बोनस

आमच्या कंपनीत यावेळी बोनस काही होणार नाही. दिवाळी आणि दसरा हे सण जसे धार्मिक महत्व असते तसे आर्थिक देखील असते. दसऱ्याला घरी गेलो होतो. माझ्या लहान भावाला दसऱ्याला बोनस मिळाला. त्याबरोबर मिठाईचा बॉक्स देखील. स्वारी भलतीच खुश होती. आल्या आल्या विचारलं आईने ‘बोनस कधी मिळणार?’. आता हा प्रश्न याआधी काका, काकू, ‘ती’ ची आई, बहिण अशा सगळ्यांनीच विचारला होता. आणि सगळ्यांना दिलं तेच उत्तर मी आईला दिलं ‘यावेळी मिळल अस काही वाटत नाही’. मित्राचा आज इमेल आला होता. त्यात ‘हे सगळे बोनसची वाट पाहत आहेत, आणि तुम्ही?’, आणि खाली दहा पंधरा लाल रंगाच्या माकडांचा ग्रुप फोटो होता. पाहून त्याच्या देखील कंपनीत यावेळी बोनस नाही हे मी समजलो. Continue reading

Advertisements

मामा तुपाशी आणि भाचा उपाशी

सध्याला पुण्यात सभाच सभा होत आहे. सगळ्यांनाच पुण्याला यायला आणि भाषणाला वेळ मिळतो आहे. राहुल गांधी सोडून. राहुल गांधी आले. पुढे काय झाले तर ‘हाय आणि बाय’. जाऊ द्या ‘बडे लोग बडी बाते’. नंतर बोलू त्या विषयावर. नासाने चंद्रावर स्फोट घडवून आणले आहेत. चंद्रावर पाणी कुठे आहे, ते शोधण्यासाठी. आता नासाचा निर्णय घेण्यामागे काही ना काही तथ्य असेलच. काही दिवसांपूर्वी आपल्या भारताने चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावला. खूप मोठी कामगिरी केली. आपला भारतपण ना एक प्रश्नचिन्ह आहे. एका महिन्या आधीपर्यंत पुण्यात पाणी कपात चालू होती. एक वेळ तर अशी आली होती की पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उरला होता. कोल्हापुरात तर पाऊस पडावा यासाठी काही लोकांनी यज्ञ देखील केले. शेवटी पाऊस पडला. आता ठीक आहे. पाणी पूर्वीसारखे येते आहे. Continue reading

साडेसाती

माझे आई आणि वडील भविष्य, ज्योतिष शास्त्राला मानतात. आज रात्री माझी आई म्हणाली की तुझी आजपासून साडेसाती संपली. आता त्यांच्या मते मागच्या काही वर्षांपासून ज्या अडचणी मला येत होत्या त्याचे मूळ कारण साडेसाती हे होते. मध्यंतरीपासून मला आर्थिक अडचणी अनेक येत आहेत. म्हणजे मला माझी मिळकतीपेक्षा अधिक खर्च होत आहे. आता मी फालतू खर्च काहीच करत नाही. तरीदेखील असे होते. आता साडेसाती किंवा भविष्य यामुळे मला अशा अडचणी येत आहेत अस मी मानत नाही. घर घेतल्यापासून माझ्या मिळकतीतील एक मोठा हिस्सा लोनच्या हप्त्यात जातो. दुसर म्हणजे मी करत असलेली इन्शुरन्स कंपनीत गुंतवणूक. आणि हो मुख्य म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके सरकार. ह्या सगळ्या गोष्टींमुळे खर्चच खर्च होत आहे. त्यामुळे मानसिक ताण तणाव निर्माण होतात. Continue reading