पुन: हरी ब्लॉग

कशी सुरवात करू तेच समजत नाही आहे. अनेक दिवसांनी, पुन्हा: एकदा ब्लॉग सुरु करतो आहे. खर तर काय बोलावं, आणि कशी वाक्यरचना करावी यातच घोळ होतो आहे. खूप दिवसांनी बोलतोय म्हणून कदाचित अस घडत असेल. पण, मनात आनंद मात्र नक्की होतोय. मध्यंतरी मी, एक-दोन ब्लॉग सुरु करून पाहण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात मन नाही रमलं. आजकाल कामामुळे वेळ काढणे म्हणजे फारच अवघड बाब बनली आहे. पण, ब्लॉग सुरु करण्याची ‘इच्छा’ फार डोकावत होती. चला, आतापासून पुन्हा हरी ब्लॉग.
Continue reading

Advertisements

फेडअप

खुपंच खजील झाल्याप्रमाणे वाटत आहे. काल देवाने इतकी चांगली संधी दिली. आणि मी ‘नेहमीप्रमाणे’ गाढवपणा केला. तिने काल स्वतःहून मला पिंग केलेलं. याआधी एकवीस सप्टेंबरला, म्हणजे मागील महिन्यात माझ्याशी मोकळेपणाने बोलली होती. त्यानंतर काल. आणि त्यावेळेसही माझ्यातील चुका समोर आलेल्या. आणि कालही. कालचा दिवस कसा गेला म्हणून सांगू. माझ्या फ्लोरवर जातांना कॅन्टीनमध्ये ती दिसली. तो लाल रंगाचा ड्रेस. देवाचे उपकार म्हणायचे तिचे लक्ष नव्हते. नाहीतर तीचा तो नेत्रकटाक्ष. ती तीच्या मित्राशी बोलत होती. तीच्या जवळून जातांना चक्कर आल्याप्रमाणे झाले होते. एकदा वाटले तिला तिथेच ‘हाय’ म्हणावे. पण ती समोर असतांना काय होते कुणास ठाऊक. काहीच करू शकत नाही. असो, डेस्कवर गेलो. Continue reading

स्वप्नाहून सुंदर

आजचा दिवस काय बोलू? आज तिचे हसणे. आणि तीचा चेहरा आठवतो आहे फक्त. आज तिने मला स्वतःहून पिंग करून गुड मॉर्निंग केले. किती दिवसांपासून ही इच्छा होती. आणि आज दुपारी एक चॉकलेट सुद्धा दिले. आणि तिचे ते हसणे. तीचा तो गोड आवाज. अजून कानात तोच घुमतो आहे. आज ती काय दिसत होती म्हणून सांगू! बस्स!! आता तीच हवी फक्त. कालचा दिवसाबद्दल न बोललेलं बर. कारण, मी ‘हरलो’ असंच वाटायला लागलेलं. मला सर्वजण तिच्याशी बोलत रहा म्हणून सांगतात. म्हणून मी काल दुपारी तिला पिंग केल. आणि तिने तासाभराने रिप्लाय. मला खरंच नाही झालं सहन. डेस्कवरच गंगा यमुनेचा बांध फुटायला लागला होता. कसबस स्वतःवर कंट्रोल ठेवलं. पण मित्र आल्यावर नाही रोखता आला. पहिल्यांदा अस प्रोफेशन लाईफमध्ये घडलं. इमारतीच्या बाहेर गेल्यावर सगळ् मन मोकळ केल. रात्री देखील विचारांनी हैराण झालो होतो. आज सकाळी कशातच मूड नव्हता. Continue reading

काय करू काय नाही

काय करू आणि काय नाही हेच कळत नाही आहे. एकीकडे ती इतकी आवडते ना! की तीच हवी हवीशी वाटते. पण तिला हे सांगायला भीती वाटते. मी रोज रोज हाच विचार करतो की, तिच्याशी काय बोलायचे. आणि मन कसं मोकळ करायचे तिच्यासमोर. पण मग ती दिसली की, श्वास नीट घेता येत नाही. घसा कोरडा पडून जातो. ‘प्रपोज’ करणे फार मोठी गोष्ट नाही. म्हणजे ही माझी पहिलीच वेळ आहे, पण मी तिला प्रपोज करू शकतो. फक्त तीच्या नकाराची भीती वाटते. ती नाराज होईल याची भीती वाटते. Continue reading

डियर

नाचावस वाटत आहे. काहीच सुचत नाही आहे. कालचा तो दिवस ‘वाळवंट’. आणि आज काय बोलू ‘धबधबा’. आज तिने मला गुड मोर्निंगचा मेल केला. आणि मी पिंग करून गुड मोर्निंग केल्यावर ‘हाय डियर, गुड मोर्निंग’ केल. बस अजून विश्वासच बसत नाही आहे. म्हणजे ती मित्र म्हणून म्हटली असेल कदाचित. पण काही का असेना. आज ती इतकी छान दिसते आहे म्हणू सांगू. बस तिलाच पहाव अस वाटत आहे. काल कसला गेला. रात्र देखील बेकार. विचारांनी डोके पकवून टाकलेले. त्यात हे सल्ले. काय म्हणतात त्याला ‘वॉट अन् आयडिया’. Continue reading

झोप

आज कामाच्या दिवशी साडेनऊला उठण्याचा भीम पराक्रम केला. त्यामुळे कंपनीची लेट मोर्निंगची बस देखील चुकली. आता रात्री तीन वाजता झोपल्यावर लवकर कशी जाग येणार? मला खरंच काहीच सुचेनासे झाले आहे. गेल्या महिन्यापासून मला तीन वाजेच्या आत झोपच येत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यावर खूप आळस येतो. आणि आता माझा चेहरा काळवंडून गेला आहे. ओठ देखील तसेच. दिवसा मी झोपत नाही. तरी सुद्धा रात्री तीन वाजेपर्यंत झोपच येत नाही. Continue reading

इच्छा

इच्छा ही गोष्ट अशी आहे की जी कधीच संपत नाही. एक संपली की दुसरी, चालूच. लहानपण मला कधीच आवडले नाही. कारण कोणतीच इच्छा माझी लहानपणी पूर्ण झाली नाही. खेळणी माझ्या लहान भावाला. मी मागितली की, मी त्याच्यापेक्षा मोठा म्हणून मला माझे आई वडील रागवायचे. तसे लहानपणी, सर्वच मला या ना त्या कारणाने रागवायचे. असो, मुंबईला आलो त्यावेळी ‘नेक्स्ट’मध्ये एक संगणक पहिला. आणि मला तो खूप आवडला. तो विकत घ्यायची इच्छा झालेली. तो मी दुपारी पहिला. आणि ताबडतोप वडिलांना फोन करून घेऊ का म्हणून परवानगी मागितली. त्यांनी हो म्हटल्यावर संध्याकाळी घेऊन घरी आलो. आता ती गोष्ट वेगळी की, तो विकत घेण्याची ताकद माझ्यात होती. ती माझी जीवनातील पहिली इच्छा, जी इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्धा लाख मोजावे लागले. Continue reading