किती कठीण..

ती दुपारी ऑफिसात येते. तिचा आणि माझ्या ड्रेसचा रंग सारखा. मला तिच्याशी बोलायची खूप इच्छा असते. पण कस? सुचत नाही. कॅन्टीनमध्ये मी मित्रांसोबत जेवायला बसतो. सर्वजण गप्पात रंगलेले असतात. मी तिच्या येण्याची वाट पाहत असतो. ती येते.. ती कोमल, ती सुंदर! ती गोड, ती छान! पाहून मी सुखावतो आणि हालहाल सुरु होतात. अगदी पहिल्यांदा पहिले त्यावेळी जस झाल होत तसं! तसं हे आता ‘नेहमीचेच’. मग तिच्याच आठवणी. जेवणानंतर, डेस्कवर बसल्यावर तिला पाहणे हाच ‘एक कलमी कार्यक्रम’ सुरु होतो. तिच्याशी कस बोलू? तिच्या डेस्कवर कसा जाऊ? काय कारण सांगू? सगळा विचार करतो. पण.. हा ‘पण’ मध्ये येतो. Continue reading

Advertisements

कोडे

काय बोलू यार! ती खूपच छान आहे. पण तिचे इमेल म्हणजे एक ‘कोडे’च असते. प्रत्येक वेळी मी गोंधळून जातो. म्हणजे सगळ्याच इमेल नाही. आजकाल आमच्या दोघांचे रोज एक इमेल पाठवणे चालू असते. खूप छान वाटते, ज्यावेळी तिचा इमेल येतो. आणि त्याहून आनंद होतो, ज्यावेळी ‘टू’ फक्त मीच असतो. आज एक मस्त कोडे पाठवलेल तिने! पहा जमत आहे का? मी सोडवलेल, सोप आहे. तुमची आय क़्यु चेक करा..

Continue reading

वनवास संपला

किती सतावलं यार तिने! पण आता मस्त वाटत आहे. काल दुपारी मला तिने दोन इमेल पाठवले. किती मस्त. आणि आज मी आता एक इमेल तिला पाठवला आहे. आणि पिंग करून गुड मोर्निंग सुद्धा केल. कालपासून सगळंच छान वाटत आहे. दोन नोव्हेंबरला मला तिने स्वतःहून पिंग करून ‘गुड मोर्निंग’ केलेलं. त्यानंतर काल दुपारी तिचे दोन इमेल. मध्यंतरीच्या काळात का रागावली होती कुणास ठाऊक! मी तिला दिवाळीनंतर दहा तारखेला पिंग केलल. पण तिने रिप्लाय दिलाच नव्हता. वाटल ती बिझी आहे म्हणून. नंतर स्वतःहून करेल. पण त्यानंतर ना तिचा इमेल आणि ना साधे पिंग. बरोबर चौदा दिवस. पण अशी माझी काय चूक झाली होती, काय माहित. Continue reading

विनंती

‘आवरा’ साहेबांना, व सर्व ‘आवरा’ परिवाराला एक विनंती आहे. आपण सर्वज्ञानी आहात. खर तर आपणाबद्दल मी बापुडा काय बोलणार. म्हणून विनंती करीत आहे. आपण आपला इमेल आयडी खरा टाकावा. दुर्दैवाने आपण कोण आहात हे कळल्यावर खरंच मला खूप दुख झाले. पण लपून काही बोलण्यापेक्षा सरळ बोलणे कधीही चांगले. काय करणार हे वेब आहेच असे आहे, सर्वच रेकोर्ड होत जाते. आपण केलेले क्लिक पासून ते वेळेपर्यंत. त्यामुळे माझ्यासारख्या कमी बुद्धीच्या माणसाला देखील सापडणे फार अवघड गेले नाही. परंतु आनंद या गोष्टीचा झाला की, आपण माझ्या नोंदींना भेट देता. Continue reading

इमेल

आता दुपारी मी तिला असाच एक मेल पाठवला होता. आणि तिने त्याचा रिप्लाय देखील केला. आणि पिंग देखील केल. काय सांगू, नाचावस वाटत आहे. आजही दुपारपर्यंत दिवस जाम टेन्शनमध्ये गेला. म्हणजे अस काहीच कारण नव्हते. ती आज काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये असली छान दिसते आहे ना! तिला ‘हाय’ करणार होतो. सोडा, मी पुन्हा तेच रिपीट करतो आहे. आज दुपारी जेवायला त्या नव्या कॅन्टीनमध्ये गेलो होतो. पण तीच माझ्याकडे लक्षच नव्हत. म्हणजे तिला कळल सुद्धा नाही, की मी होतो तिथे. यार माझ्या मनाचा ‘रिमोट’ तिच्याकडे गेल्याप्रमाणे वाटत आहे. Continue reading

वशिला

कोणी तरी सोडवा या ‘वशिल्या’च्या लफड्यातून. यार हे मित्र ना! ह्यांच्यापेक्षा नसलेले परवडले. काय करू, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. आणि ‘थोडा वशिला’ लाव म्हणतात. मागील आठवड्यात गावी चाललो होतो. बसमध्ये भेटलाच एक मित्र. घरापर्यंत माझ्या मागे जॉब लावून दे म्हणून. बर ह्याचे शिक्षण माझ्यापेक्षा जास्त. हातपाय हलवायला नको. मला म्हणाला ‘मी पुण्यात आलो की तुझ्याकडे येतो. मला तू सॉफ्टवेअर शिकव. मी तुझ्याकडे राहतो. कारण पैश्यांचा अडचण आहे. आणि तूच तुझ्या कंपनीत माझ्यासाठी जॉब बघ’. कसाबसा पिच्छा सोडवला. Continue reading

जहाल मुंगीची गोष्ट

मुंगी मुंबईहून पुण्याला आली. पुण्यातील हायफाय ठिकाणी असलेल्या एका कंपनीत तिने आपले काम सुरु केले. मुंगी रोज प्रामाणिकपणे कामावर यायची आणि आपल काम करत राहायची. त्या कंपनीचा मालक एक सिंह होता. सिंहाला असे वाटले की आपले काम वेगाने व्हावे यासाठी आणखीन एकाला कामावर ठेवावे. मुंगी करते त्याच कामातील थोड काम दुसऱ्या कोणी केल तर काम आणखीन लवकर होईल या उद्येशाने त्याने एका झुरळाला कामावर ठेवले. झुरळ मुंगीपेक्षा वयाने जास्त असल्याने मुंगी त्याला ‘सर्’ म्हणू लागली. झुरळ कंपनीत आल्यापासून आपल्या दिलेल्या कामापेक्षा सिंहाची दाढी कुरवाळण्यात जास्त वेळ घालवायचे. आणि सिंहाला देखील ते आवडायचे त्यामुळे सिंह कधीच काही म्हणत नसायचा. मग झुरळ जणू आपणच कंपनीचे मालक आहोत अस वागायला लागल. सारखं सारखं मुंगीच्या मागे लागायचं. आणि काम संपल्यावर ते काम मी केल अस सिंहाला सांगायचं. सिंह मग, शाबासकीची थाप त्या झुरळाला द्यायचं. Continue reading