विषय

वर्तमानपत्रातील ‘ए राजा’ची बातमी वाचून ह्या सरकारची किळस येते. डोके फिरते. रात्रीचे अकरा वाजलेले असतात. मी संगणक सुरु करतो. मी नोंद लिहायला बसतो. नोंदीचा विषय ‘ए राजा’. शंभर एक शब्द होत नाही तोच तिची आठवण येते. मी तीचा ‘फोटो’ न्याहाळत बसतो. तिचे पाणीदार डोळे. अस वाटते, ते काहीतरी बोलत आहेत. अर्धा तास निघून जातो. तिची खूप आठवण वाढते. मन त्या मृगजळामागे धावते. अनेक प्रश्न निर्माण करते. दिवस डोळ्यासमोर येतो. ती कधी माझ्याशी स्वतःहून बोलणार याचे मन विचार करू लागते. मेंदू तिला दहा दिवसांपासून साधी आठवण देखील आली नाही, याची जाणीव करून देते. तीच्या मनात आपल्यासाठी काहीच जागा नाही, हा निकर्ष निघतो. Continue reading

Advertisements

अस नेहमी का होत?

अस नेहमी का होत, की मित्रांच्या फालतू नखरे सुरु होतात. आणि त्यामुळे मी ज्यावेळी कॅन्टीनमध्ये जात असतो. आणि ती जेवण करून निघालेली असते. अस नेहमी का होत, की मित्राला एखादी मुलगी आवडते. आणि तो तिची माहिती मला शोधायला सांगतो. अस का? नेहमी मला तिची आठवण येते. सगळीकडे तीच दिसते. आणि तीच आवडते. स्वप्नातही मी तिलाच शोधतो. नेहमी अस का होत की, ती समोर आली की माझी गडबड होते. तिच्याशी बोलायची खूप इच्छा होते. पण समोर गेले की सगळ फूस होत. Continue reading

हे मित्र ना..

हे मित्र ना, काय करतील देव जाणे. आज दुपारी कॅन्टीनमध्ये चक्क ती ज्या रो मध्ये बसलेली तिथे जागा पकडली. हुश्श! हालत खराब झाली होती. आज सकाळी मला ती उदास वाटत होती. म्हणजे, तिचा चेहरा. मी माझ्या मित्राच्या डेस्कजवळ उभा असतांना ती तिच्या मैत्रिणीसोबत पाणी आणायला चाललेली. त्यावेळी तीला मी पहिले. पण.. सोडा. आज दुपारी, जेवायला जातांना पुन्हा मित्रांचे नखरे. तरीही हो नाही करीत आले नवीन कॅन्टीनला. पण मी कॅन्टीनमध्ये गेलेलों, तेव्हा ती नव्हती. मग विचार आला, ती जुन्याच कॅन्टीनमध्ये असेल तर. मित्रांना म्हटलं आता आपण जुन्या कॅन्टीनला जावू. अस म्हटल्यावर सगळेच चिडले. Continue reading

पुन्हा एकदा सगळ फूस

आता ना, माझा माझ्यावरच माझा विश्वास राहिलेला नाही. आजही ती कॅन्टीनमध्ये माझ्या जवळच्या बाजूच्या सीटवर, म्हणजे दोन सीट सोडून बसली होती. ती नाश्ता आणायला गेली. आणि माझी हिम्मतच होत नव्हती तिथे बसायची. काय करू, मी तिच्याशी बोलायची आरशासमोर खूप सराव केलेला होता. या शनिवार रविवार हेच तर केल. तिची खूप आठवण यायची. कोणी मुलगी दिसली तीच वाटायची. आणि आज मी लवकर उठून देखील आलो. पण सगळ फूस. Continue reading

आणि शेवटी ‘बाय’

काय छान सुरवात झाली होती. पण पुढे ना! खूप बेकार दिवस गेला आज. म्हणजे तो ‘शेंड्या’. तीच्या बाजूला बसतो. ती किती वेळ त्याच्याशी बोलली. ती डेस्कवरून गेल्यावर ना! अगदी नाचावसं वाटत होते. आणि मी खूप खुश सुद्धा. पण ती तीच्या डेस्कवर जाऊन बसली. मग झालाच तो सुरु. आता हिने सुरवात केल्यावर तो कसला सोडतो आहे. आता मला माहिती आहे, शेंड्या कंपनीच्या कामासाठी दोन एक वेळा जर्मनी वगैरे फिरून आला आहे. आणि मी जामनेर सुद्धा नाही. पण त्या शेंड्याला दुसरी कोण नाही भेटत का? खूप राग आला होता, त्याचा नाही ‘अप्सराचा’. ती खूप छान आहे. म्हणजे कोणीही फिदा होईल तिच्यावर. पण हा जर्मनी रिटर्न, नाकावरची माशी सुद्धा उठली तर शपथ. मला ना, गंगा यमुनेचा महापूर येण्याची शक्यता बळावली होती. अगदी दुपारपर्यंत चालू गप्पा. अस वाटायला लागलं होत की, तीला काहीच नाही वाटत माझ्याबद्दल. जे काही वाटत ते त्या शेंद्याबद्दल. खरंच नाही सहन झालं. मग मी माझ्या डेस्कवरून उठून गेलो. मला माहिती आहे, माझा तिच्यावर काहीच हक्क नाही. आणि दाखवायला सुद्धा नको. तीच्या आयुष्यात मी लुडबुड करणारा कोण? Continue reading

शोधू मी..

कुठे गेली यार ती! मी ना इतक्या ‘गाढवचुका’ करतो ना. माझा मलाच राग येत आहे. सकाळी ती कॅन्टीनमध्ये दिसली होती. आणि एकटी बसली होती. पण नेहमीप्रमाणे मी हिम्मतच नाही करू शकलो तिच्याशी बोलायची. आणि नंतर ती पुन्हा कुठे गायब झाली कुणास ठाऊक! अजूनही परतली नाही. मला खूप टेन्शन आल आहे. यार काय करू? डोके खूप दुखते आहे. सकाळपासून तिच्या डेस्ककडे पाहतो आहे. आज सुद्धा ती खूप छान दिसत होती. बोललो असतो तर काही फरक पडला नसता. आता दोन दिवस कसे जाणार? खरंच काही सुचेनासे झाले आहे. Continue reading

ताप

काल मी बर्याच दिवसांनी आजारी पडलो. त्याचे काय झाले, मी परवा आमच्या कंपनीत नवीन कॅन्टीनमध्ये दुपारी जेवण केले. जेवणातील भाजीने पोट खराब केले. मग काय, व्हायचे ते झाले. पोटात काहीच राहत नव्हते. आणि त्यामुळे अशक्तपणा आला. त्यामुळे आजोबांच्या पेक्षा जास्त वाईट अवस्था. हात पाय गळून गेलेले. रात्री खूप थंडी वाजायला लागली. सकाळी लवकर उठून देखील अंग दुखत असल्यामुळे पळायला गेलो नाही. पण व्यायाम केला. व्यायाम करतांना घाम आलाच नाही. खूप त्रास झाला व्यायाम करतांना. आणि डोके इतके दुखायला लागले की बास! काही विचारूच नका. Continue reading