खेद

संध्याकाळची सात वाजताची पुणे लोणावळा लोकल नेहमी प्रमाणे उशिरा आली. पण आनंदाची गोष्ट अशी कि ह्यावेळी गाडी उशिरा येणार याची सूचना दिली गेली. तीच रटाळ ‘हमे खेद है’ ची आकाशवाणी. पुण्यात लोकल उशाराची सवय सगळ्यांनाच झाली आहे. त्यामुळे कोणीही आजकाल चिडत नाही. घरी आल्यावर पंतप्रधानांनी ‘खेद’ व्यक्त केल्याची बातमी म.टा वर वाचली. चंडीगड येथील पीजीआयएमईआर या हॉस्पिटलमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पदवीदान समारंभ मंगळवारी झाला. त्यावेळी हॉस्पिटलच्या आवाराभोवती पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेचे कडे उभारण्यात आले होते. सुमीत वर्मा या किडनी पेशंटला या सुरक्षाव्यवस्थेमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होता आले नाही. पेशंट व त्याच्या नातेवाईकांना दोन तास ताटकळत रहावे लागले. परिणामी वर्मा यांचा गाडीतच मृत्यू झाला. मग पंतप्रधानांनी पत्र पाठवून ‘खेद’ व्यक्त केला आहे. Continue reading

Advertisements

शी इज द मेनचा हडीप्पा

परवा ‘दिल बोले हडीप्पा’ बघितला. खर सांगायचं झाल तर गाणी सोडून काही खास आवडल नाही. पण एक गोष्ट नक्की काही महिन्यांपूर्वी मी ‘शी इज द मेन’ ह्या इंग्लिश चित्रपटाची कथा चोरली आहे हे नक्की. दोन्ही चित्रपटात मूळ कथा सारखीच. आता तिकडे फुटबॉल प्रसिद्ध म्हणून त्यात फुटबॉलचा सामना दाखवला आहे. आणि यात आपल्या इकडे क्रिकेट प्रसिद्ध म्हणून क्रिकेटचा सामना. शी इज द मेन मध्ये नटी जशी मुलाचा वेश धारण करून फुटबॉल सामना खेळते तसंच इथ राणी मुखर्जी एका सरदाराचा वेश धारण करून क्रिकेटचा सामना खेळते. दोन्हीही ठिकाणी नटीच सामना विजयी करून देते. Continue reading

दंगल कोणाची हिंदूची की मुसलमानाची?

मागील दोन दिवसांपासून एक बातमी रोज वर्तमानपत्रात येत आहे. बातमी आहे मिरजेतील बिघडलेल्या वातावरणाबद्दल. सगळ्याच वर्तमानपत्रात अस लिहाल जातं की दंगल हिंदू- मुस्लीम मध्ये होत आहे. आता दंगल नेहमीच कुठे ना कुठे घडत असले. आणि अशा गणेश उत्सवात दंगली हा प्रकार काही नवीन नाही. आणि मला त्याबद्दल काही बोलायचे सुद्धा नाही. कारण मी काही आता मिरजेत नेमके काय घडते आहे हे काही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली नाही. पण वर्तमानपत्रातील नेहमी अशा प्रकारच्या बातम्यांच्या वेळी एक शब्द नेहमी वापरला जातो. आणि तो म्हणजे ‘हिंदू-मुस्लीम’. Continue reading