वजन

वजन हा गेल्या काही दिवसांपासून खुपंच जिव्हाळ्याचा विषय होऊन गेला आहे. खर तर पोटाचा वाढता ‘नगारा’ हा त्याहून अधिक जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. पण सध्यातरी वजनावरच बोलू. आता वजन किती असावं यावर चर्चा करायला फार काही महान नाही. पण साधारणपणे जितके इंच उंची, तितके किलो वजन असायला हवं, अस वडील नेहमी बोलतात. तेवढे असेल तर सुधृढ. कमी असेल तर लुकडा, आणि जास्त असेल तर जाड. आता माझी उंची पाच फुट पाच इंच (१६५ सेंटीमीटर) आहे. तसा हिशोब पकडला तर माझे वजन साधारणपणे ६५ किलो हवे. दोन महिन्यांपूर्वी कंपनीत शारीरिक परीक्षण होते. त्यावेळी माझे वजन ७२.५ किलो भरलेले. खर तर आनंद झालेला. कारण त्याआधी एक महिन्यांपूर्वी पर्यंत माझे वजन ७५ किलो होते. खरंच मी खुपंच ‘वजनदार’ झालेलो आहे. Continue reading

Advertisements

मन, मेंदू आणि मी

मी सकाळी उठतो. उशीर झालेला असतो. मी पटापट आवरण्याचा प्रयत्न करीत असतो. पण मन मात्र भलतीकडेच. मी दाढी करायला आरशात पाहतो. आणि मन आरशात तिला. ‘बस’ला उशीर होत असतो. आणि मन मात्र तिला कोणता ड्रेस आवडेल ते सांगत असते. पण लगेच मेंदू हटकतो. मी आवरून धावपळ करीत बससाठी स्टॉपवर जातो. तिथे ‘परीवहिनी’ येतात. मी ‘परीवहिनी’कडे पाहतो त्याही हसून माझ्याकडे. पण मन तीच्या स्वप्नात. तिथेही तीच असल्याचा भास होतो. मी हरखून पहात असतो. बसमध्ये बसतो. मोबाईलचे हेडफोन कानाला लावून गाणी सुरु करतो. मन प्रत्येक गाण्यात तिचाच भास करते. मला तिची आठवण येत असते. कंपनीत उतरतांना मन प्रश्न विचारते ‘ती आजारी तर नाही ना? मग ती का नसेल आली दोन दिवस? की घरी गेली’. मेंदू उत्तरतो ‘तुला काय गरज नसत्या चौकशा’. मी खिन्नपणे इमारतीच्या जिन्यातून चाललेलो असतो. Continue reading

ताप

काल मी बर्याच दिवसांनी आजारी पडलो. त्याचे काय झाले, मी परवा आमच्या कंपनीत नवीन कॅन्टीनमध्ये दुपारी जेवण केले. जेवणातील भाजीने पोट खराब केले. मग काय, व्हायचे ते झाले. पोटात काहीच राहत नव्हते. आणि त्यामुळे अशक्तपणा आला. त्यामुळे आजोबांच्या पेक्षा जास्त वाईट अवस्था. हात पाय गळून गेलेले. रात्री खूप थंडी वाजायला लागली. सकाळी लवकर उठून देखील अंग दुखत असल्यामुळे पळायला गेलो नाही. पण व्यायाम केला. व्यायाम करतांना घाम आलाच नाही. खूप त्रास झाला व्यायाम करतांना. आणि डोके इतके दुखायला लागले की बास! काही विचारूच नका. Continue reading

माणुसकी

काल संध्याकाळी कंपनीतून डायरेक्ट चिंचवड स्टेशनवर गेलो होतो. आजकाल दर शुक्रवार, शनिवार माझा ‘मॉल’ दिन असतो. त्या बिग बझारमध्ये दोन जीन आणि एक टी-शर्ट खरेदी केला. जायलाच संध्याकाचे साडेसहा झालेले. यावेळी पहिल्यांदाच तिथे कपडे ट्रायल करून बघितले. मागील वेळी मित्रासोबत डी-मार्ट मधून दोन जीन खरेदी केल्या होत्या आणि घरी येऊन पहिले तर त्या कमरेखाली खुपंच घट्ट झाल्या. त्यामुळे यावेळी कपडे ट्रायल करून घेतले. Continue reading

आम्ही पुणेकर

कोणालाही काहीही वाटू देत. पण आम्ही असेच आहोत आणि असेच रहाणार. आमची सकाळ आठ वाजता होते. आता तुम्ही आम्हाला आळशी म्हणा नाहीतर अजून काही. पण आम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद लुटतो. सकाळी आवरून बाईकवर अडथळ्याच्या शर्यतीत भाग घेतल्याप्रमाणे आम्ही रस्त्यावरून आमच्या बाईक चालवतो. सिग्नल सुटायच्या दोन मिनिट आधी आम्ही निघतो. ती म्हण माहिती आहे ना ‘थांबला तो संपला’. असो, ते आमच्या रक्तातच आहे. मग समोर कोणताही पोलीस उभा असो. त्यालाही चांगलंच माहिती आहे की हे पुणे आहे ‘मुंबई’ नाही. इथे रांगेत उभा राहणे आणि सिग्नलच्या हिरव्या दिव्याची वाट पहाणे. हे पुणेकरांच्या संस्कृतीत बसत नाही. Continue reading

दाखला

दोन दिवसांपूर्वी मित्रासोबत त्याच्या कॉलेजात गेलो होतो. त्याने एम.बी.ए करायचे ठरवले आहे. त्यासाठी त्याला हरवलेल्या दाखल्याची नक्कल हवी होती. जातांना मला त्याचा प्राचार्याने आदल्या दिवशीच्या दिलेल्या ‘दाखला का हरवला?’ याविषयावरील व्याख्यानाचा सारांश सांगत होता. आम्ही दोघेही कॉलेजमध्ये प्रवेश करताच त्याच्या जुन्या आठवणी धरणाचा बांध फुटून वेगाने पाणी पसरावे. तसे याच्या आठवणी आणि किस्से मला सांगत सुटला. मस्त! सगळे इथून तिथून सारखेच असतात. प्राचार्यांनी त्याला आधल्या दिवशी दाखला हरवला म्हणून पोलिसात एफ.आई.आर करायला लावली. आता ह्याच्या सर्व महत्वाच्या कागदपत्रांची अख्खी फाईलच हरवली. त्यात तो दाखला देखील गेला. प्राचार्यांच्या केबिनमध्ये आधीच कोणी तरी होते. म्हणून अर्धा तास वाट पहावी लागली. Continue reading

‘क’ची एकता

सकाळी कंपनीत जाण्यासाठी आवरत होतो. तेवढ्यात शेजारी भांडणाचा आवाज येत होता. काय झाल म्हणून मी बाहेर आलो. आणि पहिले तर शेजारी मोठ्या आवाजात टीव्हीवरील मालिका. अस दोन तीन वेळेस घडल आहे. एकदा रडण्याचा आवाज आला होता. म्हणून त्यावेळी देखील मी शेजारी पाहतो तर टीव्हीची मालिका. या एकता बाईनी सगळ्यांना त्या कौटुंबिक मालिकांनी वेड लावलं आहे. एक संपली की दुसरी. ती संपली की तिसरी मालिका. मालिका संपतच नाही. कुठे शेवटच नाही. मी टीव्ही पहातच नाही. पण हे शेजारी आहेत ना!! आवाज एवढा असतो की जणू काही माझ्याच घरात टीव्ही चालू असल्याचा आभास होतो. Continue reading