आज बोललो

झालं एकदाचं. आज मी तिच्याशी तीच्या त्या नव्या डेस्कवर जाऊन बोललो. सकाळी कंपनीत आल्यावर तीचा मेल पहिला. किती छान. आणि त्यात ‘टू’ मध्ये सुरवातीला मी. अगदी मस्त वाटायला लागले. मग हिम्मत करून तीच्या डेस्ककडे निघालो. पण कालप्रमाणे, तीच्या डेस्कजवळ जातांना पुनः हिम्मत गेली. मग तिथून त्या एपीएमच्या डेस्कवर गेलो. मुळात काहीच कारण नव्हते. पण तरीही विषय काढला. तिथून निघालो त्यावेळी काहीच सुचत नव्हते. पण केली हिम्मत. डेस्कजवळ जाऊन हाय म्हणण्यासाठी तोंड उघडले तर आवाजच निघेना. तसाच उभा राहिलो. तीच्या लक्षात आले त्यावेळी तिने हाय केले. मग ‘कंठ फुटला’. आज माझा ‘अवतार’ झालेला. Continue reading

Advertisements

पसंत कर

मागील शुक्रवारी घरी गेलो होतो. रविवारी संध्याकाळी आलो. यावेळी देखील तोच रटाळ झालेला विषय. पण, यावेळी खरंच खूप बोर केल आईने. वडील ‘स्थळ पसंत कर’ बद्दल काहीच नाही बोलून. आणि आई खूप खूप बोलून बोर करते. दरवेळी गणपती उत्सवात आमच्या गल्लीतील गणपती मंदिरात आम्ही भंडारा करीत असतो. यावेळी शनिवारी कार्यक्रम ठरवलेला. म्हणून गेलेलो. मस्त झाला. कढी, भात आणि लाप्शी (गुळाचा शिरा). दरवेळी अडीचशे तीनशे पानांचा स्वयंपाक असतो. शुक्रवारी रात्री घरी गेलो. रात्री साडेबारा वाजेपर्यंत मित्रांसोबत गप्पा झाल्या. म्हणजे तसे लवकरच संपल्या म्हणायच्या. रात्री एक वाजता नेहमीप्रमाणे. नेहमीप्रमाणे म्हणजे आमच्या गावी अस आठवत नाही, पण किमान तीन चार वर्ष सहज झाले असतील. रात्री एक वाजता वीज जाते. सकाळी सात वाजता येते. पुन्हा सकाळी दहा वाजता जाते. ते थेट संध्याकाळी सहा वाजता येते. आणि रात्री एक पर्यंत असते. मलाच काय गावालाच राग यायचा बंद झाला आहे. वीस वर्षांपासून पाणी सुद्धा पाच दिवसांनी म्हणजे महिन्यातून सहावेळा (महिन्यातून सहा तास). बोला ‘जय जय महाराष्ट्र माझा’. सोडा, आई साहेबांना पंखा बंद झाल्यावर जाग आली. Continue reading

दुरावा

माफ करा, मी स्वतःला नाही ‘आवरू’ शकत. आजकाल रोजच नवे नवे प्रश्न निर्माण होत आहेत. कालपासून तिची जागा बदलली. आता ती तिच्या मैत्रिणीच्या आणि त्या तिच्या सिनिअरच्या क्यूबमध्ये बसते. मला ना, काहीच सुचत नाही आहे. आता मी तिच्या सोबत कसा बोलू. म्हणजे आधी ती माझ्या डेस्कच्या जवळच तिचा डेस्क होता. त्यामुळे येता जाता तिच्याशी बोलायची आणि तिला पाहण्याची संधी मिळत होती. पाणी आणायला जातांना सुद्धा जायची. पण आता ते सुद्धा नाही. Continue reading

आणि शेवटी ‘बाय’

काय छान सुरवात झाली होती. पण पुढे ना! खूप बेकार दिवस गेला आज. म्हणजे तो ‘शेंड्या’. तीच्या बाजूला बसतो. ती किती वेळ त्याच्याशी बोलली. ती डेस्कवरून गेल्यावर ना! अगदी नाचावसं वाटत होते. आणि मी खूप खुश सुद्धा. पण ती तीच्या डेस्कवर जाऊन बसली. मग झालाच तो सुरु. आता हिने सुरवात केल्यावर तो कसला सोडतो आहे. आता मला माहिती आहे, शेंड्या कंपनीच्या कामासाठी दोन एक वेळा जर्मनी वगैरे फिरून आला आहे. आणि मी जामनेर सुद्धा नाही. पण त्या शेंड्याला दुसरी कोण नाही भेटत का? खूप राग आला होता, त्याचा नाही ‘अप्सराचा’. ती खूप छान आहे. म्हणजे कोणीही फिदा होईल तिच्यावर. पण हा जर्मनी रिटर्न, नाकावरची माशी सुद्धा उठली तर शपथ. मला ना, गंगा यमुनेचा महापूर येण्याची शक्यता बळावली होती. अगदी दुपारपर्यंत चालू गप्पा. अस वाटायला लागलं होत की, तीला काहीच नाही वाटत माझ्याबद्दल. जे काही वाटत ते त्या शेंद्याबद्दल. खरंच नाही सहन झालं. मग मी माझ्या डेस्कवरून उठून गेलो. मला माहिती आहे, माझा तिच्यावर काहीच हक्क नाही. आणि दाखवायला सुद्धा नको. तीच्या आयुष्यात मी लुडबुड करणारा कोण? Continue reading

हेडफोन

कानातले घातल्याशिवाय आजकाल कोणी कुठेही जात नाही. म्हणजे ‘हेडफोन’ अस म्हणायचे होते. रोज सकाळी बसमध्ये जवळपास सर्वच ‘बुजगावणे’ ते कानातील घालून असतात. आज माझ्या शेजारी बसलेली सुद्धा! आणि बाईकवरील हिरो आणि होंडाना पर्याय नाही म्हणून की फॅशन म्हणून त्यांनाच माहित. माझे मित्र आहेत ना काही, बाईकवर रस्त्याच्याकडेला गप्पा मारतांना सुद्धा ते कानातील काढणार नाहीत. Continue reading

ती कशी असेल?

यार, या आयुष्यात किती काळ अशी उत्कंठा राहणार? नुसतेच रोज विचार करायचा ‘ती’चा. देव सुद्धा ना! अस आपल्याला कळायला हव होते. रोज एखादी छान मुलगी दिसली की वाटते ‘ही आपली झाली तर!’. स्थळाच्या वेळी देखील असेच. पण शेवटी सगळे फूस. कंपनीत ज्या आवडतात त्यांना एकतर कोणी ना कोणी असते. किंवा हजार मित्र असतात. मग लढाईच्या आधीच पराभव. बर त्या हजारांच्या डोक्यात काय चालले आहे हे त्यांच्या तोंडवरूनच दिसत असते. बर मग ती नाही तर नेमकी कोण आहे हे जर कळले असते तर, जाता येत हजारदा होणारे हृदयाचे तुकडे तरी झाले नसते. Continue reading

कला

काल रात्री असाचं मित्राशी गप्पा मारत होतो. बोलता बोलता त्याने त्याच्या काढलेल्या फोटोची लिंक दिली. फोटो बघून मी थक्कच झालो. आमचा ‘राज’ उद्धव देखील असेल असे वाटले नव्हते. प्रत्येकात काही ना काही कला अशी असते की त्याचा त्याच्या शिक्षणाचा आणि व्यवसायाशी काहीच संबंध नाही. पण कलेत तो एक नंबर असतो. रात्री मित्राचे त्यातील झुणका भाकरीचे फोटो बघून मला जाम भूक लागली होती. मग काय पाण्यावर रात्र काढावी लागली. माझी जी मैत्रीण आहे ना तिला घर डेकोरेशनची आवड आहे. आणि तीच्या घरातील सगळे असे आहेत ना! थोडक्यात जी वस्तू तिथे न ठेवणारे. मग काय हिने केलेलं दोन दिवस सुद्धा नीट रहात नाही. पण छान करते. Continue reading