अपघात

आज संध्याकाळी आठच्या लोणावळा लोकलने मी येत असताना गाडी फारच थांबत थांबत येत होती. दापोडीच्या पुलावर तर दहा मिनिटे थांबली. आता पुण्यातील लोकल कुठेही आणि कधीही थांबतात. आता एका वर्षानंतर मला देखील सवय झाली आहे. लोकल दापोडीहून निघून कासारवाडीला आली. जेव्हा कासारवाडीहून लोकल निघाली तर फलाटाच्या शेवटी दोन पोलीस उभे होते. अंधार असल्याने त्यातील एक पोलीस हातात एक मोठी बैटरी घेवून उभा होता. त्या फलाटावर एक प्रेत होते. बघूनच समजून गेलो. त्याच्या शरीरावर कापड टाकलेले होते. तरी मधील भाग खोलगट दिसत होता. लोकलला एवढा उशीर का झाला हे सुद्धा समजले. बहुतेक सातच्या नंतर सुटणाऱ्या एक्स्प्रेसने उडवले असावे. Continue reading

Advertisements

मुलीच बलवान

आज सकाळी माझ्या एका मित्राचा साखरपुडा होता. कार्यक्रम संपल्यावर मी शिवाजी नगर मधून ७ ची लोकल पकडली. बर, लोकल वेळेत आली. रेलवेचे आभार मानायला हवेत. लोकल खडकीला येताना मी एका मुलीला रेलवे स्टेशन वर धावत येताना बघितले. ती एवढी वेगात धावत होती की ती खडकी स्टेशन वर पोहचेपर्यंत लोकल दापोडीला पोहचेल. बघून हसू आले. लोकल खडकी स्टेशन वर आली . साधारणत: लोकल प्रत्येक स्टेशन वर २० सेकंड थांबते. १ मिनिट झाला लोकल निघेच ना. मी सिग्नल कड़े बघितल तिथे काही लाल दिवा नव्हता. काय झाल म्हणुन मी उतरून पाहतो तर काय त्या बाई साहेब मागाहून येत होत्या. आणि आमचा मोटारमन तिला बघत होता. बाई साहेब लोकल मधे पाउल टाकताच लोकलचा हार्न वाजला. जणू काही सलामीच दिली. लोकल निघाली. Continue reading