भन्नाट सरी

सकाळी चांगलेच उन पडले होते, पण जस जसा दिवस संपायला  लागला तस तसा अंधार आनाखिनच गडद व्हायला लागला. त्यात कामावरून निघायला मला उशीर झाला. कशी बशी एकदाची सात वाजताची लोकल मिळाली. पण दुर्दैव लोकल होती सातची आणि निघाली ७:३० ला. राग आणि निराशा दोघेही एकाच वेळी आल्यावर काय होत ते मला आज समजल. एक तर गेटवर जागा मिळाली, पण ती देखिल दुसर्या क्रमांकाची. खर तर मुंबईवरुन  आल्या पासून लोकलच्या गेटवर उभा रहायचे आणि ते देखिल पहिल्या क्रमांकाच्या जागेवर अशी (खोड) सवय लागलेल्या माणसाला, दुसर्या क्रमांकावर समाधान कसे होइल? Continue reading

Advertisements