प्रश्न – राजा मनमोहनचे नाव बैल राजा कसे पडले?

उत्तर- इसवी सन २००४ पासून भारत नावाच्या देशामध्ये मनमोहन नावाचा राजा राज्य करीत होता. गुणी, सद्गुणी, हुशार असा आहे समज समस्त देशात पसरलेला होता. तो आला आणि देशाचे चित्रच पालटून गेले. दु:खी असलेले प्रजाजन अधिकच दु:खी होवू लागले. राजाच्या निर्णयाचा फटका सर्वच लोकांना बसू लागला. राजाच्या मंत्रिमंडळातील मंत्री रोजच खजिन्यावर धाडी टाकू लागले. शेजारील देश तर रोजच हल्ले करू लागले.

देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली. महागाईचा भडका उडाला. राजाचे निर्णय चुकत असून देखील राजा बोध घ्यायला तयार नव्हता. प्रत्येक चुकीच्या गोष्टीला तो थांबवायला तो धजत नव्हता. हळूहळू लोकांच्या रागाचा पारा वाढू लागला. राजाच्या निषेध सर्वत्र होवू लागला. लोक राजाला ‘बैल’ म्हणू लागले. अशा रीतीने मनमोहन राजाचे नाव बैल राजा असे पडले.

Advertisements

5 thoughts on “प्रश्न – राजा मनमोहनचे नाव बैल राजा कसे पडले?

  1. अतिशय भंपक लेख आहे. राजा मनमोहनने गरीबी दूर केली आहे. बरेच लोक मोकळ्य़ा ढाकळया पद्दत्तीने संपत्ती मिळवू शकत आहेत. संपूर्ण जगात आपल्या कडे जेवढे कायदे अस्तित्त्वात आहेत तेवढे कोठेच नाहीत ( प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही हा भाग वेगळा) अश्या परिस्थितीत सुद्धा मनमोहन राजाने सगळ्यांना मनाला वाटेल त्या पद्दत्तीने संपत्ती गोळा करण्याची मुभा दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s