झोपडपट्टी मॅन

‘अर्थ क्विक’ आल्याप्रमाणे चौहान ऑफिसातून धावत उपमुख्यमंत्र्यांच्या ऑफिसकडे निघाले. ऑफिसचा दरवाजा उघडणार, तेवढ्यात बाजूला असलेला शिपाई ओरडला ‘साहेब मिटींगमध्ये हायेत. अपोईमेंत घ्या’. चौहान शिपायाकडे बघून बोलला ‘तुमने मला ओळखा नाही क्या?’. शिपाई कान साफ करीत बोलला ‘तू असेल तुझ्या घराचा मुख्यमंत्री. मग मी काय करायचं? तुला काय मॅनर्स हाय का नाय. आपल उद्धटपणे घुसू राहिलास. कुणाशी बोलतो आहेस तू?’. चौहान गडबडून ‘अरे, मला जाऊ दे. मॅडमचा फोन आलेला’. शिपाई ‘आन मंग, ती तुझी मॅडम. मला काय सांगतोस तीच’. चौहान रागात ‘मी मुख्यमंत्री आहे. इम्पोर्टेड!’. शिपाई हसू लागला ‘आता एवढचं बाकी राहील. मघाशी गेले ते देखील हेच म्हणाले’. Continue reading

Advertisements

ती ती आणि ती

काय बोलू. कालचा दिवस एकदम ‘सही’. अजूनही शरीरभर रोमांच उठत आहेत. बस काय बोलू कालच्या दिवसात काय घडल ते. फक्त ती ती आणि ती. दिवसभर कम्युनिकेटरवर गप्पा मारल्या. आणि ती माझ्या डेस्कवर सुद्धा आलेली. यार, काल रात्रभर नीट झोप लागली नाही. शेवटी पहाटे साडेतीन चारला टीव्ही सुरु केला. पण तिथेही जाम बोर झाल. मुळात आज घरात जाम बोर झालेलं. तिच्या आठवणीने व्याकूळ करून टाकलेलं. खरच, तिच्याशिवाय नाही सुचत काही. ती इतकी छान, गोड का आहे? आणि स्वभावाने इतकी प्रेमळ आणि सरळ. तिची खूपच आठवण येत आहे. मला नव्हते घरात करमत. म्हणून आज, मी ऑफिसला आलेलो आहे. Continue reading

का हा दुरावा?

कसं बोलावं? ती गेले दोन दिवसांपासून ऑफिसमध्ये आलेली नाही. बहुतेक सुट्टी घेऊन घरी गेली असावी. मला खूप आठवण येते आहे. दोन दिवसांपासून तिने पाठवलेले सगळे मेल, तिच्याबरोबर झालेली चॅटची दोन पारायणे झाली आहेत. आणि वाचतांना तीचा तो छानसा चेहरा आठवतो. तो दोन ऑगस्ट आठवतो. ज्या दिवशी मी तिच्याशी पहिल्यांदा बोललो तो दिवस. आणि तिचे तीन ऑगस्टचे ‘हाय’. आणि परवाचे ‘हाय डियर’.. अगदी भरून आल होत मन. दोन दिवसांपासून मी नॉर्मल असल्याचा खूप खूप प्रयत्न केला. पण आता खरंच कंट्रोल नाही होत. Continue reading

वाट लावा

काय बोलव आता! काय चिंधेगिरी लावली आहे. आता माझ्या जुन्या कंपनीच्या सीए नां फोन केला होता. बर ही काही फोन करायची पहिली वेळ नाही. पुन्हा तेच ‘फॉर्म १६ लवकर देतो’. आता ती कंपनी सोडून सात महिने झालेत. माझ्या ह्या कंपनीचा ‘फॉर्म १६’ मे महिन्यातच मिळाला होता. आणि माझ्या जुन्या कंपनीचा गेल्या दोन वर्षाचा अजून फॉर्म १६ येतोच आहे. बंर कंपनी सोडायच्या वेळी मागितला होता. त्यावेळी आमचे पूज्य ‘बॉस’ लवकरात लवकर देतो असं म्हणाले होते. पण नंतर पूज्य दोन तीन महिने कुठल्या समाधित्त मग्न झाले, देव जाणे. Continue reading

बेस्ट फाईव्ह

साहेबांचा फोन वाजला. साहेबांनी डोळे चोळत फोन उचलला. एक मोठी जांभई दिली आणि ‘हल्लो, काही कळत नाही का? ही काय फोन करायची वेळ आहे का? कोण कडमडल?’ तिकडून उत्तर आल ‘माफ करा साहेब, मी तुमचा पीए बोलतो आहे. आता आपली ‘बेस्ट फाईव्ह’ची मिटिंग आहे’. साहेब कडाडले ‘अरे गाढवा, मिटिंग ठेवायची ही वेळ आहे’. तिकडून ‘साहेब दुपारचे चार वाजले आहेत. तुम्हीच तर मागील दोन महिन्यांपूर्वी त्या बोर्डवाल्यांना मिटिंगसाठी वेळ दिली होती’. साहेबांनी कंटाळलेल्या आवाजात ‘अरे झोपू दे रे,  त्यांना सांग साहेब आज खूप बिझी आहेत’. तिकडून ‘बऱ, त्यांना ऑफिस मधून काढतो बाहेर.’ साहेबांनी सुटकेचा निश्वास टाकला. पुन्हा साहेबांचा डोळा न लागतो तेच पुन्हा फोन वाजला. Continue reading

संगणक म्हणजे काय?

काल माझा जिवलग मित्र भेटला होता. असो, नाक दाबल्यावर तोंड उघडते अस म्हणतात ते काही चुकीच नाही. दुपारी जेवणानंतर सहज कामाविषयी विषय निघाला. तो मला माझ्या कामातील एका गोष्टीची माहिती विचारात होता. त्याला तो विषय समजून सांगण्यासाठी त्याला सहज प्रश्न केला की ‘संगणक म्हणजे काय?’. तो म्हणाला ‘म्हणजे?’. त्याला म्हटलं ‘ मला व्याख्या नको सांगू. मला फक्त एवढ सांग की संगणक कशाला म्हणायचं’. तो थोडा वेळ थांबून म्हणाला की ‘टीव्हीची सुधारित आवृत्ती म्हणजे संगणक’. झालं! दोन पाच मिनिटे मला हसूच आवरलं नाही. साहेब पाच वर्षांपासून ‘संगणक’ क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि साहेबांचा हुद्दा देखील मोठा आहे. पण संगणक म्हणजे नेमक काय याच उत्तर देता आले नाही. मग म्हणाला ‘संगणक म्हणजे मनोरंजनाचे साधन’. मग काय अजून हसू आवरेना. Continue reading

विंडोजच्या आईचा घो

आई कोणाला नाही माहित? बाबा विंडोज आणि आई हे तर सगळ्यांनाच माहिती आहेत. संगणक नावाच्या घरात दोघेही सुखाने राहतात. दोघांचा ‘बग’ नावाचा लाडका मुलगा. असा ‘आम्ही दोघे आमचा एक’ संसार. कुठल्या संगणक घरात राहत नाहीत ते सांगा. तिघे मिळून घरमालकाचे चांगलेच ‘वेलकम’ करीत असतात. जगातील सर्वात मोठ्या ‘मायक्रोसॉफ्ट’ बिल्डरच्या इमारतीत राहणारे कुटुंब. बाबा विंडोज रोज आपल काम फारच संथ गतीने सुरु करतात. त्यांचा बिझनेसचा लोगो ‘डंबरु’ आहे. आणि त्यांची ‘नॉट रिस्पोंडिंग’ ही टॅग लाईन. Continue reading