जहाल मुंगीची गोष्ट

मुंगी मुंबईहून पुण्याला आली. पुण्यातील हायफाय ठिकाणी असलेल्या एका कंपनीत तिने आपले काम सुरु केले. मुंगी रोज प्रामाणिकपणे कामावर यायची आणि आपल काम करत राहायची. त्या कंपनीचा मालक एक सिंह होता. सिंहाला असे वाटले की आपले काम वेगाने व्हावे यासाठी आणखीन एकाला कामावर ठेवावे. मुंगी करते त्याच कामातील थोड काम दुसऱ्या कोणी केल तर काम आणखीन लवकर होईल या उद्येशाने त्याने एका झुरळाला कामावर ठेवले. झुरळ मुंगीपेक्षा वयाने जास्त असल्याने मुंगी त्याला ‘सर्’ म्हणू लागली. झुरळ कंपनीत आल्यापासून आपल्या दिलेल्या कामापेक्षा सिंहाची दाढी कुरवाळण्यात जास्त वेळ घालवायचे. आणि सिंहाला देखील ते आवडायचे त्यामुळे सिंह कधीच काही म्हणत नसायचा. मग झुरळ जणू आपणच कंपनीचे मालक आहोत अस वागायला लागल. सारखं सारखं मुंगीच्या मागे लागायचं. आणि काम संपल्यावर ते काम मी केल अस सिंहाला सांगायचं. सिंह मग, शाबासकीची थाप त्या झुरळाला द्यायचं. Continue reading

Advertisements

पाल

एक महिना झाला. म्हणून कार्यक्रम सुरु झाला. सगळ्या मुंग्या आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेल्या पालीही तिथे हजर होत्या. सगळ्यांनी मिळून वारुळाच्या संरक्षणाची शपथ वगैरे झाल्या. एका मागे एकाची भाषणे झाली. मग मुख्य आणि सिंहासारखी पाल भाषणाला पुढे आली. आणि आपली सत्य वाणी सुरु केली. मी इथ आल्यापासून पहाते आहे. सगळ्या मुंग्या आपल्या आपल्या कामात दंग. कोणाच आपल्या वारुळाकडे लक्षच नाही. मी नेहमीच सत्य बोलते. रागावू नका. म्हणून तर माझ्या नावात ‘सत्य’ आहे. वारुळात झुरळांनी केलेला बॉम्बस्फोट आणि त्यात मारल्या गेलेल्या मुंग्या, यात मी आणि माझ्या पाली जबाबदार नाही. तुम्ही पुणेकर मुंग्या याला जबाबदार आहे. कारण मी देखील ‘शिवाजीराजे..’ पहिला आहे. Continue reading

घरातील अतिरेकी

आज सुटी असल्याने घराची साफसफाई केली. मागच्या आठवडा भरात मुंग्यांनी नुसता उच्छाद मांडून ठेवला होता. कुठलाही कोपरा बघा मातीच माती. आणि बाथरूम मध्ये तर रात्री झुरळांचे राज्य. तरी बर उंदीर नावाच्या दहशद्वाद्याला आमच घर अजून माहिती नाही. नाही तर काय झाले असते देव जाणे. आज संध्याकाळी घरभर भिंतीच्या बाजूने ती मिळते ना लक्षमणरेषा ती आणून आखून ठेवली. तासाभरानी बघतो तर अनेक मुंग्या मेलेल्या. आणि पाच एक झुरळ. चला हा आठवडा तरी चिंता कमी होईल. घर पुसून काढण्याचा प्लान आखला होता. पण बाथरूम आणि किचन मधेच बराच वेळ गेल्याने, शेवटी फारशी पुसून काढण्याचा प्लान रद्द करावा लागला. Continue reading