पुन्हा विरह

कालचा दिवस इतका मस्त! सकाळी येतांना आईने घरून करून आणलेला फराळ आणला. खर तर फराळाला घरी ये अस तिला म्हणणार होतो. पण हे सांगायची हिम्मत करता करता पुढची दिवाळी यायची. आणि जरी हिम्मत केली असती तर, तिची आणि माझी इतकी कुठे मैत्री आहे? की ती माझ्या म्हणण्यावर येईल. आणि त्यात ती तिच्या घरी गेल्यावर दिवाळी नंतर येणार. त्यामुळे काल मी कंपनीत येतांना फराळ आणला. घरून निघाल्यावर तिला पिंग करू की इमेल हा विचार करण्यात कंपनी आली. मग शेवटी इमेल करू अस ठरवलं. एकटीलाच बोलावले असते तर, तिला शंका यायची. म्हणून सगळ्या मित्रांची नावे आणि तिचे नाव बीसीसी मध्ये टाकून मेल टाकला. Continue reading

Advertisements

का हा दुरावा?

कसं बोलावं? ती गेले दोन दिवसांपासून ऑफिसमध्ये आलेली नाही. बहुतेक सुट्टी घेऊन घरी गेली असावी. मला खूप आठवण येते आहे. दोन दिवसांपासून तिने पाठवलेले सगळे मेल, तिच्याबरोबर झालेली चॅटची दोन पारायणे झाली आहेत. आणि वाचतांना तीचा तो छानसा चेहरा आठवतो. तो दोन ऑगस्ट आठवतो. ज्या दिवशी मी तिच्याशी पहिल्यांदा बोललो तो दिवस. आणि तिचे तीन ऑगस्टचे ‘हाय’. आणि परवाचे ‘हाय डियर’.. अगदी भरून आल होत मन. दोन दिवसांपासून मी नॉर्मल असल्याचा खूप खूप प्रयत्न केला. पण आता खरंच कंट्रोल नाही होत. Continue reading

बेकार

आज खरच खूप बेकार वाटत आहे. ऑफिसला आज मी उशिरा आलो आहे. खर तर येणार नव्हतो. पण आलो. तिची खूप आठवण येत होती. एक दिवस घरी राहून पहिले. माझा अभ्यास व्यवस्थित होत आहे. परंतु तिची खूप आठवण येत होती. आज दुपारी मनावर खूप कंट्रोल ठेवायचा प्रयत्न केला. पण नाही झाल कंट्रोल. आज बिन दाढीचा. तिने अजून मला पहिले नाही आहे. खूप बेकार वाटतो आहे. असो, तिला ‘हाय’ केल. पण पुढे बोलण्याची हिम्मत झाली नाही. Continue reading

परीस्पर्श

कस सांगू यार, परीचा स्पर्श झाल्यापासून सगळंच खूप छान वाटत आहे. परवा कंपनीची बससाठी मी नेहमीप्रमाणे उभा होतो. माझ्या रुटला दोन बसेस आहेत. एक माझ्या कंपनीच्या मुख्य इमारतीसाठी आणि दुसरी जिथे मी काम करतो. मी आणि ‘परी’ त्या दुसर्या बसमधून जात असतो. त्या दिवशी पहिली बस आली. पण त्याचा चालक दुसर्या बसचा म्हणजे ज्या बसने मी नेहमी जातो त्या बसचा. परी आणि मी ती माझीच बस म्हणून त्यात चढलो तर आतमधील लोकांनी मला ही मुख्य इमारतीची बस आहे असे सांगितले. मी आणि ती खाली उतरत असतांना चुकून माझा आणि तिचा ‘स्पर्श’. Continue reading

सर्दी

परवा पासून ही सर्दी जाम मागे लागली आहे. बर सर्दी झाली ती सुद्धा उन्हाळ्यात. तसे मी कधीच आजारी पडत नसतो. पण यावेळी पडलो. अंगात जीवच नसल्याप्रमाणे वाटत आहे. काल दिवभर झोपून होतो. सर्दीमुळे थोडा खोकला आणि आवाजात बदल झाला. माझ्या डोळ्यात पाणी आले तरचं सर्दी होते. नाहीतर कितीही पाऊस असला तरी काही फरक पडत नाही. एकतर ‘मिनी आठल्ये’ पुन्हा आपआपल्या घरी गेल्यापासून जाम एकटेपणा जाणवतो आहे. त्यात आई देखील गावी गेलेली. मी इथे एकटाच. सगळ्यांची खूप आठवण येते. Continue reading

आंधळे आणि पांगळे

एका गावात दोन मित्र रहात असतात. एकाचे आडनाव आंधळे. आणि दुसऱ्याचे आडनाव पांगळे. आंधळे शाळेत हुशार असतो, तर पांगळेला अभ्यासात बिलकुल रसच नसतो. दिवसभर मारामाऱ्या आणि भांडणात त्याचा दिवस जात असतो. अस असून देखील दोघांची दोस्ती पक्की. हळहळू दोघेही मोठे होतात. आंधळे वकिलीचे शिक्षणासाठी मोठ्या शहरात निघून जातो. पांगळे राजकारणात पडतो. इकडे आंधळे शिक्षण पूर्ण करून वकील बनतो. तर तिकडे पांगळे आमदार बनतो. बऱ्याच वर्षांनी दोघेही आपआपल्या क्षेत्रात उच्च पदावर पोहचतात. Continue reading

गप्पांना विराम

आज मी माझी ऑर्कुट, फेसबुक, हायफाय, जी टाल्क, स्टायल एफ एम, लिंक्ड इन यातील खाती बंद केली. थोडक्यात, गप्पांना विराम दिला. काही दिवसांपासून अस करू का नको याचा विचार करत होता. आज करून टाकल. कंपनी बदलल्या पासून मित्रांचे खुपंच ‘खतरनाक’ अनुभव येत होते. म्हणजे सगळेच एकदम प्रोफेशनल्स सारखे वागत होते. आता आपल्यांना काय म्हणणार? सगळेच मराठी. आपलेच दात आणि आपलीच जीभ. आणि त्यामुळे या नवीन कंपनीत आल्यापासून तसल्या फंदात पडलो नाही. मी कोणाशीही बोलायला गेलो तर त्याचं प्रत्युतर येतंच नसायच. उलट काहींनी मला ब्लॉक केल. असो, अस काही घडेल याची कल्पना नव्हती. बर त्यांचा रिप्लाय का नाही आला म्हणून विचार करण्यात माझा अख्खा दिवस जायचा. Continue reading