालेल.
  BTW … मंदिरा बेदी हे काय प्रकरण आहे ;).

 10. मन मोकळे पनाने बोलने हा विचार फक्त मैत्री मध्येच होतं,
  मुलीनं सोबत आई मन मोकळ्या पनाने बोलु शक्ते पन वडील मुलानं सोबत सेक्स या विषया वर बोलण्याचा विचार सुद्दा करत नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s