ब्लॉग

इतक्या उशिरा बोलतो आहे, त्याबद्दल क्षमा मागतो. माझा संगणक गेल्या काही दिवसांपासून ‘कोमात’ गेला असल्याने बोलणे शक्य नाही झाले. पण सर्वांच्या प्रतिक्रिया मी माझ्या मोबाईलवरून नियमित वाचत होतो. सर्वांच्या प्रतिक्रिया मला मान्य आहे. माझ्याकडून खूपच गोंधळ आणि रटाळपणा चालू आहे. जवळपास गेल्या दीड वर्षात ब्लॉगबाळ ३६३ पावले, म्हणजे ही नोंद पकडून ३६४ पावले दुडूदुडू धावला. त्यातील साठी पेक्षा अधिक नोंदी तिच्यावरच आहेत. गेल्या चार महिन्यात मी ‘अप्सरा’ सोडून इतर विषयावर खूपच कमी बोललो, हे खर आहे. प्रत्येक नोंदीत तेच तेच आणि तोच तोच पणा आला, हे देखील खर आहे. Continue reading

Advertisements

घटस्फोट

खूप आनंद होत आहे. काय करू काय नाही आणि अस झाल आहे. कालच एका स्थळाचा ‘मला’ पाहण्याचा कार्यक्रम झाला. मला ते ‘स्थळ’ पसंत आहे. आणि तिलाही ‘मी’. दोघांची पसंती झालेली आहे. बस काय तो ‘होकार’ येणे बाकी आहे. त्यांचा ‘होकार’ आणि ‘प्रेमपत्र’ आले की, माझ्या सध्याच्या ‘भार्या’ला घटस्फोटाची नोटीस देऊन टाकील. खूप नखरे सहन केले तिचे. आणि विशेषत: तिच्या आईची. जणू काय माझाशी लग्न केले म्हणजे ‘उपकार’ केल्याची भाषा. तशी तिची काय चुकी म्हणा? ‘सासू’बाई. फारच पाडून बोलायच्या. चुका त्या करणार, आणि ‘सॉरी’ मी म्हणायचे. वर्षभर सहन करतो आहे. Continue reading

एकतर्फी

सगळंच संपल्यासारखे वाटते आहे. खर तर कालच बोलणार होतो. पण रात्री संगणक सुरु केल्यावर सुद्धा मूड नव्हता बोलायचा. काल तिने एकदाही साध ढुंकूनही पहिले नाही. आणि कॅन्टीनमध्ये देखील आली नाही. आणि सकाळी केलेले ‘गुड मॉर्निंग’  पिंग आफ्टरनून झाल्यावर ‘गुड आफ्टरनून’ केल. खरंच खूप बेकार वाटत आहे. सगळंच उदास वाटत आहे. मुळात मीच मुर्ख आहे. माझ्यामुळे सगळेच नाराज झाले आहेत. आणि आता ती देखील. ती बिझी असतांना मी तिला पिंग करून त्रास देतो. सारखा तिच्याकडेच पहात रहातो. बर हे कमी म्हणून की काय मेल पाठवून अजून तिला डिस्टर्ब करतो. नाहीतरी ‘मी चुका सम्राट’ आहेच. Continue reading

धन्यवाद

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल लाख लाख धन्यवाद. आज प्रतिक्रियेचा आकडा हजाराच्या पुढे गेला. खूप आनंद वाटतो आहे. सर्वांच्याच प्रतिसादांमुळे हे सव्वा वर्षाचे ब्लॉगबाळ चांगले दुडूदुडू धावते आहे. काय बोलावं अस झालं आहे आता. खर तर या प्रतिक्रियांचे आभार कसे मानावे तेच कळत नाही आहे. माझ्याकरिता नेहमीच स्फूर्तीचे आणि मार्गदर्शक ठरल्या आहेत. मी ‘माझ्यातच’ गुंतलेला असतो. आणि त्यातून बाहेर पडलो तर इतर गोष्टींवर लक्ष जाते. ह्याच प्रतिक्रियांच्या बळावर मी ‘अप्सरा’शी ओळख नसतांना बोलू शकलो. ह्या प्रतिक्रियांमुळे, माझ्या अनेक चुका सुधारल्या गेल्या. जर ह्या प्रतिक्रिया नसत्या तर कदाचित मी कधीच अप्सराच्या जवळ जायची हिम्मत केली नसती. आणि मलाही मित्र आहेत अस कधीच मानू शकलो नसतो. आणि तेही खूप चांगले. माझी बडबड ऐकणारे. मला समजून घेणारे. कसं कळलं असते? Continue reading

येजा वू

काय करू यार? देवाने माझ्या चित्रपटात तेच तेच सीन का टाकले तेच कळत नाही. बर ह्या विषयावर, मी खूप बोलायचे टाळत होतो. पण आज इतक्यांदा घडलं ना! सकाळी लवकर उठायचे ठरवून देखील आज मी उशिरा उठलो. आधीच खूप गोरा होता. दोन दिवस उन्हात भटकल्यामुळे आणखीन गोरा झालो. लेट मॉर्निंगची बससाठी सुद्धा धावपळ झाली. देवपूजा नाही झाली आज. बस स्टॉप गेलो तर ‘परीवहिनी’. गेल्या पंधरा वीस दिवसांपासून रोज कुठे ना कुठे दिसतातच. त्यांना विचारलं ‘बस गेली नाही ना अजून’. तर त्यांनी हसून ‘नाही’ म्हणाल्या. त्या गप्पा मारायच्या रंगात होत्या. असो, मी ‘टाळले’. मग पुन्हा एकदा, त्यांना पहिले तर त्या आपल्या हसरा चेहरा करून माझ्याकडे पहात होत्या. मग हे आधी कुठे तरी पहिले अस वाटायला लागले. बसमध्ये बसल्यावर, मी मुंबईला असतांना हे असल् ‘अर्धवट’, ‘अर्थहीन’ स्वप्न पडलेलं आठवलं. Continue reading

फक्त अप्सराच

कालचा दिवस. आहाहा! काल ती त्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये. आणि तिची ती निळ्या रंगाची ओढणी. आणि माझ्या ड्रेसचा रंग निळा. खूप छान वाटलं. काल देखील शेवटीच तिनेच ‘हाय’ केले. ती माझ्या डेस्कजवळून जातांना माझ्याकडे पहात जाते. आणि इतकी छान स्माईल देते. काल अस, दोन तीनदा घडलेलं. परवा तिची मीटिंग संपली. आणि मी त्या मीटिंगरूम च्या जवळून चाललेलो. खर सांगायचे झाले तर मुद्दामच. तिने मला पाहून इतकी छान स्माईल दिली. आजकाल आम्ही दोघेही एकमेकांसमोर आलो की हेच चालते. ती इतकी छान स्माईल देते. आणि लाजल्यासारखं हसतो. पण हालत खराब होते. काल मला तिच्याशी बोलायची खूप इच्छा होती. पण तिचे स्टेटस बिझी होत. म्हटलं ती कामातून फ्री होईल त्यावेळी बोलू. पण दिवसभर असंच. Continue reading

प्रेम आणि आकर्षण

म्हटलं तर फार फरक नाही. आणि म्हटलं तर खूप फरक आहे. म्हणजे खरं सांगतो. अप्सरा भेटण्याच्या आधी मला दर दहा मिनिटाला एक आवडायची. मुळात मुली एवढ्या सुंदर का असतात हाच न सुटलेला मला प्रश्न आहे. कालच्या त्या एका प्रतिक्रियेने मलाही थोडा वेळ असंच वाटलं होत, की मी अप्सराच्या सौंदर्यावर फिदा आहे? की मला ती खरंच आवडते? काल ती दिवसभर कुठे गायब झाली कुणास ठाऊक आणि त्यात ती प्रतिक्रिया. असंच अप्सरा बद्दल विचार करीत चाललो होतो. तर संध्याकाळची पाचची बस चुकली. मग आणखीन वैताग आला. कारण त्यापुढची बस ७:४५ ला. मग जणू काही जेल मध्येच आहे अस वाटायला लागले होते. ती नव्हती तर कंपनीत एक एक मिनिट काढणे खूप त्रासदायक वाटत होते. पुन्हा माझ्या फ्लोरवर जाण्यासाठी निघालो. मनात तिची इतकी आठवण दाटून आली होती ना! गंगा यमुना यायच्या बाकी होत्या. Continue reading