रेशन ते स्टेशन

माझ्या घराजवळील सरकारी ‘रेशन’ दुकानाच्या दुकानदाराला पोलिसांनी मागील महिन्यात पकडले. आता तोच नाही तर पिंपरी चिंचवड मधील अजून दोन सरकारी ‘रेशन’ दुकानदारांना पकडले आहे. ते तिघे ‘रेशन’वरील वस्तू रेशनकार्ड वाल्यांना न विकता बाहेर इतर दुकानदारांना विकायचे. परवा त्या निगडीच्या रेशनकार्डच्या ऑफिसच्या ‘महाराणी’ला पकडले. आता महाराणी यासाठी की तिचा रुबाब तसाच होता. आठवतो का मी रेशनकार्ड काढले तो किस्सा? सोडा, मी सांगतो. बहुतेक, हो! ८ मे २००९ मध्ये मी त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तो नवीन रेशनकार्डसाठी फॉर्म भरला. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून! त्या तिथल्या दोन कर्मचाऱ्यांनी तो व्यवस्थित तपासला. आणि पंधरा जून नंतर या अस सांगितले. Continue reading

Advertisements

झोप

आज कामाच्या दिवशी साडेनऊला उठण्याचा भीम पराक्रम केला. त्यामुळे कंपनीची लेट मोर्निंगची बस देखील चुकली. आता रात्री तीन वाजता झोपल्यावर लवकर कशी जाग येणार? मला खरंच काहीच सुचेनासे झाले आहे. गेल्या महिन्यापासून मला तीन वाजेच्या आत झोपच येत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यावर खूप आळस येतो. आणि आता माझा चेहरा काळवंडून गेला आहे. ओठ देखील तसेच. दिवसा मी झोपत नाही. तरी सुद्धा रात्री तीन वाजेपर्यंत झोपच येत नाही. Continue reading

माणुसकी

काल संध्याकाळी कंपनीतून डायरेक्ट चिंचवड स्टेशनवर गेलो होतो. आजकाल दर शुक्रवार, शनिवार माझा ‘मॉल’ दिन असतो. त्या बिग बझारमध्ये दोन जीन आणि एक टी-शर्ट खरेदी केला. जायलाच संध्याकाचे साडेसहा झालेले. यावेळी पहिल्यांदाच तिथे कपडे ट्रायल करून बघितले. मागील वेळी मित्रासोबत डी-मार्ट मधून दोन जीन खरेदी केल्या होत्या आणि घरी येऊन पहिले तर त्या कमरेखाली खुपंच घट्ट झाल्या. त्यामुळे यावेळी कपडे ट्रायल करून घेतले. Continue reading

राजकारणातील क ख ग घ

बाळांनो, ‘राजकारण सोपे नोव्हे’ अस कोणी तरी म्हणून गेले. राजकारण शिकायचे आणि एक उत्तम राजकारणी बनायचे असेल. तर राजकारणाची बाराखडी यायलाच हवी. नाहीतर निवडणुकीच्या परीक्षेत नापास व्हाल. चला तर मग सुरु करूयात का?.. माझ्या मागे मोठ्याने म्हणा. प्रत्येकाने प्रत्येक अक्षराचा नीट अभ्यास करायचा बर का! त्यांचा अभ्यास केला तर परीक्षेनंतर चांगल्या ‘मंत्री’पदांनी खूप मोठे व्हाल. चला म्हणा.. ‘क’ रे ‘करप्शन’चा. बाळांनो, ‘करप्शन’चा अर्थ माहिती आहे ना? करप्शन म्हणजे भ्रष्टाचार. ते यायलाच हवं. नाहीतर राजकारणी बनू शकत नाही. ज्यांना अजूनही कळला नसेल त्यांनी लालू गुरुजींना मधल्या सुट्टीत भेटा. Continue reading

लयलूट

परवा एक्स्टर्नल डीव्हीडी राईटर विकत घेतला. त्याचे असे झाले चार दिवसांपूर्वी माझ्या बहीणाबाईचा संगणक खूप एरर देत होता. मी पाहिल्यावर तिला फॉरमॅट करूयात असे म्हणले. तिला मी करून आणून देतो असे म्हणालेलो. आणि तिनेही तीचा संगणक मला दिला. आता त्या नेटबुकला ना सीडी ना डीव्हीडी ड्रायव्हर. मग काय मी विंडोज एक्सपी सर्विस पॅक थ्री टाकणार कसा? त्याची साईझ साडेपाच जीबी. माझा चार जीबीचा पेन ड्राईव्ह. त्यामुळे एक्स्टर्नल डीव्हीडी राईटर घ्यावा लागला. मित्राला त्या एक्स्टर्नल डीव्हीडी राईटरची किंमत विचारली तर तो बोलला की अंदाजे दोन हजारापर्यंत जाईल. चिंचवड स्टेशनला डेटा केअर सेंटरमध्ये गेलो. तिथे जाऊन चौकशी केली तर त्यांनी सॅमसंग एक्स्टर्नल डीव्हीडी राईटरची किंमत चार हजार दोनशे सांगितली. Continue reading

आला आला वारा..

दोन दिवस असा पुण्यात पाऊस पडला की काय सांगावे. कधी आला आणि किती वेळ पडला हे देखील कळले नाही. पण त्या टी-ट्वेंटी२० पेक्षा अधिक जास्त धुमाकूळ घालून गेला. काल सकाळी कंपनीत बसमधून जातांना सहजच रस्त्यांच्या बाजूला असलेले जाहिरातींचे मोठ मोठे फ्लेक्स बोर्ड पहिले तर फाटलेले. काही काही तर तुटून पडलेले. हिंजवडी, बालेवाडी, चिंचवड, शिवाजीनगर, चतुश्रुंगी, पिंपरी, निगडी, पुणे स्टेशन आणि जवळपास पुण्यातील सगळीकडेच पन्नास टक्के फ्लेक्स एकतर फाटले आहेत किंवा बोर्ड तुटून पडलेले आहेत. ते एक गाणे आहे ना ‘आला आला वारा संगे पावसाच्या धारा’ अगदी तसे पुण्यात घडले आहे. Continue reading

उपास

सकाळी नाष्ट्याला जातांना एका मित्राने आज संकष्टी आहे अस सांगितलं. झालं! मी आज उपास करणार अशी घोषणा मित्रांमध्ये करून टाकली. आजकाल मी कुठलाच काही विचार न करता निर्णय घेतो अस आजच्या निर्णयावरून कळायला अख्खा दिवस गेला. घोषणा केल्या केल्या मित्रांनी जणू काही फार मोठा विनोद सांगितल्यावर हसावं तस हसायला सुरवात केली. एका मित्राने तर, तुझा पापाचा घडा भरून वाहतोय. उपास केल्याने काही फरक पडणार नाही. असा शेरा देखील मारून टाकला. दुसऱ्याने तर, उपास केल्याने मुली भेटत नसतात अस देखील म्हणाला. तरीही माझा निर्णय ठाम ठेवला. आणि कॅन्टीनमध्ये शिरलो. Continue reading