मी स्वतः

एक पंचतंत्रातील गोष्ट आहे. एक अभ्यास पारंगत, विद्याभूषण नदीच्या कडेने चालले होते. तेवढ्यात त्यांना एका मुलाच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी वळून पहिले तर, एक मुलगा नदीच्या पाण्यात गटांगळ्या खात होता. त्या विभूतींना पाहून तो वाचवण्यासाठी विनंती करू लागला. त्यांनी त्याला पहिले आणि म्हणाले, ‘जर तुला पोहता येत नव्हते, तर मग तू पाण्यात गेलाच कशाला?’. त्या मुलाने चूक मान्य केली आणि पुन्हा वाचवण्यासाठी विनवणी करू लागला. परंतु हे महाशय त्याला उपदेशाचे डोसच पाजत बसले.

खरंच, मला अनेकदा आपणसुद्धा त्या महाशयाप्रमाणे वागतो आहोत, अशी शंका येते. प्रत्येक गोष्टीत सरकारला दोष देत राहतो. रस्त्यांपासून ते पाण्यापर्यंत, सगळयाच गोष्टीत सरकार कसे चुकते आहे. याचीच चर्चा. गेल्या अनेक दिवसांपासून मी अनेक गोष्टींचे निरीक्षण करतो आहे. अगदी स्वतःचे सुद्धा. मी दुकानातून सामान खरेदी केल्यावर ‘प्लास्टिकच्या’ पिशवीची मागणी करतो. कंपनीत जागेवरून उठतांना मी पीसी ‘लॉक’ करतो. परंतु, मॉनिटर ऑफ करीत नाही.

रस्त्यांवर गर्दीतून गाडी चालवतांना, अनेकदा सिग्नल तोडण्यापासून ते रॉंग साईडने गाडी चालवण्यापर्यंत सर्वच गोष्टी मी अगदी बिनधास्तपणे करतो. तसे जेवतांना, ताटातील सर्व अन्न संपवतो. हेच काय ते योग्य करतो. असो! तो संस्काराचा भाग झाला. ते माहिती असेल ना! ‘गाढवापुढे वाचली गीता | कालचा गोंधळ बरा होता || – पण वाचणारा कोण होता ?’ आपणही मनमोहनच्या सरकारपुढे नेहमी काय करतो? अजून एक म्हण माहिती असेलच ‘यथा राजा तथा प्रजा’ याचे उलटे केले तर प्रश्नाचे उत्तर सहज मिळेल.

मला फक्त अस म्हणायचे आहे की, आपण असे आहोत म्हणून आपले सरकार असे आहे. माझ्या सोबत काम करणारे सहकारी, हे उच्च शिक्षण घेतलेले आहेत. पण नेहमी, वॉशरूम मध्ये तोंड हात धुतल्यावर पाण्याचा नळ व्यवस्थित बंद करीत नाहीत. असो! मला असे घडतांना दिसले की, मी स्वतः जावून तो बंद करतो. आणि हेच लोक दोन महिन्यांनी सरकारला पाण्यावरून दोष देत फिरतील. अशा एक न अनेक गोष्टी सांगता येतील. केंद्रात मनमोहनाचे सरकार का निवडून येते? राज्यात आघाडीच का आहे यांचे उत्तर मिळाले. मी स्वतःला बदलण्याचा मनापासून प्रयत्न करीत आहे. कदाचित ह्यातून काहीतरी बदल घडेल.

Advertisements

11 thoughts on “मी स्वतः

 1. रस्ता खराब असतो.

  पण दर शिवाजी गणपती देवी ह्या सर्व ह्या कार्यक्रम ला

  आपण खड्डे पाडून रस्ता खराब करतो. भर घालून रस्ता उंच होतो.

  मूळ रस्ता कोठे आहे हे समजत नाही .हे सर्व करतांना ते करणे आवश्यक

  आहे.

  पण बाजुला एक जागा गाळा ठेवावयास हवा. !

 2. चांगला विचार! आपण स्वतः बदलले पाहिजे हे मुळात प्रत्येकाच्या कपाळी अधोरेखित करण्याची गरज आहे… आजकाल तडकाफडकी तक्रार करणारे सर्वत्र दिसतात पण समस्येच्या मुळाशी जाऊन विचार करणारे अभावानेच दिसतात. तक्रार केल्यावर त्याचा योग्यरीतीने पाठपुरावा करावा लागतो तसेच तक्रारीचा अभ्यास करून त्यावर तोडगा (Solutions ) सुद्धा सुचवता आला पाहिजे…

  तुझ्या लेखातून तू निगडीचा उल्लेख खूप वेळा केला आहे त्यावरून तू निगडीकर असावा… फेसबुकवर असशील तर ह्या ग्रुपला नक्की सामील हो http://www.facebook.com/groups/nigdi.pradhikaran/ या ग्रुपद्वारे अनेक सोशल कामात हात घालणे चालू आहे. या सर्व कामात तू सुद्धा सहभागी व्हावा हि इच्छा. अनेक दिवसांपासून तुझ्याशी ऑनलाईन/प्रत्यक्ष संपर्क साधायचा होताच, भेटूयात कधीतरी

 3. कुठलाही भारतीय अथवा आंतरभारतीय मोबाईल फोन वापर करताना त्यात स्वकष्टार्जित एक रुपयाचा रेव्हेन्यू स्टँप बॅटरी आणि बॉडी ह्याच्या मध्यभागी ठेवून मगच तो वापरावा…

  स्वकष्टार्जित चा अर्थ परिस्थितीनुसार इतर काढतात म्हणून हा सुरक्षिततेचा उपाय भारतवर्ष निवासियांकरिता

 4. सद्गुरु विनायकराव पै सांगतात तसे, आणि जनप्रवाद आहे तसा, ज्याक्षणी तुम्हांस भगवत्नामाची ओढ सुरु होते तत्क्षणी तुम्ही तिथे पोहोचलेले असता, शिल्लक उरते की जी व्यवहारात “श्री शिल्लक” अशी संबोधिली जाते त्याला सायुज्यमुक्ती असे समर्थ श्री रामदास स्वामींनी दासबोध नामक ग्रंथात सोदाहरण स्पष्ट केले आहे…

  आता आपण आपला नेटका संसाराची सूत्रे हाती घेऊन ते तरू (जहाँ है ज) भवसागरातून पार करण्यासाठी साधना सुरु करा…

  …श्रीराम जय राम जय जय राम…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s