जेव्हा अडचणी येत असतात..

जेव्हा अडचणी येत असतात. आणि तुम्ही त्याच्याशी दोन हात करता. त्यावेळी काही वेळासाठी तुम्ही संपला असं तुम्हाला/आजूबाजूच्या लोकांना वाटत असते. काहीदा अडचणी येतच राहतात. काही काळ तुम्हाला गुंतवून ठेवतो. एक अडचण संपली की दुसरी. असे चक्र चालू राहते. पण माझ्या स्वानुभवरून तरी जेव्हा खूपच कठीण काळ येतो त्यावेळी समजून जा की चांगला काळ जवळ आलाय. Continue reading

Advertisements

बेकार दुपार

काय यार, सगळ्या आठवड्याच्या मेहनतीचा सत्यानाश झाला. काल दुपारने सगळी चिंधीगिरी केली. काल सकाळी मला तिने इतके गोड ‘हाय’ केले होते. आणि किती वेळा ती माझ्या डेस्क जवळून गेली. किती छान वाटत होते. पण दुपारनंतर सगळंच बदललं. माझ्या प्रोजेक्ट मधील नाही. पण दुसर्या, मित्राच्या प्रोजेक्ट मधील एक काकू. म्हणजे मुलगीच आहे. पण लग्न झालेली. मित्राची मध्ये थोडीफार कामात मदत केली होती. त्यावेळी तिचीही केली. आता तिला पण आत्ताच टपकायाचेच होते. तिचीही काय चूक म्हणा. माझीच झाली मदत करून. काकू माझ्याकडे आल्या. आणि त्यांच्या कामातील अडचणी सोडवण्यासाठी माझ्याकडे मदत मागितली. आता मलाही काम होते. म्हणून त्या काकूंना, माझ्या डेस्कवर काम समजावून सांगितले. काकू गेल्या. Continue reading

कालसर्पयोग

मध्यंतरी, तसे आता हे काही नवीन राहिले नाही. एक गुरुजी एका स्थळाला घेऊन घरी आले  होते. मला आई वडिल पुण्यात कधी येतील अस विचारात होते. मी वडिलांना फोन लावून बोलणे करून दिल्यावर माझी कुंडली त्यांनी बघितली. माझी कुंडली दहा पंधरा मिनिटे बघितल्यावर मला म्हणाले, की तुझी रास कर्क, चरण दुसरे आणि पुष्य नक्षत्र. मग तुझी शांती झाली आहे का? मी नाही म्हणाल्यावर एकूणच कुंडली पाहता तुझ्या पत्रिकेत कालसर्प योग आहे. कालसर्पातील ‘सर्प’ ऐकून थोडी भीती वाटली. त्यांना सांगितले, ‘माझी शांती वगैरे झाली नाही. वडिलांना बहुतेक माझ्या ‘शांती’ विषयी अधिक माहिती असेल’. Continue reading

यापुढे कर भरणार नाही

खरच बरोबर आहे. माझ्या नुसत्या बडबडीला काय अर्थ आहे? काल माझ्या एका नोंदीला आलेल्या प्रतिक्रियेत हेच होते. प्रतिक्रिया अगदी बरोबर आहे. मी ज्या सरकारला नाव ठेवत आहे. तेच मुळात काहीही न करू शकणार आहे. शंभर कोटी प्रेतांच्या देशात अजून काय घडू शकते? पुण्यात बॉम्बस्फोट होणार हे ह्या नंदी बैल मुख्यमंत्र्याला आणि त्याच्या पोलिसी कुत्र्यांना माहिती होती. तरी देखील.. सोडा परत मी त्यांच्यावर सुरु झालो. ते काहीच करू शकत नाही. चार माणसांच्या बदल्यात इस्राईलने पेलेस्टांइनच्या राष्ट्रपतीला त्याच्या राजभवनात रणगाडे घालून त्याला ठार मारणारे आपण नाही आहोत. जर सरकार आपल्या लोकांना असच मरू देणार असेल आणि आपल्याच जीवावर स्वतः कायद्याचे उल्लंघन करणार असेल तर आपण का कायदे पाळायचे? या वेळेपासून मी सरकारचा कर भरणार नाही. Continue reading