का सतावते?

का सतावते आहे ती? चार दिवसांपासून हेच चालू आहे. तसं काल तिने मला दोन मेल पाठवले होते. पण पिंग करून गुड मोर्निंग केल तर, रीप्ल्याच दिला नाही. मी मुर्खासारखा दिवसभर तिने अस का केल म्हणून विचार करीत बसलो. आणि दुपारचा उपास तर आता रोजचाच झाला आहे. यार, रात्री जेवणाची इच्छा होत नाही. आणि सकाळी भूक असून त्या मिल्क शेकवर राहावे लागते. ती त्या जुन्या कॅन्टीनमध्ये जेवते. ती मस्तपैकी घरून डबा आणते. आणि ते जुन्या कॅन्टीनमध्ये ‘जेवण’ पाहून भूकच मारून टाकावी लागते. Continue reading

Advertisements

डियर

नाचावस वाटत आहे. काहीच सुचत नाही आहे. कालचा तो दिवस ‘वाळवंट’. आणि आज काय बोलू ‘धबधबा’. आज तिने मला गुड मोर्निंगचा मेल केला. आणि मी पिंग करून गुड मोर्निंग केल्यावर ‘हाय डियर, गुड मोर्निंग’ केल. बस अजून विश्वासच बसत नाही आहे. म्हणजे ती मित्र म्हणून म्हटली असेल कदाचित. पण काही का असेना. आज ती इतकी छान दिसते आहे म्हणू सांगू. बस तिलाच पहाव अस वाटत आहे. काल कसला गेला. रात्र देखील बेकार. विचारांनी डोके पकवून टाकलेले. त्यात हे सल्ले. काय म्हणतात त्याला ‘वॉट अन् आयडिया’. Continue reading

लव्ह मॅरेज

काल रात्री काकाने घरी मला बोलाविलेले. म्हणून गेलेलो. जेवण झाल्यावर भिंग घेऊन माझ्या पंजावरील रेषा पाहत बसलेलो. घरी आहेत काही पुस्तके त्या हस्तरेषावर दहावीच्या सुट्टीत वाचलेली. दोन मिनिट झाले नसतील तर मैत्रीण आली. झालं, आल्यावर लगेच ‘मुलींचा कोणता पाहतात?’ विचारलं. ‘डावा’ म्हटल्यावर डावा हात दाखवला. आणि मला म्हणाली ‘सांग माझ काय होणार लव्ह की अरेंज मॅरेज?’. तिला सांगितले मला नाही कळत काही त्यातील. तरी ऐकेच ना. एकतर तिचे वागणे आजकाल मला भीतीदायक वाटत आहे. Continue reading

भोपळा

परीक्षेचा निकाल पाहण्याची गरज राहिलीच नाही. उलट भोपळा नाही मिळाला तर आश्चर्य असेल. आता अभ्यास न करता गेल्यावर हेच होणार होत. असो, चूक झाली. आणि मला ती मान्य सुद्धा आहे. अजून तीन विषय बाकी आहेत. याची कसर त्यात काढेल. नेहमी आजच उद्यावर ढकलले. परवा माझा मुंबईचा मित्र आलेला. तरी अभ्यास झाला असता. पण नंतर करून म्हणून राहिलं. त्याला काल दुपारच्या साडेतीनच्या ‘डेक्कन’ने बसवले. त्यानंतर साडेचारला मी घरी आलो. जरावेळ विश्रांती घेऊ म्हणून जरा झोपलो. तर साडेसातला जाग आली. Continue reading

मस्त

काय सांगू आणि काय नको अस झालं आहे आता. कालचा तो दिवस. दिवस कसला स्वप्नंच. परवाचा दिवस आणि ती रात्र. रात्री असली चित्रविचित्र स्वप्न पडली ना. असो, नीट झोपच आली नाही. काल सकाळी उठलो तरी सर्दी आणि डोकेदुखी कमीच होईना. व्यायाम करतांना खुपंच हाल झाले. शेवटी अर्धवट व्यायाम सोडला. सुट्टी घ्यावी अस मनात येत होते. पण गेलो तसाच. दाढी सुद्धा नाही केली. एकतर आधीच अशक्तपणा, त्यामुळे काळवंडलेला चेहरा आणि बिनदाढीचा. आणि ते बंडल कपडे. थोडक्यात ‘अवतार’ झालेला माझा. तसाच गेलो. डेस्कवर बसल्यावर ती ऑनलाईन आहे का ते पहिले. तर ती आलेली. खर तर काल मी तिला ‘गुड मोर्निग’चा मेल टाकायचे ठरवलेले. पण पिंग केले. सोडा, मी पण काय पान्हाळ लावत बसलो आहे. Continue reading

द्वंद्व

म्हणजे अगदी सुरवातीपासून, हे डोक्यात द्वंद्व चालू आहे. कधी वाटत ती माझी होईल. तिलाही मी आवडत असेल. पण नंतर तो शेपट्या किंवा तो शेंड्या तिच्यासोबत असला की, म्हणजे तेव्हाही काही नाही वाटत इतकं. पण ती हसून वगैरे बोलतांना पहिले तर. मग मात्र अस वाटायला लागते की, कधीच शक्य नाही. काल संध्याकाळी देखील असेच. मी जातांना ‘बाय’ करावं म्हटलं. आणि पीसी बंद करून निघणार तेवढ्यात ती समोर. तिचा चेहरा लाल झालेला. म्हणजे मी देखील खूप हसलो तर माझाही चेहरा असाच लाल होतो. ती हसत चाललेली. तिच्या डेस्ककडे पहिले ते ते दोन हिरो होतेच. शेंड्या आणि शेपट्या. मग मुडच गेला. ती मान खाली घालून माझ्या समोरून गेली. तरीही ‘बाय’ करायची इच्छा होती. पण नाही झाली हिम्मत. Continue reading

ताप

काल मी बर्याच दिवसांनी आजारी पडलो. त्याचे काय झाले, मी परवा आमच्या कंपनीत नवीन कॅन्टीनमध्ये दुपारी जेवण केले. जेवणातील भाजीने पोट खराब केले. मग काय, व्हायचे ते झाले. पोटात काहीच राहत नव्हते. आणि त्यामुळे अशक्तपणा आला. त्यामुळे आजोबांच्या पेक्षा जास्त वाईट अवस्था. हात पाय गळून गेलेले. रात्री खूप थंडी वाजायला लागली. सकाळी लवकर उठून देखील अंग दुखत असल्यामुळे पळायला गेलो नाही. पण व्यायाम केला. व्यायाम करतांना घाम आलाच नाही. खूप त्रास झाला व्यायाम करतांना. आणि डोके इतके दुखायला लागले की बास! काही विचारूच नका. Continue reading