विरोध कशासाठी..

काळा पैसा संपवण्याच्या दृष्टीने आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांनी पाचशे व हजाराच्या नोटा रद्द करण्याची एका रात्री घोषणा केली आणि मग काय देशभर आर्थिक हिशोब गडबडले. कुणाला पटले तर कुणी त्याचा विरोध केला. तसा मुद्दा व निर्णय पटण्याजोगे आहे. पण त्याचा परिणाम माझ्यासारख्या सामान्य माणसावर फारच मोठा झालाय. कृपया हा विषय देशभक्तीशी जोडू नका ही विनंती.

काही बोलण्याआधी आपल्याला एक महत्वाची परंतु खासगी गोष्ट सांगू इच्छितो. काही महिन्यांपूर्वी एका कामासाठी मला एक संयुक्त अरब अमिराती(युएइ) देशातील एका नामांकित कंपनीचे एक काम मिळालेलं. दिवसाला ऐंशी डॉलर असा त्या कामाचे स्वरूप होते. साधारण सात दिवसांचे ते काम. त्यांचे काम सांभाळणारे ऑफिस पाकिस्तानात होते. उरी हल्ल्यानंतर मी ते काम पुन्हा घेणे थांबवले. कारण एकच हल्ल्याचा निषेध!

आता मूळ विषयाकडे येऊ. माझा व्यवसाय सुरु करून फार काळ लोटलेला नाही. त्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे. जी काही थोडीफार रक्कम असते ती जपून वापरण्याकडे माझा कल असतो. त्यामुळे पाकिटात फार फार तर दोन तीनशेच असतात. बाकीचे बँकेत. जेव्हा मोदींनी नोटा रद्द करण्याची घोषणा केली. तेव्हाही खिशात तेवढेच होते. दुसऱ्या दिवसापासून बँका/एटीएम सगळेच बंद. पहिले दोन तीन दिवस आते त्या पैशात भागवले. नंतर काय, जिकडे पहाल तिकडे बँक/एटीएम सगळीकडे रांगच रांग. जिथे शक्य होईल तिथे डेबिट कार्ड वापरून दिवस काढले. पण घरी धुणीभांडी, दुधवाल्यांचा पगार कुठून देणार. शेवटी रांगेत उभे राहीलो. बँक कर्मचारी/लोक सगळेच त्रस्त!

रांगेत एक भाजीवाले काका सांगत होते. खिशात पन्नास हजार आहेत. पण चहाही प्यायला ते पैसेवापरू शकत नाही. माझ्या सोसायटीतील एक रिटायर्ड पोलीस अधिकारी सांगत होते. लग्न जवळ आले म्हणून दीड एक लाखाची रक्कम बँकेतून काढलेली. आता या घोषणेने सगळे पैसे बदलून घेताना फारच अडचणी येत आहेतच. असे अनेक अनुभव आहेत, मला तर दुष्काळात तेरावा महिना चालू आहे. थोड्याफार प्रमाणात सगळेच असेच त्रस्त झालेले आहेत.

मी मोदींचा विरोधक नाही. पण त्यांच्या निर्णयाने जेवढे देशाचे भले झाले त्यापेक्षा अधिक लोकांचे हाल झाले. त्यात काहींचे बळी देखील गेले. मला फक्त इतकेच सांगायचे आहे की निर्णयाला विरोध का होतो आहे याचा शांत डोक्याने विचार करा.

Advertisements

One thought on “विरोध कशासाठी..

  1. सर,तुमचे म्हणणे अगदी रास्त आहे.परंतु आपल्या देशातील लोकांना काही वाईट सवयी लागलेल्या आहेत किंवा लावलेल्या आहेत,त्यामु ळे हे असे होते असं मला वाटतं. पुरेसी व्यवस्था करणे गौपनियतेमुळे कदाचीत शक्य झाले नसेल,जर अजुन वेळ दिला गेला असता,तर एक तर मुळ मुद्दा साध्य झाला नसता, किंवा पुन्हा आम्ही वित्तीयसंस्थेकडे अशीच गर्दी केली असती.फक्त आज आमच्या खिशात आज खर्चाला पैसे राहिले असते.सर,पासष्ट वर्षानंतरही आमची बॅंकिंग व्यवस्था आम्ही सुदृढ करु शकलो नाही.आम्ही आजही गरजे पुरते पैसे घरात न ठेवता घरात जमउन ठेवतो,चलनात असा पैसा वापरतच नाही.न त्याच्या वर टॅक्स भरत,न ईतर कर.जसे राजकारणी,उद्यौगपती असा प्रकार करतात,तसाच माझ्यासारखा सामान्य मानुसही फक्त कमी जास्त प्रमाणात.नाही तर नोटा बदली साठी येवढी गर्दी झालीच नसती.सर माझ्या हाऊसिंग सोसायटीत डिफाॅल्टर असलेल्याने एकदम १७ ०००/-कॅश देऊ केले.आजही आम्म्ही शिकत नाही,माझ्याच एका साठ वर्ष वयाच्या काकांनी सिनीअर सिटीझनचे लाभ घेत बॅकेतुन गरज नसतांना नविन दहा हजार काढले.आम्ही केव्हा सुधरणार?आमच्या सवयी केव्हा बदलणार? हे कोणी तरी करायलाच हवं होतं. काहिंना त्रास होतोय.पण त्यांना आपण आजु बांजुच्यांनी सांभाळुन घ्यायला हवे असे वाटते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s