जय जय महाराष्ट्र माझा!

महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. उशिरा देतोय. त्याबद्दल क्षमस्व. आपला महाराष्ट्र खरच खूप सुंदर आहे. अनेक गोष्टी अशा आहेत. ज्याने हा महाराष्ट्र अगदी मढला आहे. डोंगर, नद्या आहाहा! क्वचित एखाद्या भूप्रदेशाला असे लावण्य लाभले असेल. इथली लोक देखील तशीच. आणि स्वभावाने अगदी मधुर. कधीकधी याच गोष्टींमुळे महाराष्ट्र ह्या बाकीच्या लोकांच्या डोळ्यात खुपतोय असे वाटते. सतत काही न काही चालूच. कधी भाषेवर तर कधी जागांवर आक्रमणे. आणि कधी कधी तर महाराष्ट्र तोडण्याचीच भाषा. त्याच अस आहे. प्रत्येकजण आपआपली मते, आपल्याला येणाऱ्या अनुभवावरून बनवत असतो. मध्यंतरी भाजप – शिवसेनेचे ‘टाईमपास’ पाहून जाम विटलो होतो. मराठी भाषेला नाही, पण ह्या महाराष्ट्राच्या राजकारणाला फारच विटून गेलेलो. पण गेल्या काही दिवसांत अशा लोकांशी सबंध आलेला, की ज्याने मी एकटाच असा नाही असे वाटू लागले..

आपली भाषा, आपले राज्य यात खूप गोष्टी आहेत. ज्याने आपण असे का आहोत याची उत्तरे मिळते. असो, यावर एखाद्या दुसऱ्या दिवशी चर्चा करूयात. तूर्तास, आपण सगळे एका राज्याचे एका भाषेचे पाईक आहोत. आणि याचा मला अभिमान आणि आनंद आहे. गेल्या काही वर्षात पाण्याचे प्रश्न वारंवार निर्माण होत आहेत. आपण स्वत: यात पुढाकार घेऊन गरजेनुसार त्याचा वापर केलात तर आपण या राज्याला, आपल्या बांधवांना, ज्यांना पाण्याच्या विवंचनेने ग्रासले आहे. त्यांना मदत करू शकतो. ती देखील आपली भावंडे आहेत. असो, फार बोलत नाही. आपण, सुज्ञ आहात. फार बोलून मी आपल्या दोघांचाही वेळ वाया घालावाल्याप्रमाणे होईल. तूर्तास थांबतो. जय हिंद | जय महाराष्ट्र ||

3 thoughts on “जय जय महाराष्ट्र माझा!

  1. Hi
    I am pratik puri. I read your blog and liked it. I am also a writer and happen to work in Dailyhunt news and e-book mobile application. Dailyhunt releases news and e-books in 12 Indian languages. I would like to contact you regarding publishing your blog matter on our app. I look after the Marathi language. I would like to publish your blog content on our app for free or paid. In Marathi we have a readership of over 50 lakh people. We would be pleased to have you work with us. Please contact me for further details at pratik.puri@verse.in so that I can give you details of the proposal. Thank you!

    1. Hi Pratik, You can publish my blogs/content in you application. I don’t mind/no need pay🙂 Best of luck for your work!

      सोम, 14 दिस॰ 2015 को 12:47 pm बजे को हेमंत आठल्ये ने लिखा:

      > Hi Pratik, > You can publish my blogs/content in you application. > I don’t mind/no need pay🙂 > Best of luck for you work! > > Thanks. > > रवि, 13 दिस॰ 2015 को 6:21 pm बजे को हेमंत आठल्ये comment-reply@wordpress.com> ने लिखा: > >>

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s