पुन: हरी ब्लॉग

कशी सुरवात करू तेच समजत नाही आहे. अनेक दिवसांनी, पुन्हा: एकदा ब्लॉग सुरु करतो आहे. खर तर काय बोलावं, आणि कशी वाक्यरचना करावी यातच घोळ होतो आहे. खूप दिवसांनी बोलतोय म्हणून कदाचित अस घडत असेल. पण, मनात आनंद मात्र नक्की होतोय. मध्यंतरी मी, एक-दोन ब्लॉग सुरु करून पाहण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात मन नाही रमलं. आजकाल कामामुळे वेळ काढणे म्हणजे फारच अवघड बाब बनली आहे. पण, ब्लॉग सुरु करण्याची ‘इच्छा’ फार डोकावत होती. चला, आतापासून पुन्हा हरी ब्लॉग.
Continue reading

Advertisements

निवड

खर तर खूप गोंधळलो होतो. निवड कोणाची करावे हेच कळत नव्हते. पण, निर्णय घेतला आहे. खर तर मागील महिन्याच्या म्हणजे १३ फेब्रुवारीला मी माझा ‘होकार’ एका स्थळाला कळवला. आणि त्या मुलीनेही १४ फेब्रुवारीला तिचा होकार कळवला आहे. हाहा! काय बोलू यार मी? तिला माझ्याबद्दल काय माहिती आहे देव जाणे. आणि मी तर तिला एकच प्रश्न विचारलेला. नुसत्या तीस मिनिटांच्या बेसवर हा निर्णय घेतला आहे. Continue reading

कोडे

काय बोलू यार! ती खूपच छान आहे. पण तिचे इमेल म्हणजे एक ‘कोडे’च असते. प्रत्येक वेळी मी गोंधळून जातो. म्हणजे सगळ्याच इमेल नाही. आजकाल आमच्या दोघांचे रोज एक इमेल पाठवणे चालू असते. खूप छान वाटते, ज्यावेळी तिचा इमेल येतो. आणि त्याहून आनंद होतो, ज्यावेळी ‘टू’ फक्त मीच असतो. आज एक मस्त कोडे पाठवलेल तिने! पहा जमत आहे का? मी सोडवलेल, सोप आहे. तुमची आय क़्यु चेक करा..

Continue reading

घटस्फोट

खूप आनंद होत आहे. काय करू काय नाही आणि अस झाल आहे. कालच एका स्थळाचा ‘मला’ पाहण्याचा कार्यक्रम झाला. मला ते ‘स्थळ’ पसंत आहे. आणि तिलाही ‘मी’. दोघांची पसंती झालेली आहे. बस काय तो ‘होकार’ येणे बाकी आहे. त्यांचा ‘होकार’ आणि ‘प्रेमपत्र’ आले की, माझ्या सध्याच्या ‘भार्या’ला घटस्फोटाची नोटीस देऊन टाकील. खूप नखरे सहन केले तिचे. आणि विशेषत: तिच्या आईची. जणू काय माझाशी लग्न केले म्हणजे ‘उपकार’ केल्याची भाषा. तशी तिची काय चुकी म्हणा? ‘सासू’बाई. फारच पाडून बोलायच्या. चुका त्या करणार, आणि ‘सॉरी’ मी म्हणायचे. वर्षभर सहन करतो आहे. Continue reading

बोरकर

खरंच खूप आनंद होत आहे. काय सांगू, आज मी तिला इतक बोर केल की, तिने मला शेवटी मी बिझी आहे. अस म्हटलं. खरंच मी खूप बोर करणारा आहे. कोण कामात आहे आहे, कोण मोकळ आहे हे सुद्धा कळत नाही मला. तिच्या प्रोजेक्टमध्ये खूप काम आहे. आणि मी सारखा पिंग करून तिला त्रास देतो. सर्वांनाच मी खूप बोर करतो. फोनवर बहिणाबाईला, घरी आई वडिलांना. आणि कंपनीत तिला. काय बोलावं, तेच कळत नाही आहे. Continue reading

प्रश्न सुटला

कालची ती दुपार. किती मस्त गेली म्हणून सांगू. काल सकाळी काकू टपकल्या. डायरेक्ट डेस्कवर. काकू आलेल्या पाहून खर तर खूप आनंद झाला. म्हणजे मला वाटलं आता ती नक्की येईल. असो, पण ती आली नाही. काकू खूप वेळ होत्या डेस्कवर पण शेवटपर्यंत ती आली नाही. असो, एक प्रश्न अडला होता ना मला. तो इमेज मधील टेक्स्ट रीड करायचा. तो सुटला. माझ्या दाजींनी मला एक टिफ फोर्मेटची इमेज मेल केली होती. आणि ती इमेज मधील टेक्स्ट मला रीड करून राईट करायचे होते. कुठेही वर्ड किंवा नोटपॅडमध्ये. एक मायक्रोसॉफ्टचे एक बंडल सॉफ्टवेअर आहे. नाव आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस डॉक्युमेंट इमेजिंग. Continue reading

माझी प्रतिक्रिया

मी माफी मागतो, मला येणाऱ्या प्रतिक्रियांना काहीच उत्तर देत नाही म्हणून. मी प्रतिक्रिया न देण्यामागे, मी फार मोठा किंवा वेळच नसतो अस काहीच नाही. उलट तुम्ही माझ्याशी बोलता. खूप चांगल वाटत. आनंद वाटतो. मलाही समजून घेणारे मित्र असल्याचा आनंद, निराळा आहे. मला येणाऱ्या प्रतिक्रिया माझ्यासाठी आदर्श आणि मार्गदर्शक असतात. मी माझ्या मित्रांशी या विषयावर गप्पा मारल्या तर ते ‘बोर’ करू नको असे म्हणतात. Continue reading