मुलगी झाली

एक गोड बातमी आहे. उशिरा सांगतोय, याबद्दल क्षमस्व! गेल्या महिन्यात, म्हणजेच नोव्हेंबरच्या दोन तारखेला दुपारी अडीचच्या सुमारास आमच्या घरी ‘कन्यारत्ना’चे आगमन झाले. बाळ आणि बाळाची आई दोघेही सुखरूप आहेत. बाळाचे दोन्ही आजी आजोबा जाम खुश आहेत. आणि बाळाचे बाबा बाळाच्या लीलात मग्न झाल्याने बोलायला उशीर झाला. Continue reading

Advertisements

कोणाला निवडावे?

चित्रपटाची सुरवात एका गोड कार्यक्रमाने होते. नायक घरी पोहचतो. नायकाला नायकाच्या वडिलांनी मुलीचे वडील येणार हे सांगण्यात आलेले असते. घरी पोहोचताच, तो मुलीच्या वडिलांसोबत आलेल्या मुलीला आणि इतर नातेवाईकांना पाहून तो चकित होतो. आयुष्यातील त्याचा ‘पाहण्याचा’ पहिला कार्यक्रम असतो. Continue reading

बाईक घेतली

एक आनंदाची बातमी द्यायची आहे. शेवटी दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तिची ‘चाक’ माझ्या घराकडे वळली. तिची म्हणजे बाईकची. मी मागील डिसेंबरच्या सोळा तारखेला तिला म्हणजे हिरो होंडा पॅशन प्रो बुक केलेली. आज माझा मित्र आणि मी तिला आणायला गेलेलो. आकाशी रंगाची, ती सकाळी आकाराच्या सुमारास शोरूम मधून घेतली. घरी आल्यावर तिची पूजा केली. या कार्यक्रमाला ‘प्रमुख पाहुणे’ ‘अआई’ होती. इमारतीच्या गच्चीत बसून त्यांनी ह्या सोहळ्याला उपस्थिती लावली. माझ्या मित्राने पूजा सांगितली. तसे दोन देडफुटे या कार्यक्रमाला हजर होते. कार्यक्रमाचे स्थळ माझ्या इमारतीच्या बाजूला जोडून असलेले साई मंदिरा समोरील जागा. Continue reading

फ्लेक्स

मी बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभा असतो. स्टॉपच्या समोरच्या बाजूला एक इमारतीचे चित्र असलेले जाहिरातीचे फ्लेक्स असते.’तुमचे स्वप्न साकार करण्याची संधी’ अस काहीस लिहिलेलं असते. बस येते. बस निघाल्यावर प्रत्येक चौकाचौकात वेगवेगळया बिल्डरांची अगदी अनाकलनीय फ्लेक्स असतात. एका बिल्डरची जाहिरातीच्या फ्लेक्समध्ये संध्याकाळची वेळ, एक मुलगी शेतात दोन्ही हात लांब करून पाठमोरी उभी आहे. आणि बाजूला लिहिले असते ‘युअर ड्रीम होम’. त्याच्या बाजूलाच दुसऱ्या फ्लेक्सवर एक तरुण हसऱ्या चेहऱ्याने, कदाचित बाजूच्या दोन लहान मुलांचा बाप असावा. त्याच्या दोन मुलांसोबत गोट्या खेळतांना. आणि बाजूला लिहिले असते ‘कंट्रीयार्ड’. बस पुढे निघते. Continue reading

आई ग

किती सतावते यार ही आई! गेले किती वर्षांपासून हे चालू आहे. प्रत्येक रुपात ती त्रास देते. आतापर्यंत नऊ अवतार झाले तिचे. बाबा ‘बिल्लू’ गेटच्या बाहेर का नाही हाकलून देत? गेले एक आठवड्यापासून एक पिल्लुसा टास्क करतो आहे. तरीही त्या आईच्या बाळ ‘बग’मुळे तो लांबतच चालला आहे. प्रत्येक डिझायनर आणि डेव्हलपर आयुष्यातील सर्वात जास्त वेळ आईच्या मस्तीखोर ‘बग’ सुधारण्यात घालवतो. बाकीचे कसे, म्हणजे फायरफॉक्स उर्फ मोझीला किंवा बाळ क्रोम. हव तर सफारी, ऑपेरा घ्या. कस समजुदारपणे आणि नीटनेटके काम करतात. Continue reading

मम्याव

काल मित्राशी बोलत होतो. मला म्हणाला माझ्या मुलीचे मी ‘इंग्लिश’ मिडीयममध्ये शिक्षण करील. ती अजून दहा दिवसाची सुद्धा नाही. तो खुश होता. ‘बाप’ माणसाचा आनंद. संध्याकाळी घरी आलो तर, बाजूची चिमुरडी तिच्या आईला आई न म्हणता ‘मम्याव’ म्हणून हाक मारीत होती. ऐकून हसू आले. परवापर्यंत ती आई म्हणून हाक मारायची. बहुतेक ही तो तिच्या ‘मम्मी’ची इच्छा! मी जिथे रहातो तिथे ही चिल्लर कंपनी खूप आहे. सगळेच ‘देड फुटे’. मजा येते. नुसतीच दंगामस्ती चालू असते. खेळ काहीही! मध्यंतरी पावसानंतर पाण्यात उड्या मारत बसलेली. त्याचे बोबडे बोल! हसू येते. Continue reading

पसंत कर

मागील शुक्रवारी घरी गेलो होतो. रविवारी संध्याकाळी आलो. यावेळी देखील तोच रटाळ झालेला विषय. पण, यावेळी खरंच खूप बोर केल आईने. वडील ‘स्थळ पसंत कर’ बद्दल काहीच नाही बोलून. आणि आई खूप खूप बोलून बोर करते. दरवेळी गणपती उत्सवात आमच्या गल्लीतील गणपती मंदिरात आम्ही भंडारा करीत असतो. यावेळी शनिवारी कार्यक्रम ठरवलेला. म्हणून गेलेलो. मस्त झाला. कढी, भात आणि लाप्शी (गुळाचा शिरा). दरवेळी अडीचशे तीनशे पानांचा स्वयंपाक असतो. शुक्रवारी रात्री घरी गेलो. रात्री साडेबारा वाजेपर्यंत मित्रांसोबत गप्पा झाल्या. म्हणजे तसे लवकरच संपल्या म्हणायच्या. रात्री एक वाजता नेहमीप्रमाणे. नेहमीप्रमाणे म्हणजे आमच्या गावी अस आठवत नाही, पण किमान तीन चार वर्ष सहज झाले असतील. रात्री एक वाजता वीज जाते. सकाळी सात वाजता येते. पुन्हा सकाळी दहा वाजता जाते. ते थेट संध्याकाळी सहा वाजता येते. आणि रात्री एक पर्यंत असते. मलाच काय गावालाच राग यायचा बंद झाला आहे. वीस वर्षांपासून पाणी सुद्धा पाच दिवसांनी म्हणजे महिन्यातून सहावेळा (महिन्यातून सहा तास). बोला ‘जय जय महाराष्ट्र माझा’. सोडा, आई साहेबांना पंखा बंद झाल्यावर जाग आली. Continue reading