महाराष्ट्र कुणाचा??

खर तर खूप वेळापासून सुरवात करायचा प्रयत्न करतोय. पण हवी तशी सुरवात अजूनही होत नाही आहे. बऱ्याच दिवसांनी तोंड दाखवतोय, त्याबद्दल क्षमस्व. खर बोलायचे ठरलं तर माझ्या या दोन कन्या रत्नांसोबत कसा वेळ जातो. कळतच नाही.

स्पृहा आठल्ये

 

पण गेले काही दिवस हे महाराष्ट्रात जे घडतंय. ते पाहून जाम डोक सरकतंय. कदाचित इतरांसाठी हा केवळ ‘टाईमपास’चा विषय आहे. पण याच अशाच वागण्यामुळे आपण आपला हक्क विसरून चाललो आहे.  आणि हे राजकारणी.. कुणाचे आहेत हे? जनतेचे सोडा. आज ह्या पक्षाचे, तर उद्या त्या पक्षाचे. मला ना, जाम आश्चर्य वाटतंय. काल ‘हाताचा’ किंवा ‘घड्याळाचा’ आज कमळ घेऊन फिरतोय. आणि वरून मतही मागतोय. पण आपण शांत. ‘नरोवा कुंजरोवा’. कुठे बलात्कार झालाय. कुठे खून झालाय. आपण बाकी शांत. प्रत्येकच हेच ‘आपल्याला काय करायचं?’. आयला, बाजूच्या घरात चोर शिरल्यावरही हे असंच. काय म्हणे तर आम्ही ‘सभ्य’. चौकात, फेसबुक किंवा ट्विटरवर ‘लाईक’ आणि शेअर करण्यापलीकडे काही नाही. काही म्हटलं, की आपले ठरलेले उत्तर ‘सगळे राजकारणी असेच असतात’.

का असतात असे ते? पण ती जबाबदारी ‘माझी’ नाही. मी फक्त माझ्या वेळेला जमेल किंवा जमत असेल तर त्यावर विचार करणार. त्यापुढे ‘शून्य’. यामुळेच प्रत्येक पुढारी आपल्याला जमेत धरतोय. आणि वाटेल ते आणि तस बोलतोय. पण काय करणार ‘आपल्याला त्यात पडायचं नाही’.

का? भीती वाटते म्हणून. का कोण दादा, भाई दरडावेल? इतरांचे जाऊ द्या. मी माझेच सांगतो. महाराष्ट्र माझा आहे. काय करायचं घ्या करून. हे अगडबंब नितीन ‘ढेरकरी’ आणि त्याच पिल्लू ते ‘कुबड्या खवीस’. काय तर म्हणे वेगळा विदर्भ करणार. काय खाऊ आहे काय?? माझ्या विदर्भच्या मित्रांनो, विकास झाला नाही. ही फक्त तुमची जखम नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्रासाला आहे हो ह्यांना. मराठवाड्यात जा. तिथेही असेच. जावा कोकणात. तिथे पाहीले तर आपले बरे म्हणावे अशी परिस्थिती. या नगरमध्ये. एखादा चांगला रस्ता दाखवा आणि हजार रुपये मिळावा अशी घोषणा केली तरी, कोणी जिंकणार नाही. तीच परिस्थिती सोलापुरात. अहो मुंबईकर देखील वैतागले हो ह्याला. पुण्यात ‘मायकल शुमाकर’ला जरी आणले तर तोही वैतागेल. संध्याकाळी सहा-सात च्या दरम्यान त्याला हडपसर ते स्वारगेट बस सात-आठ किमीचे अंतर अर्ध्या तासात पार कर म्हणाले. तरी तो ती पैंज हरेल.

कुणासाठी? आणि कशासाठी जगतो आहोत आपण? आणि का सहन करतो आहोत हे असले राजकारणी? चुका ते करणार. आणि भोगणार आपण. आणि ते देखील निमुटपणे. का तर आपण ‘सभ्य’. माझ्या मित्रांनो, आता तरी चीड निर्माण होऊ द्या. दोन दिवस मी त्या भाजीपाल्याला काय शिव्या नाही घातल्या तर, त्याचे दोन पाच कार्यकर्ते, माझ्यात ‘बदल’ घडवण्याची मोहीम हाती घेतली. असो, तेही चांगले आहेत. ‘समाजसेवा’ नाही करत म्हणाले. कट्टर आहोत भाजीपाल्याचे. असो जे समजायचे ते मी समजलो. पण माझ्यापेक्षा, भाजीपाल्यावाल्यांनी प्रचाराकडे अधिक लक्ष केंद्रित करावं. तुमच्या महाराष्ट्र तोडण्याच्या भूमिकेनंतर, लागोलाग मीही तुमची पारंपारिक मते ‘खाल्ली’. थोडक्यात, दहा ‘हेमंत’ बनवले. आणि मतदानापर्यंत ते अजून ‘दहा’ बनवतील. तुम्ही माझा महाराष्ट्र तोडण्याची भूमिका घेतली. आणि मी तुमची मते. त्यामुळे यापुढे, जनतेला इतके हलक्यात घेऊ नका. आणि मला दहाच नातेवाईक आहेत अस समजू नका.

असो, भाजीपाल्यांवर आता मला विश्वास नाही. तुमचे मत तुम्ही ठरावा. आणि एकच विनंती आहे. कृपा करून स्वतःला कमी समजू नका. हा महाराष्ट्र आपला आहे. हा देश आपला आहे. आणि याच्याकडे, तुमच्याकडे जो वाकड्या नजरेने पाहिलं. त्याला संपवण्याची ताकदही तुमच्यात आहे. फक्त हवंय ती तुमची इच्छा.

Advertisements

One thought on “महाराष्ट्र कुणाचा??

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s