इंग्रजी भाषा

मी आज एक नवीन ब्लॉग बनवला आहे. ‘इज इट करेक्ट?‘ नावाचा. मुळात माझ आणि इंग्लिशच कधी जमलंच नाही. अगदी शाळेत असल्यापासून. तसं यावेळची बीसीएची परीक्षा सोडली. तर याआधी कधी ह्या इंग्लिश विषयात कधी गटांगळी देखील खाल्ली नाही. पण कधीच इंग्लिश विषय आवडला नाही. गणिताशी अस काही नव्हत. कारण, बर्यापैकी मार्क्स मिळून जायचे. पण आता इंग्लिश सुधारावे अस खूप वाटत आहे. Continue reading

Advertisements

मम्याव

काल मित्राशी बोलत होतो. मला म्हणाला माझ्या मुलीचे मी ‘इंग्लिश’ मिडीयममध्ये शिक्षण करील. ती अजून दहा दिवसाची सुद्धा नाही. तो खुश होता. ‘बाप’ माणसाचा आनंद. संध्याकाळी घरी आलो तर, बाजूची चिमुरडी तिच्या आईला आई न म्हणता ‘मम्याव’ म्हणून हाक मारीत होती. ऐकून हसू आले. परवापर्यंत ती आई म्हणून हाक मारायची. बहुतेक ही तो तिच्या ‘मम्मी’ची इच्छा! मी जिथे रहातो तिथे ही चिल्लर कंपनी खूप आहे. सगळेच ‘देड फुटे’. मजा येते. नुसतीच दंगामस्ती चालू असते. खेळ काहीही! मध्यंतरी पावसानंतर पाण्यात उड्या मारत बसलेली. त्याचे बोबडे बोल! हसू येते. Continue reading

पण

मी मराठी आहे पण, मी कधीच मराठी चित्रपट पाहायला चित्रपटगृहात जात नाही. हो खरंच! मी मराठीच आहे पण, माझ्या ट्विट्स आणि फेसबुकवरील सर्व स्टेटस ‘इंग्लिशमधून’ असतात. कॉमेंट्स देखील मी ‘इंग्लिश’ मधून टाकतो. त्यासाठी मराठीचा वापर करीत नाही. काय बुवा! आता नेटवरही मराठी मराठी कशाला? माझी ‘सही’ देखील मराठीत नाही. मी लिखाण सुद्धा मराठीत करीत नाही. पण मी मराठी आहे. मी गप्पा देखील मराठीत करीत नाही. आणि कंपनीत तर छे बुवा! कुठे पण मराठी कसं बोलायचे? आता सिनिअर लोक मराठी कुठे आहे? आणि ‘हिंदी’ बोललं तर बिघडलं कुठे?. Continue reading

आमची कार्टी

काय बोलावं अस झालं आहे. दुपारी जेवण करून मी माझ्या मित्रांसोबत सहज कंपनीच्या इमारतीला फेरफटका मारीत असतांना, माझा मित्र त्याच्या मुलीच्या इंग्लिश शब्दांबद्दल मोठ्या अभिमानाने सांगत होता. त्याची प्रेमाची गाडी वळून ‘मराठी मिडीयम आणि कॉनवेंट’ यातील फरकावर आली. आणि साहजिकच मराठी मिडीयमचे कसे कच्चे यावर सुद्धा. त्याला तिथेच मी मराठी मिडीयम आणि कॉनवेंट यातील फरक सांगितला. असो, पण खूपच बेकार वाटत आहे. काय कोणाला बोलायचे आता? Continue reading

परीक्षा

उद्या माझा बीसीएचा पहिला पेपर. तस् आता परीक्षा आणि मुलाखती यात काही नवीन राहिले नाही आहे. काय माहित काय होईल. माझाकडे जुन्याच अभ्यासक्रमाची पुस्तके आहेत. पण चिंता नसावी. बेसिक कॉम्पुटर आणि इंग्लिश असा पेपर आहे. जेवढ जमेल तेवढ वाचून जातो. जे येईल ते लिहील. आणि उरलेल्या गोळ्या. यार अस, शिकायला कधी आवडलंच नाही. थोडक्यात ‘ढ’. कसाबसा साठ बासष्ट टक्के. असो, आता बोलण्यात काही अर्थ नाही तो विषय. कारण इतिहासात, म्हणजे माझ्या इतिहासात मी खूप दिव्य पराक्रम केलेले आहेत. Continue reading

मजेदार भाषांतर

शुद्ध मराठी खूप मजेदार आहे. विशेषतः ज्यावेळी आपण भाषांतर करतो. म्हणजे ‘बिल गेट्स’चे मराठीत ‘शुल्क पत्रकाचे दार’, जॉर्ज बुश चे मराठीत भाषांतर ‘झाडी हवाबाज’, बराक हूसेन ओबामा चे भाषांतर ‘धन्य एक सुंदर तुला’, ‘इंडिया’चे भाषांतर ‘पाण्याचे शरीर’, ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे मराठीत ‘भारताची वेळ’ होईल . असे अनेक मजेदार प्रकार आपण रोजच्या जीवनात वापरतो. Continue reading

आला आला वारा..

दोन दिवस असा पुण्यात पाऊस पडला की काय सांगावे. कधी आला आणि किती वेळ पडला हे देखील कळले नाही. पण त्या टी-ट्वेंटी२० पेक्षा अधिक जास्त धुमाकूळ घालून गेला. काल सकाळी कंपनीत बसमधून जातांना सहजच रस्त्यांच्या बाजूला असलेले जाहिरातींचे मोठ मोठे फ्लेक्स बोर्ड पहिले तर फाटलेले. काही काही तर तुटून पडलेले. हिंजवडी, बालेवाडी, चिंचवड, शिवाजीनगर, चतुश्रुंगी, पिंपरी, निगडी, पुणे स्टेशन आणि जवळपास पुण्यातील सगळीकडेच पन्नास टक्के फ्लेक्स एकतर फाटले आहेत किंवा बोर्ड तुटून पडलेले आहेत. ते एक गाणे आहे ना ‘आला आला वारा संगे पावसाच्या धारा’ अगदी तसे पुण्यात घडले आहे. Continue reading