सार्वजनिक गणेशोत्सव कशासाठी?

गेले काही दिवस हा प्रश्न राहून राहून मनात येतोय. आपण एखादी गोष्ट करतो. का? अस विचारल्यावर काहीतरी उत्तर नक्कीच असतं. म्हणजे, सकाळी उठल्यावर दात घासतो. का दात घासतो? अस विचारल्यावर, उत्तर पटकन येईल की, दात स्वच्छ राहावेत म्हणून. कंपनीत जाऊन काम कशाला करतो? उत्तर येईल पैसे कमावण्यासाठी. अशा एक न अनेक गोष्टी करतांना, त्यामागे कारण असते. पण आपण गणेशोत्सव सार्वजनिकरीत्या का करतो? अस विचारल्यावर अस कुठलंच उत्तर मनात पटकन येत नाही. Continue reading

सकाळ

आमच्या पेपरवाल्याच्या कृपेने रोज ‘सकाळ’ उगवायला जरा उशीरच होतो. कंपनीच्या गडबडीमुळे मग ‘सकाळ’ चाळायला संध्याकाळ होते. आधीच कामाचा थकवा, आणि त्यात पहिल्या पानावर पहा नाहीतर पुरवणीत. जिकडे तिकडे ‘अ’ रे ‘अजितदादा’चा आणि ‘प’ रे ‘पवारांचा’. ते सोडलं तर बाकी वाचनयोग्य अस वर्तमानपत्र.

Continue reading

नवीन ब्लॉग

आज बऱ्याच दिवसांनी बोलतो आहे. खर सांगायचं झालं काय बोलावं यावर बराच वेळ विचार केला. पण काहीच सुचेनासे झाले आहे. आजकाल.. जाऊ द्या ते. ह्या वर्डप्रेसमध्ये रजिस्टर करून पाच वर्षे झाली. म्हणून म्हटलं आज बोलूयात. गेल्या पाच वर्षात अनेक बदल झाले.  त्याचा ‘चित्रपटच’ डोळ्यासमोर धावला. म्हणजे या ब्लॉग बाळ ‘पाचवीत’ जाणे अजून बाकी आहे. बाकी बोलूच…

मी आणि माझा ब्लॉग

यार, काय बोलू? प्रतिक्रिया वाचून हसावं की रडावं अस होते आहे. माझा ब्लॉग माझी भलतीच इमेज बनवतोय. कधी ज्योतिषी, कधी इतिहासकार तर कधी कधी हा ‘हेमंत’ वेडा. खर तर ‘हेमंत’ ना ज्योतिषी ना इतिहासकार. ‘वेडा’ म्हटल्यावर माझी काही हरकत नाही. कारण, प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या विषयात वेडा असतोच. Continue reading

संभाजी महाराज

आजचा दिवस, जगातील एकमेव ‘अजेय’ व्यक्तिमत्वाचा. त्याच्या अखेरच्या क्षणांचा. त्याच्या आधी आणि नंतर देखील असा ‘वीर’ पुन्हा या पृथ्वीवर अवतरला नाही. नेपोलियन असो. सिकंदर असो. किंवा कोणताही इतिहासात वीर घ्या. त्याच्या आयुष्यात त्याला कधी न कधी ‘तह’ किंवा ‘पराभव’ स्वीकारावा लागलेला आहे. जवळपास एकशे बत्तीस लढाया संभाजी महाराज लढले आणि जिंकले सुद्धा. Continue reading

अबोल

यार, काय बोलू! हे माझ अस झालं आहे न. काय बोलू आणि काय नको. बोलावसं बरच वाटत. पण प्रश्न पडतो कस बोलू. म्हणजे काही विषय असे असतात. की जे असून नसतात. म्हणजे, साक्षीदार देखील आपण आणि आरोपी देखील आपण. गुन्हा घडतो. त्या ठिकाणी गुन्हा आपल्याच हातून घडत असतो. कितीही प्रयत्न केला, मनात ते असतेच. आपण आपल्या अशा अनेक गोष्टी, मनात  दडवून ठेवतो. Continue reading

लग्नाआधी आणि नंतर…

लग्ना आधीच जीवन आणि लग्नानंतर होणारा जीवनातील बदल, यातील सुखी कोणते वगैरे गोष्टी कदाचित वादाचा विषय होवू शकतो. पण एक गोष्ट मात्र नक्की की, लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर यात फरक असतो. जर फरक पडलेला नसेल. तर मग ‘अवघड’ आहे. Continue reading