चूक करू नका

सगळ खरच खोट असत. आणि सगळ एकतर्फी असते. खूपच जास्त बेकार वाटत आहे. सगळीच नुसती घुसमट असते. आनंद आणि त्रास हा फक्त आपल्याला असतो. आपल्याला आवडणार्या व्यक्तीला कधीच काहीच जाणवत नाही. आपण वहात जातो. व्यक्तीत आपण बुडून जातो. ती व्यक्ती न कधी आपला द्वेष करते आणि ना कधी प्रेम. आपणच आपले मनाचे डोंगर रचत जातो. हळू हळू डोंगर मोठे होत जातात. आपण त्याच्या ओझ्यात दबून जातो. ती व्यक्ती समोर आली की, आपण आनंदी होतो. ती दोन शब्द बोलली की आपल्याला गगन ठेंगणे वाटायला लागते. कुठून तरी एक शक्ती, आपल्याला त्या व्यक्तीबद्दल आकर्षित करीत राहते. आपण इतके बुडून जातो की, स्वप्न आणि वास्तव यातील फरकच आपण विसरून जातो. Continue reading

Advertisements

भोपळा

परीक्षेचा निकाल पाहण्याची गरज राहिलीच नाही. उलट भोपळा नाही मिळाला तर आश्चर्य असेल. आता अभ्यास न करता गेल्यावर हेच होणार होत. असो, चूक झाली. आणि मला ती मान्य सुद्धा आहे. अजून तीन विषय बाकी आहेत. याची कसर त्यात काढेल. नेहमी आजच उद्यावर ढकलले. परवा माझा मुंबईचा मित्र आलेला. तरी अभ्यास झाला असता. पण नंतर करून म्हणून राहिलं. त्याला काल दुपारच्या साडेतीनच्या ‘डेक्कन’ने बसवले. त्यानंतर साडेचारला मी घरी आलो. जरावेळ विश्रांती घेऊ म्हणून जरा झोपलो. तर साडेसातला जाग आली. Continue reading

मित्र

परवाच्या गोष्टीनंतर आता मित्र कोणाला म्हणावे असा प्रश्न पडला. परवा माझ्या चार मित्रांना रविवारी भेटू म्हणून फोन केला. त्यापैकी एक गावी गेलेला होता. म्हणून त्याला यायला जमणार नव्हते. तसे त्याने मला फोनवर सांगितले. दुसर्याला फोन केला तर तो ‘बायको भक्त’ दुपारी दोननंतर भेटलं तर चालेल का अस विचारले. त्याला हो म्हणालो. तिसर्याला फोन केले तर तो चालेल म्हणाला. आणि चौथ्याला फोन केला तर तो ‘बहिण भक्त’ बहिणीला भेटायचे आहे. त्याची बहिण आजारी होती. मग त्याला म्हणालो आपण दोघेही भेटायला जाऊ संध्याकाळी. तर तो ठीक आहे म्हणाला. तो मला निघण्याआधी फोन करेल असा वायदा केला. Continue reading

जहाल मुंगीची गोष्ट

मुंगी मुंबईहून पुण्याला आली. पुण्यातील हायफाय ठिकाणी असलेल्या एका कंपनीत तिने आपले काम सुरु केले. मुंगी रोज प्रामाणिकपणे कामावर यायची आणि आपल काम करत राहायची. त्या कंपनीचा मालक एक सिंह होता. सिंहाला असे वाटले की आपले काम वेगाने व्हावे यासाठी आणखीन एकाला कामावर ठेवावे. मुंगी करते त्याच कामातील थोड काम दुसऱ्या कोणी केल तर काम आणखीन लवकर होईल या उद्येशाने त्याने एका झुरळाला कामावर ठेवले. झुरळ मुंगीपेक्षा वयाने जास्त असल्याने मुंगी त्याला ‘सर्’ म्हणू लागली. झुरळ कंपनीत आल्यापासून आपल्या दिलेल्या कामापेक्षा सिंहाची दाढी कुरवाळण्यात जास्त वेळ घालवायचे. आणि सिंहाला देखील ते आवडायचे त्यामुळे सिंह कधीच काही म्हणत नसायचा. मग झुरळ जणू आपणच कंपनीचे मालक आहोत अस वागायला लागल. सारखं सारखं मुंगीच्या मागे लागायचं. आणि काम संपल्यावर ते काम मी केल अस सिंहाला सांगायचं. सिंह मग, शाबासकीची थाप त्या झुरळाला द्यायचं. Continue reading

पाल

एक महिना झाला. म्हणून कार्यक्रम सुरु झाला. सगळ्या मुंग्या आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेल्या पालीही तिथे हजर होत्या. सगळ्यांनी मिळून वारुळाच्या संरक्षणाची शपथ वगैरे झाल्या. एका मागे एकाची भाषणे झाली. मग मुख्य आणि सिंहासारखी पाल भाषणाला पुढे आली. आणि आपली सत्य वाणी सुरु केली. मी इथ आल्यापासून पहाते आहे. सगळ्या मुंग्या आपल्या आपल्या कामात दंग. कोणाच आपल्या वारुळाकडे लक्षच नाही. मी नेहमीच सत्य बोलते. रागावू नका. म्हणून तर माझ्या नावात ‘सत्य’ आहे. वारुळात झुरळांनी केलेला बॉम्बस्फोट आणि त्यात मारल्या गेलेल्या मुंग्या, यात मी आणि माझ्या पाली जबाबदार नाही. तुम्ही पुणेकर मुंग्या याला जबाबदार आहे. कारण मी देखील ‘शिवाजीराजे..’ पहिला आहे. Continue reading

परत चूक

यार परत चूक झाली. काल सकाळी माझी सिनिअर मला बरंच काही बोलली. पण मला काहीच नाही कळलं. माझ्या संगणकावर ते भंगार इंटरनेट एक्सप्लोरर आहे. त्यावर मी केलेलं काम बरोबर दिसत होत. आणि काम बरोबर चालू आहे म्हणून मी देखील निश्चिंत होतो. पण घरी आल्यावर बघितलं तर बाकीच्या ब्राउझरमध्ये बिघडलेल. मग माझ्या लक्षात आल की ती एवढी का भडकली होती. बर त्यांना मला ती हवी असलेली सोफ्टवेअर मागितलेली होती. पण एवढी मोठी कंपनी. आणि पैसे लागतात म्हटलं की नाही म्हणाले. बर कसे बसे दोन सोफ्टवेअर दिलेत. बर ते इन्स्टाल करायला किती वेळ लागतो. दहा मिनिटांच काम. दोन आठवड्यांनी एक सोफ्टवेअर टाकल. आणि अजून दुसऱ्या सॉफ्टवेअरला बहुतेक मुहूर्त पाहून टाकणार असतील. मला माझ झालेलं काम सगळ्या ब्राउझरच्यामध्ये बघण्यासाठी आधी एक ‘अडोब’चे सोफ्टवेअर मिळते. ते मागितले. पण दिले नाही. आणि आता त्या चुकलेलं काम परत करा. असल् डोक दुखत आहे ना. सोफ्टवेअर देणार नाहीत. आणि चुका का झाल्या असा उलट प्रश्न विचारणार. आता आज मी माझ्या सिनिअराला झापणार आहे. Continue reading

प्रतिक्रिया

प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे. म्हणजे कोणी वक्त्याने खूप मोठ तासाभराच भाषण द्याव. आणि लोकांनी भाषण संपल्यावर टाळ्या वाजू नयेत, त्याला अंडी देखील फेकून मारू नये. किंवा फोन केल्यावर पलीकडून कोणीच काही बोलू नये. मग त्या भाषणाला आणि आपल्या फोनला काय अर्थ राहील? प्रतिक्रिया जे जिवंतपणाचे लक्षण आहे. मी माझा ब्लॉग सुरु करण्यामागे देखील हेच कारण होत. रोज ‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या वेबसाईटवर जात होतो. त्यांच्या लेखांवर मी माझी प्रतिक्रिया पाठवायचो. पण मोजून दोन तीन प्रतिक्रिया प्रकाशित केल्या. ‘सकाळ’ आणि ‘लोकसत्ताचे’ ही हेच. लोकसत्ताच संपादक नेहमी नवीन नवीन अग्रलेखात ‘चमत्कार’ घडत असतात. सुरवातीला मी ताबडतोप प्रतिक्रिया पाठवायचो पण ते प्रतिक्रिया प्रकाशितच करत नाहीत. Continue reading