गाणी

आज सकाळी नेहमीप्रमाणे लोकल चुकली. बस स्थानकात आलो तर बस मिळेना. शेवटी खाजगी वाहनाने येरवड्याला गेलो. आता खाजगी म्हटल्यावर हिरो लोक असणारच, एकाचा एमपीथ्री प्लेअर सुरु. सकाळी उशीर झाला होता म्हणून आधीच वैतागालेलो. त्यात त्याच ‘पेहली पेहली बार मोहब्बत कि है‘. आता त्याच्या एकूणच अवताराकडे बघून हे गाणे एकदम विरुद्ध वाटले. पण गाणे छान लावले होते. कंपनीत माझ्या सिनिअरने ‘मन का रेडीओ बजने दे जरा’ अस म्हटल्या म्हटल्या माझ्या बॉसने त्याला थांबून म्हटला ‘बस्स’. हे ऐकून सगळेच हसू लागले. परवा देखील असंच चिंचवडच्या बसमध्ये बसलो तर त्यात गाणी चालू. आता पीएमपीएल मध्ये गाणे ऐकण्याची ही माझी दुसरी वेळ. बर गाणी सुद्धा निवडून काढलेली. ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का’ ऐकून ताबडतोप माझ्या मोबाईलचे हेडफोन कानाला लावले. बहुतेक यावेळी बोनस न मिळाल्याच्या दुख उफाळून आले असावे त्या बस चालकाला. बर गाणी हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे की काय अस वाटत आहे. Continue reading

Advertisements

कोणी तरी असावी

आता कशी सुरवात करावी हेच कळत नाही. मागील एका महिन्यापासून एक गोष्ट मला सारखी खटकत आहे. काय करावं तेच कळत नाही. मला ना आजकाल जी मुलगी दिसेल ती आवडते. बर इथपर्यंत ठीक आहे. पण दुसरी पहिल्या मुलीपेक्षा सुंदर दिसली मग ती आवडते. म्हणजे दर पाच दहा मिनिटांनी दुसरी. ‘ती’चा विषय कसा बसा कमी झाला आहे. ‘ती’च्या विचारांनी आधी डोक दुखवल, आता ह्या गोष्टींनी डोक पकल आहे. दुसरे कसले विचारच येत नाहीत मनात. नेहमी वाटत कोणी तरी असावी की जी फ़क़्त माझीच असावी. आणि तीलाही मीच असावा. जीला बघितलं की दुसऱ्या कोणत्या मुलीचे विचार मनात डोकाऊ देखील नये. आणि तीने मला बघितलं की तीच्याही मनात माझाच विचार यावा. म्हणजे रंगाने फार गोरी असली पाहिजे अशी काही किंवा फार काळी हवी अस काही नाही. फ़क़्त तिच्यावर विश्वास ठेवता यावा. Continue reading

लव आजकाल

रक्षाबंधनच्या दिवशी माझी एक जुनी मैत्रिण मला राखी बांधान्यासाठी मला तिच्या कंपनीत यायला सांगितले. मी तीला सकाळी ९:१५ येतो म्हणुन सांगितले. ती ज्या कंपनीत काम करते ती  कंपनी पूणे स्टेशन आयनोक्सच्या  बाजूला आहे. मी आपला ९:१० लाच पोहोचलो. तीला फ़ोन केला तर ती म्हणाली की, १० मिनिटात येते. मग तो पर्यंत करायचे काय म्हणुन आयनोक्स  गेट च्या बाजूला उभा राहिलो. लव आजकाल लागलेला होता. करायचे काय म्हणुन आयनोक्सकड़े बघायचो कधी तिथे जाणारे मुले मुलींकडे बघायचो. बरेच जण येत होते. सकाळच्या शो ला पण गर्दी असते हे मला त्या दिवशी बघून कळले. तिथे एका मुलगा सारख्या फेर्या मारत होता. कोणी तरी यायचे होते वाटत. जसा जसा वेळ जात होता तसा त्याचा पारा चढत होता. Continue reading

मुलीच बलवान

आज सकाळी माझ्या एका मित्राचा साखरपुडा होता. कार्यक्रम संपल्यावर मी शिवाजी नगर मधून ७ ची लोकल पकडली. बर, लोकल वेळेत आली. रेलवेचे आभार मानायला हवेत. लोकल खडकीला येताना मी एका मुलीला रेलवे स्टेशन वर धावत येताना बघितले. ती एवढी वेगात धावत होती की ती खडकी स्टेशन वर पोहचेपर्यंत लोकल दापोडीला पोहचेल. बघून हसू आले. लोकल खडकी स्टेशन वर आली . साधारणत: लोकल प्रत्येक स्टेशन वर २० सेकंड थांबते. १ मिनिट झाला लोकल निघेच ना. मी सिग्नल कड़े बघितल तिथे काही लाल दिवा नव्हता. काय झाल म्हणुन मी उतरून पाहतो तर काय त्या बाई साहेब मागाहून येत होत्या. आणि आमचा मोटारमन तिला बघत होता. बाई साहेब लोकल मधे पाउल टाकताच लोकलचा हार्न वाजला. जणू काही सलामीच दिली. लोकल निघाली. Continue reading