नवा ब्लॉग

ब्लॉग नव्याने सुरु करीत आहे. ह्या ब्लॉगवर यापुढे माझा फारसा संपर्क राहणार नाही! नवीन ब्लॉगचा दुवा सोबत जोडत आहे! धन्यवाद!!
http://www.hemantathalye.com/blog/

Advertisements

ध्येय काय?

बऱ्याच दिवसांनी प्रयत्न करतो आहे. समजूत घ्याल अशी अपेक्षा करतो! बऱ्याच दिवसापासून अस्वस्थ आहे. कशासाठी आपण मराठी मराठी करत आहोत. व नेमकं कशासाठी आपण ह्या गोष्टींवर इतका वेळ खर्च करत आहोत!

मूळ प्रश्न असा आहे की नोकऱ्याच्या संधी कमी झाल्यात! रोजगार काय करावा हा प्रश्न उभा राहिला आहे! सरकारकडून काही अपेक्षा ठेवणं मूर्खपणा आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात अडचणी नव्हत्या असं नव्हतं! पण सध्याला मराठीला आव्हान वाढलेली आहेत! आपण नेमकं करायचं काय हा प्रश्न उभा राहतो आहे. बरं कोणी काही करतोय म्हटलं की मदतपेक्षा अवहेलना जास्त प्रमाणात होते आहे.  त्यामुळेच आपलं नेमकं ध्येय काय असा प्रश्न स्वाभाविक आहे. मराठी वाढवण्यासाठी टिकवण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत! यात आपल्याला जो पटतो तो घेऊन पुढे जाणे योग्य असे मला वाटते! कोणतीही सुरवात टीकाकारांच्या कृपेने खडतरच होते. काही असंतुष्ट असतातच! मग तुम्ही कोणताही मार्ग निवडला तरीही ही परिस्थिती अशीच आहे.

आपले ध्येय मराठी वाढवणे आहे! इतरांना नामोहरम करून आसुरी आनंद उपभोगणे नाही. रस्त्यात खाचखळगे असतातच! कधीकधी खिळे आणि खड्डेसुद्धा! त्यामुळे ध्येयाशी प्रामाणिक राहून कामाला लागूया! #जयमहाराष्ट्र

विरोध कशासाठी..

काळा पैसा संपवण्याच्या दृष्टीने आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांनी पाचशे व हजाराच्या नोटा रद्द करण्याची एका रात्री घोषणा केली आणि मग काय देशभर आर्थिक हिशोब गडबडले. कुणाला पटले तर कुणी त्याचा विरोध केला. तसा मुद्दा व निर्णय पटण्याजोगे आहे. पण त्याचा परिणाम माझ्यासारख्या सामान्य माणसावर फारच मोठा झालाय. कृपया हा विषय देशभक्तीशी जोडू नका ही विनंती. Continue reading

जेव्हा अडचणी येत असतात..

जेव्हा अडचणी येत असतात. आणि तुम्ही त्याच्याशी दोन हात करता. त्यावेळी काही वेळासाठी तुम्ही संपला असं तुम्हाला/आजूबाजूच्या लोकांना वाटत असते. काहीदा अडचणी येतच राहतात. काही काळ तुम्हाला गुंतवून ठेवतो. एक अडचण संपली की दुसरी. असे चक्र चालू राहते. पण माझ्या स्वानुभवरून तरी जेव्हा खूपच कठीण काळ येतो त्यावेळी समजून जा की चांगला काळ जवळ आलाय. Continue reading

जय जय महाराष्ट्र माझा!

महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. उशिरा देतोय. त्याबद्दल क्षमस्व. आपला महाराष्ट्र खरच खूप सुंदर आहे. अनेक गोष्टी अशा आहेत. ज्याने हा महाराष्ट्र अगदी मढला आहे. डोंगर, नद्या आहाहा! क्वचित एखाद्या भूप्रदेशाला असे लावण्य लाभले असेल. इथली लोक देखील तशीच. आणि स्वभावाने अगदी मधुर. कधीकधी याच गोष्टींमुळे महाराष्ट्र ह्या बाकीच्या लोकांच्या डोळ्यात खुपतोय असे वाटते. सतत काही न काही चालूच. कधी भाषेवर तर कधी जागांवर आक्रमणे. आणि कधी कधी तर महाराष्ट्र तोडण्याचीच भाषा. त्याच अस आहे. प्रत्येकजण आपआपली मते, आपल्याला येणाऱ्या अनुभवावरून बनवत असतो. मध्यंतरी भाजप – शिवसेनेचे ‘टाईमपास’ पाहून जाम विटलो होतो. मराठी भाषेला नाही, पण ह्या महाराष्ट्राच्या राजकारणाला फारच विटून गेलेलो. पण गेल्या काही दिवसांत अशा लोकांशी सबंध आलेला, की ज्याने मी एकटाच असा नाही असे वाटू लागले..
Continue reading

फक्त मराठीच

बऱ्याच दिवसांनी असा अचानक प्रकट होतो आहे. त्यामुळे, मोठ्या मनाने क्षमा कराल अशी अपेक्षा करतो. गेले अनेक दिवसांपासून मनात एक विचार घोळतो आहे. म्हणजे, भाजप-शिवसेनेचे लफडे पाहून पार विटून गेलेलो. अस वाटलेलं नेमक कोण मूर्ख आहे. आपण की ते?? असो, गेले काही महिन्यांपासून निरीक्षण करतो आहे. जेव्हापासून ‘मोदी लिपीत’ देशाचे व्यवहार सुरु झालेत. तेव्हापासून हे गुज्जूभाई. म्हणजे अगदी निवडणुकीच्या दिवसापर्यंत स्पष्ट मराठीत व्यवहार करायचे. आता काय करणार. दुधावाल्यापासून ते किराणा. आणि इस्त्री पासून ते मिठाईवाल्यांपर्यंत हेच भय्या. केस कापणारा देवकृपेने मराठी. आजकाल हे सगळे अचानक ‘हिंदीत’ सुरु झालेत. म्हणजे, गझनी चित्रपटातील गझनीने ह्यांची ‘मेमरी’ लॉस केली काय, देव जाणे.
Continue reading

माझा अखंड महाराष्ट्र

काही बोलण्याआधी मी माझ्या सर्व मित्रांचा आणि नातेवाईकांचे आभार मानतो. की ज्यांनी ‘अखंड महाराष्ट्र’ला मतदान केले. मला या गोष्टीचा आनंद आहे, की मराठी आणि महाराष्ट्र एक ठेवण्याची भावना अजूनही प्रत्येकाच्या मनात आहे. माझ्या प्रिय भाजीपाला उर्फ भाजप याला सांगतांना मला आनंद होतो आहे की, मी भाजपचे पंधरा मते, म्हणजे ज्यांनी लोकसभेला किंवा त्याआधीही कायम भाजपला मतदान करत आले. ती मते आजच्या मतदानामध्ये त्यांच्या विरोधात गेली.

Continue reading