फ्लेक्स

मी बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभा असतो. स्टॉपच्या समोरच्या बाजूला एक इमारतीचे चित्र असलेले जाहिरातीचे फ्लेक्स असते.’तुमचे स्वप्न साकार करण्याची संधी’ अस काहीस लिहिलेलं असते. बस येते. बस निघाल्यावर प्रत्येक चौकाचौकात वेगवेगळया बिल्डरांची अगदी अनाकलनीय फ्लेक्स असतात. एका बिल्डरची जाहिरातीच्या फ्लेक्समध्ये संध्याकाळची वेळ, एक मुलगी शेतात दोन्ही हात लांब करून पाठमोरी उभी आहे. आणि बाजूला लिहिले असते ‘युअर ड्रीम होम’. त्याच्या बाजूलाच दुसऱ्या फ्लेक्सवर एक तरुण हसऱ्या चेहऱ्याने, कदाचित बाजूच्या दोन लहान मुलांचा बाप असावा. त्याच्या दोन मुलांसोबत गोट्या खेळतांना. आणि बाजूला लिहिले असते ‘कंट्रीयार्ड’. बस पुढे निघते. Continue reading

Advertisements

अगदी छान

अगदी छान, छान काय खूपच छान वाटत आहे. ती आता माझ्या डेस्कवर आली होती. काय करू आणि काय नाही अस झाल आहे. सर्वात सुंदर!!! नाही ती ‘अप्सरा’ नाही, एक सुंदरतेचा आणि प्रेमाचा स्त्रोत आहे. माझी ‘निवड’ मुळीच चुकीची नाही. शुक्रवारी तिला मी दिलेला पेन ड्राईव्ह परत करायला. किती छान! अजूनही ती इथेच असल्याचा भास होतो आहे. तिने मला पिंग करून ‘मी तुझ्या डेस्कवर येत आहे. पेन ड्राईव्ह रिटर्न करायला’. माझा मित्र मला नाश्ता करायला बोलावत होता. त्याला थोड्या वेळ थांब म्हणालो. ती जस जशी माझ्या डेस्ककडे येत होती. तसं तशी, माझी हालत खराब होत होती. तिच्याकडे पाहण्याची हिम्मतच होत नव्हती. आज तिने इतक्यांदा पिंग केल आहे ना! मला मी हवेत असल्याप्रमाणे वाटत आहे. Continue reading

का सतावते?

का सतावते आहे ती? चार दिवसांपासून हेच चालू आहे. तसं काल तिने मला दोन मेल पाठवले होते. पण पिंग करून गुड मोर्निंग केल तर, रीप्ल्याच दिला नाही. मी मुर्खासारखा दिवसभर तिने अस का केल म्हणून विचार करीत बसलो. आणि दुपारचा उपास तर आता रोजचाच झाला आहे. यार, रात्री जेवणाची इच्छा होत नाही. आणि सकाळी भूक असून त्या मिल्क शेकवर राहावे लागते. ती त्या जुन्या कॅन्टीनमध्ये जेवते. ती मस्तपैकी घरून डबा आणते. आणि ते जुन्या कॅन्टीनमध्ये ‘जेवण’ पाहून भूकच मारून टाकावी लागते. Continue reading

फक्त अप्सराच

कालचा दिवस. आहाहा! काल ती त्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये. आणि तिची ती निळ्या रंगाची ओढणी. आणि माझ्या ड्रेसचा रंग निळा. खूप छान वाटलं. काल देखील शेवटीच तिनेच ‘हाय’ केले. ती माझ्या डेस्कजवळून जातांना माझ्याकडे पहात जाते. आणि इतकी छान स्माईल देते. काल अस, दोन तीनदा घडलेलं. परवा तिची मीटिंग संपली. आणि मी त्या मीटिंगरूम च्या जवळून चाललेलो. खर सांगायचे झाले तर मुद्दामच. तिने मला पाहून इतकी छान स्माईल दिली. आजकाल आम्ही दोघेही एकमेकांसमोर आलो की हेच चालते. ती इतकी छान स्माईल देते. आणि लाजल्यासारखं हसतो. पण हालत खराब होते. काल मला तिच्याशी बोलायची खूप इच्छा होती. पण तिचे स्टेटस बिझी होत. म्हटलं ती कामातून फ्री होईल त्यावेळी बोलू. पण दिवसभर असंच. Continue reading

इमेल

आता दुपारी मी तिला असाच एक मेल पाठवला होता. आणि तिने त्याचा रिप्लाय देखील केला. आणि पिंग देखील केल. काय सांगू, नाचावस वाटत आहे. आजही दुपारपर्यंत दिवस जाम टेन्शनमध्ये गेला. म्हणजे अस काहीच कारण नव्हते. ती आज काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये असली छान दिसते आहे ना! तिला ‘हाय’ करणार होतो. सोडा, मी पुन्हा तेच रिपीट करतो आहे. आज दुपारी जेवायला त्या नव्या कॅन्टीनमध्ये गेलो होतो. पण तीच माझ्याकडे लक्षच नव्हत. म्हणजे तिला कळल सुद्धा नाही, की मी होतो तिथे. यार माझ्या मनाचा ‘रिमोट’ तिच्याकडे गेल्याप्रमाणे वाटत आहे. Continue reading

आज मी बोललो

खूप मस्त वाटत आहे. काय सांगू, खरच नाचावस वाटत आहे. आज मी तिच्याशी बोललो. आणि सकाळी ‘हाय’ सुद्धा म्हटलं. सकाळी खर तर डोक खूप दुखत होत. पण तिला पाहिलं आणि कमी झाल दुखायचं. काल असंच, रात्री उपास झाला. सर्दी, खोकला त्यामुळे आणखीन डोकेदुखी वाढली. आज सकाळी कंपनीत यायला मग उशीर झाला. आलो तर शेंड्या तिच्या डेस्कवर पहिला. मग काल प्रमाणे. पण हिम्मत केली. आणि बोललो. यार आता माझ्या डेस्कच्या बाजूने गेली. एक दिवशी नक्की ही हार्टअटॅकने मारणार. ती इतकी छान आहे ना! आणि आज किती छान दिसत आहे. बस पाहताच रहावस वाटत. Continue reading

पुन्हा तेच..

पुन्हा तेच. कस बोलू? यार आज ती खूप छान दिसत आहे. काल आजारी होतो. काही नाही. थोडा ताप आणि सर्दी. त्यात तो खोकला खूप कमी झाला आहे. पण गेलेला नाही. त्यामुळे कंपनीला बुट्टी झाली. तिची खूप आठवण आली. दिवसभर, झोपून होतो. मित्राचा सकाळी फोन आला होता. तेवढ्यापुरता उठलो. मग काय, त्याला विचारले ‘ती आली का?’ तर ‘नाही’ बोलला. तीन वाजता पुन्हा जाग आली. त्यावेळी मग मी मित्राला फोन केला. तर माझ्याशी ते टाईमपास करत बसलेले. मला म्हणाले ती आज टेन्शन मध्ये आहे. एक सेकंदसाठी खूप विचारांचे काहूर माजले, पण नंतर स्वतःला सावरले. Continue reading