स्वभाव

स्वभाव ही खुपंच मजेदार गोष्ट आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. स्वभाव म्हणजे नेमक काय हे सांगता येणार नाही. आपले वागणे म्हणजे स्वभाव अस म्हणणे चुकीचे वाटते. कारण, व्यक्तीनुसार आपले वागणे बदलते. हो, खरंच! स्वतःचे निरीक्षण करून पहा. मी जसा घरी असतांना वागतो. तसा बाहेर किंवा इतर ठिकाणी वागत नाही. सर्वांचेच जवळपास असेच असते. पण ‘स्वभाव’बद्दल सगळीकडे सारखाच असतो. माझा एक मित्र आहे. त्याला राग आल्यावर तो, समोरच्या व्यक्तीला मनाला टोचेल असे बोलतो. किंवा अनेकदा त्याला न पटलेल्या गोष्टीत देखील मन दुखावेल अस बोलून जातो. आता त्याच्या घरी देखील तो तसाच आणि बाहेरही तसाच. Continue reading

Advertisements

काय करू काय नाही

काय करू आणि काय नाही हेच कळत नाही आहे. एकीकडे ती इतकी आवडते ना! की तीच हवी हवीशी वाटते. पण तिला हे सांगायला भीती वाटते. मी रोज रोज हाच विचार करतो की, तिच्याशी काय बोलायचे. आणि मन कसं मोकळ करायचे तिच्यासमोर. पण मग ती दिसली की, श्वास नीट घेता येत नाही. घसा कोरडा पडून जातो. ‘प्रपोज’ करणे फार मोठी गोष्ट नाही. म्हणजे ही माझी पहिलीच वेळ आहे, पण मी तिला प्रपोज करू शकतो. फक्त तीच्या नकाराची भीती वाटते. ती नाराज होईल याची भीती वाटते. Continue reading

इच्छा

इच्छा ही गोष्ट अशी आहे की जी कधीच संपत नाही. एक संपली की दुसरी, चालूच. लहानपण मला कधीच आवडले नाही. कारण कोणतीच इच्छा माझी लहानपणी पूर्ण झाली नाही. खेळणी माझ्या लहान भावाला. मी मागितली की, मी त्याच्यापेक्षा मोठा म्हणून मला माझे आई वडील रागवायचे. तसे लहानपणी, सर्वच मला या ना त्या कारणाने रागवायचे. असो, मुंबईला आलो त्यावेळी ‘नेक्स्ट’मध्ये एक संगणक पहिला. आणि मला तो खूप आवडला. तो विकत घ्यायची इच्छा झालेली. तो मी दुपारी पहिला. आणि ताबडतोप वडिलांना फोन करून घेऊ का म्हणून परवानगी मागितली. त्यांनी हो म्हटल्यावर संध्याकाळी घेऊन घरी आलो. आता ती गोष्ट वेगळी की, तो विकत घेण्याची ताकद माझ्यात होती. ती माझी जीवनातील पहिली इच्छा, जी इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्धा लाख मोजावे लागले. Continue reading

अर्धवट गोष्ट एका मंदिराची

एक आटपाट नगरात एका नदीतीरी एक भव्य मंदिर होते. मंदिर होते एका मर्यादा पुरुषोत्तमचे. न्याय आणि सुराज्याचे दुसरे नाव. असा तो. तर लोकहो, बाबर नावाच्या एका परकीय शत्रूने त्या नगरीवर हल्ला करून ती जिंकली. त्या मर्यादा पुरुषोत्तमचे मंदिर देखील पाडले. तिथे त्याने स्वतःच्या नावाची एक मशीद उभारली. पण तिथे कधीही नमाज पढला गेला नाही. शतकामागून शतके उलटली. पुढे जावून त्या देशावर ब्रिटीशांचे राज्य आले. तिथल्या लोकांनी आपल्या मर्यादा पुरुषोत्तमचे मंदिर उभारण्यासाठी ब्रिटिशांना विनंती, अर्ज करण्यात आले. पण ब्रिटीश सरकार मानेना. Continue reading

हाय

काल अप्सराने स्वतःहून ‘हाय हेमंत’ म्हटले. किती आनंद झाला म्हणून सांगू! पण मी गाढवासारखा घाई घाईत ‘हाय’ म्हणून सटकलो. काय यार, त्याच ‘हाय’ चाच विचार करत होतो. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा विचार करावा. आणि तीच गोष्ट आपल्या पुढ्यात यावी, तस झाल अगदी. दिवस खूप छान गेला. आणि संध्याकाळी घरी गेल्यावर आईने ‘मुलीचे काका आयसीयु आहेत. म्हणून मग जायचे रद्द झाले आहे’. देव पण ना! किती मनातल्या इच्छा पूर्ण करत आहे. खरंच आजकाल मी स्वप्नात आहे की सत्यात तेच कळत नाही आहे. सगळ अगदी मनाप्रमाणे घडते आहे. Continue reading

चार स्तंभ

शाळेत नागरिक शास्त्रात ‘लोकशाहीला म्हणे तीन स्तंभ असतात’ अस होत. एक लोकसभा-विधिमंडळ, दुसरा न्यायपालिका, तिसरा प्रशासन आणि जो मान्यताप्राप्त नसलेला पण आहे असा चौथा माध्यमे. पण वाटतं का यापैकी कोणी आहे? सगळेच ‘स्तंभ’ आहे की पोटापाण्याचा धंदा? याच उत्तर शेंबड पोरगही देईल. लोकसभा ज्याला हिंदीत ‘संसद’ म्हणतात. मागील महिन्यात बिनबोभाट एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आणि त्याने आमच्या सर्व खासदारांचे वेतन सोळा हजारावरून ऐशीं हजार झाले. कोणत्याही खासदाराला काहीच वाटले नाही. आणि कोणताही खासदार या विरोधात काही बोलला देखील नाही. आणि ना कोणता पक्ष या विरोधात गेला. हा आहे आपल्या लोकशाहीचा पहिला स्तंभ, ज्यावर आपली लोकशाही टिकली आहे. Continue reading

कला

काल रात्री असाचं मित्राशी गप्पा मारत होतो. बोलता बोलता त्याने त्याच्या काढलेल्या फोटोची लिंक दिली. फोटो बघून मी थक्कच झालो. आमचा ‘राज’ उद्धव देखील असेल असे वाटले नव्हते. प्रत्येकात काही ना काही कला अशी असते की त्याचा त्याच्या शिक्षणाचा आणि व्यवसायाशी काहीच संबंध नाही. पण कलेत तो एक नंबर असतो. रात्री मित्राचे त्यातील झुणका भाकरीचे फोटो बघून मला जाम भूक लागली होती. मग काय पाण्यावर रात्र काढावी लागली. माझी जी मैत्रीण आहे ना तिला घर डेकोरेशनची आवड आहे. आणि तीच्या घरातील सगळे असे आहेत ना! थोडक्यात जी वस्तू तिथे न ठेवणारे. मग काय हिने केलेलं दोन दिवस सुद्धा नीट रहात नाही. पण छान करते. Continue reading