हिंदू अतिरेकी

आज रात्री गच्चीतून फटाके बघताना खूप मजा वाटत होती. काकाच्या मोबाईलचा रिचार्ज आणायाला जाताना काही विचारायलाच नको, कुठे कधी फटका फुटेल काही सांगता येत नव्हते. दोन मिनिटांच्या रस्त्याला दहा मिनिटे लागली. अस वाटत होत की कुठे तरी युद्ध भूमीवरून जातो आहे की काय. चिल्लर पार्टी फारच जोरात होती. परत घरी आल्यावर टीव्हीवर गोवा बॉम्बस्फोटाची बातमी बघितली. ऐन दिवाळीच्या सुरवातीला झालेला बॉम्बस्फोट. आज काही जणांना पकडलं आहे. ते सनातन संस्थेशी सहभाग आहे अस म्हटलं आहे. बघून खरचं खूप छान वाटल. नरक चतुर्दशीचा मुहूर्त फार छान निवडला. निदान आपल्या देशात, आता तो आपला कशावरून हा देखील एक प्रश्नच आहे. नाही मी राजकारणाचा विषय काढत नाही आहे. पण मला तुम्ही सांगा आपला देश सर्वधर्म समभाव बाळगणारा आहे ना. जर हज यात्रेला जाणार्याचा खर्च आपला देश उचलतो. मग अमरनाथला जाताना स्टैंप पेपरवर अस का लिहून द्याव लागत की ‘तिथे जाताना होणाऱ्या अपघात, मृत्यूला फ़क़्त मीच(यात्रेकरू) जबाबदार आहे’. Continue reading

Advertisements

नवीनपणा काहीच नाही

मागील काही दिवसांपासून नवीन काही घडतच नाही आहे. तीच सकाळ, तीच लोकल, तीच कंपनी, तेच काम. सगळ्या गोष्टीत तोच तोचपणा आलेला आहे. काही नवीन घडतच नाही आहे. दिवसाचा एक असा ठरलेला दिनक्रम (साचा) बनून गेला आहे. लोकल – कंपनी – घर. बस हेच सगळ. वर्तमानपत्रात त्याच त्याच बातम्या. कंपनीत येताना आणि घरी जाताना नेहमी मी काही तरी नवीन घडल अशी अपेक्षा करतो. पण काही नवीन घडत नाही. सकाळी उठून आवरा, लोकल पकडा, कंपनीत जाऊन तेच काम करा. घरी येऊन तेच. वर्तमानपत्रात काही नवीन बातम्या नाही. टीव्हीचे कार्यक्रम तेच. वर्डप्रेसवर पण त्याच पद्धतीच्या नोंदी. बर ज्यांच्या बोलण्याने पान देखील हलत नाही. अशी लोक देशपातळीच्या विषयावर आपली मत मांडतात. राष्ट्रीय नेते मूर्ख म्हणतात.

Continue reading

लव्ह मैरेज की अरेंज मैरेज?

काल रात्री लोकल चुकल्याने बसने आलो. त्यात नेहमीप्रमाणे एक प्रेमी युगल होते. नाही तरी पुण्यात असले प्रेमी युगलांची संख्या कुठे कमी आहे म्हणा. संध्याकाळी घरी आलो. आमच्या शेजारी एक नवीन जोडप आल आहे राहायला. त्यांना एक गोड बाळ पण आहे. आज त्यांच्या घरातून भांडणाचा आवाज येत होता. नक्की काय होत आहे हे बघायसाठी मी बाहेर डोकावून बघितलं तर मारहाणीचा आणि कोणाचा तरी रडायचं आवाज येत होता. त्यांच्या घरातील टीव्हीचा आवाज मोठा केला असल्याने नक्की काय होत हे मला कळल नाही. पण एवढं नक्की त्या जोडप्यात वादावादी चालू होती. सकाळी लोकल मध्ये एकाने सांगितलं की त्यांच्या येथील एका मुलाचे नवीनच लग्न झाले होते. त्याने बोलताना त्याची जुनी लफडी तिच्या बायकोला सांगितली. त्याच्या बायकोला वाटले की हा मोकळ्या मनाचा आहे म्हणून तिने देखील तीच जुन प्रेम प्रकरण त्याला सांगितलं. झाल ह्याने तिला घराबाहेरच काढल. Continue reading