का?

प्रत्येक वेळेस, प्रत्येक ठिकाणी तो ‘का?’ येतो. सकाळी उठून वर्तमानपत्र उघडतो. बातम्या वाचू लागताच तो ‘का?’ डोकावू लागतो. आवरून देवळात जातो. देवासमोर नतमस्तक होतो. थोड्याच वेळात दर्शनावरून मनात गोंधळ होतो. देवाच्या दर्शनाचा उद्येशाने आलेलो. पण दर्शन घेतले त्या ‘दानपेटीचे’. देवळात देवासमोरच दानपेटी ‘का?’ म्हणत ‘का?’ येतो. या विचाराने मन खजील होते. Continue reading

Advertisements

न संपणारा चित्रपट

आजकाल रोज एक नवीन समस्या. आणि रोज नवीन अडचण. काय करावं तेच सुचत नाही. माझ्या ‘थेअरी’ मास्तर मित्र रोज एक नवीन आयडिया देतात. एकाने मध्यंतरी, तू हा चित्रपट पहिला आहेस का? नाही म्हटल्यावर तो तरी पहिला असशील असे प्रश्न विचारून भंडावून सोडले. मागील आठवड्यात एकाने समस्या सोडवण्यासाठी ‘दबंग’ पहा म्हणून सल्ला दिला. ठीक आहे म्हणून तो ‘दबंग’ पहिला. पाहून समस्येवर उत्तर मिळण्याऐवजी ‘डोके भंग’ झाले. काय बोलावं त्या महाकाय सलमान बद्दल. सोडा, मुळात काय चालल आहे हे समजायला खूप वेळ गेला. त्यात ती मारामारी. बापरे, म्हटलं चित्रपट मध्येच बंद करावं तर चिडून तो चुलबुल पांडे बाहेर येऊन मलाच ठोकायचा. म्हणून मग चालू ठेवला. संपल्यावर उसासा टाकला. Continue reading

दिवाना

चित्रपटाचा नायक आनंदात सकाळी कंपनीच्या बसने कंपनीत चाललेला असतो. पावसाच्या सरीने वातावरण अधिकच रोमेंटिक बनवले असते. त्यात नायक नायिकेच्या आठवणीत, तिला भेटण्याची त्याची इच्छा. खुपचं अधीर झाला असतो तो. तिच्यासाठी तो ‘दिवाना’ झालेला असतो. कंपनीत पोहचल्यावर, त्याच्या डोक्यात आज नायिकेशी कस बोलावं अगदी, तिला काय म्हणावं असे सगळे विचार त्याला गोंधळून टाकत असतात. कंपनीत आल्यापासून त्याला तिची आठवण इतकी सतावत असते की सारखा सारखा तिच्या बसण्याच्या जागी दर पाच दहा मिनिटांनी पाहत असतो. पण नायिका काही येत नाही. Continue reading

टिपीकल

चित्रपटाला सुरवात होते. संध्याकाळचा सीन. मुलाच्या घरी त्याच्या आई वडिलांची घाई गडबड चालू असते. मुलगा मात्र स्थिर. मग वडिलांना मुलगा मी टी-शर्ट आणि जीन्स घातली तर चालेल का अस विचारतो. वडील आनंदात ‘हो’ म्हणतात. तेवढ्यात मुलाच्या वडिलांचा फोन वाजतो. वडील फोन उचलतात. मुलगा पडका चेहरा करून कपडे घालणार, तेवढ्यात आई ‘तो लाल रंगाचा शर्ट आणि ती पांढर्या रंगाची पॅंट घाल’. मग काय, मुलगा काहीही न बोलता आपला निर्णय बदलतो. आणि आईने सांगितलेले कपडे निमुटपणे घालतो. तयारी चालूच असते, तर मुलीच्या वडिलांचे आगमन होते. Continue reading

‘क’ची एकता

सकाळी कंपनीत जाण्यासाठी आवरत होतो. तेवढ्यात शेजारी भांडणाचा आवाज येत होता. काय झाल म्हणून मी बाहेर आलो. आणि पहिले तर शेजारी मोठ्या आवाजात टीव्हीवरील मालिका. अस दोन तीन वेळेस घडल आहे. एकदा रडण्याचा आवाज आला होता. म्हणून त्यावेळी देखील मी शेजारी पाहतो तर टीव्हीची मालिका. या एकता बाईनी सगळ्यांना त्या कौटुंबिक मालिकांनी वेड लावलं आहे. एक संपली की दुसरी. ती संपली की तिसरी मालिका. मालिका संपतच नाही. कुठे शेवटच नाही. मी टीव्ही पहातच नाही. पण हे शेजारी आहेत ना!! आवाज एवढा असतो की जणू काही माझ्याच घरात टीव्ही चालू असल्याचा आभास होतो. Continue reading

मजेदार भाषांतर

शुद्ध मराठी खूप मजेदार आहे. विशेषतः ज्यावेळी आपण भाषांतर करतो. म्हणजे ‘बिल गेट्स’चे मराठीत ‘शुल्क पत्रकाचे दार’, जॉर्ज बुश चे मराठीत भाषांतर ‘झाडी हवाबाज’, बराक हूसेन ओबामा चे भाषांतर ‘धन्य एक सुंदर तुला’, ‘इंडिया’चे भाषांतर ‘पाण्याचे शरीर’, ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे मराठीत ‘भारताची वेळ’ होईल . असे अनेक मजेदार प्रकार आपण रोजच्या जीवनात वापरतो. Continue reading

महा’राज’

खर तर माझ्या सारख्याने महा’राजां’बद्दल काही बोलण म्हणजे मुंगीने हत्तीबद्दल बोलण्यासारखे आहे. त्यांच्याबद्दल जेवढ बोलाल तेवढ कमी आहे. आता त्यांचे वागणे, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची भाषणे सगळ काही वादातीत. त्यामुळे त्यांना सोडून महाराष्ट्रातील ‘राज’कारणाबद्दल विचारही होवू शकत नाही. थोडक्यात, सांगायचे झाल्यास नटरंगमधील ते एक वाक्य आहे ना ‘राजा आक्शी राजावाणी दिसतो’. Continue reading