लाच

मागील शुक्रवारी मी माझ्या कॉलेजच्या कामानिमित्ताने संगमनेरला गेलो होतो. अकराला शिवाजीनगर मधून बस पकडली. खडकी चौकाच्या सिग्नला बस थांबली. मी आपला सहजच बाहेर बघत होतो. तर एक आर.टी.ओ पोलीस एका कारवाल्याशी काही तरी बोलत होता. बहुतेक त्याने सिग्नल तोडला असावा. अंतर जास्त आवाज तर काही ऐकू येत नव्हता. पण थोड्यावेळाने त्या कारवाल्याने त्याच्या पाकिटातील शंभर रुपयांची एक नोट काढली आणि त्या पोलिसाला दिली. पोलिसाने पैसे खिशात टाकले. मला वाटलं की, आता पोलीस त्याला पावती देईल. पण नाही. Continue reading

Advertisements

वाहिनी साहेब

काय बोलाव आता? हे मित्र लोक ना, सगळे मित्र इकडून तिकडून सारखेच. परवा ‘परी’ सोबत गप्पा मारून कंपनीत आलो. नाश्ता करावं म्हणून मित्रांसोबत कॅन्टीन मध्ये आलो. काय सांगू किती खुश होतो. परी सुद्धा तीच्या टीममेट सोबत नाश्ता करायला आली होती. मी माझ्या मित्रांना ती दाखवली तर, माझा एक मित्र तिला ओळखत होता. मग काय, साहेब आधीच तिच्यावर फिदा. फारच काकुळतीला आला होता तिच्यासाठी. हो नाही करत शेवटी मलाच माघार घ्यावी. ती आणि तो एकाचं फ्लोरवर बसतात. आणि त्याला ती मनापासून आवडते. असो, मला कुणाच्या चित्रपटात ‘खलनायक’ चा रोल मुळीच करायचा नाही. Continue reading

वाढता वाढता वाढे..

एकदा हनुमान लंकेत सीतामातेचा शोधासाठी गेला असतांना रावणाची सेना त्याला कैद करते. रावण हनुमानाची शेपटी पेटून देण्याची शिक्षा देतो. रावणाचे सैनिक हनुमानाची शेपटीला चिंध्या गुंडाळून पेटवण्याचा प्रयत्न करतात. पण शेपटी मोठी होत जात असते. लंकेतील सगळया चिंध्या संपतात. मग राजवाड्यातील पडदे, नंतर जी मिळतील ती कपडे घेऊन शेपटीला गुंडाळले. तरीही शेपटी वाढतच चाललेली. तस चालल आहे महागाईचे. नाही नाही दरवाढीचे. कारण ही महागाई इतकी वाढण्याचे सारे श्रेय मनिसिंहला जाते. काय चुकीचे वाटते? Continue reading

संगणक म्हणजे काय?

काल माझा जिवलग मित्र भेटला होता. असो, नाक दाबल्यावर तोंड उघडते अस म्हणतात ते काही चुकीच नाही. दुपारी जेवणानंतर सहज कामाविषयी विषय निघाला. तो मला माझ्या कामातील एका गोष्टीची माहिती विचारात होता. त्याला तो विषय समजून सांगण्यासाठी त्याला सहज प्रश्न केला की ‘संगणक म्हणजे काय?’. तो म्हणाला ‘म्हणजे?’. त्याला म्हटलं ‘ मला व्याख्या नको सांगू. मला फक्त एवढ सांग की संगणक कशाला म्हणायचं’. तो थोडा वेळ थांबून म्हणाला की ‘टीव्हीची सुधारित आवृत्ती म्हणजे संगणक’. झालं! दोन पाच मिनिटे मला हसूच आवरलं नाही. साहेब पाच वर्षांपासून ‘संगणक’ क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि साहेबांचा हुद्दा देखील मोठा आहे. पण संगणक म्हणजे नेमक काय याच उत्तर देता आले नाही. मग म्हणाला ‘संगणक म्हणजे मनोरंजनाचे साधन’. मग काय अजून हसू आवरेना. Continue reading

राशी आणि स्वभाव

माणसावरून राशी स्वभाव की राशीवरून माणसाचा स्वभाव हा प्रश्न असा आहे, की अंडे आधी की कोंबडी. माझा एक मित्र आहे. सध्याला नगरला असतो. आम्ही नगरला असतांना सोबत संगणकाचा कोर्स केला होता. तेव्हापासून त्याला पाहतो आहे. त्याचा स्वभाव अगदीच रुष्ट. म्हणजे एकदा काय झालं, क्लासमध्ये तो एका स्टुलावर बसून संगणकावर काम करत होता. आमच्या शिक्षिकेने त्याला बघून म्हणाल्या की खुर्ची घेऊन बस. तीन तास त्या स्टुलावर बसून तुझी पाठ दुखेल. पण हा काय ऐकतोय. तिने ह्याला प्रेमात, रागात सगळ्या भाषेत त्याला सांगून बघितलं. पण त्याने नाही म्हणजे नाहीच. शेवटी ती शिक्षिका वैतागून निघून गेली. आमचा मस्त टाईमपास झाला. पण त्याचा स्वभाव अजूनही असाच आहे. माझी इथली लहान बहिण. एकदा तिला माझ्या काकूने घर झाडायला सांगितलं. ती झाडून घेणार नाही म्हणाली. झालं काकूने रागावून देखील काय फायदा झाला नाही. म्हणजे माझी बहिण अशीच आहे. दोघांची म्हणजे त्या माझ्या मित्राची आणि माझ्या लहान बहिणीची ‘धनु’रास आहे. Continue reading

पुणेकरांचा संपर्क

काय बोलाव कळत नाही आहे. पुणेकर सगळे अगदी सारखेच कसे काय? माझा काका. माझ्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर राहतो. पण मागील एका वर्षात मोजून तीनदा घरी आला. बर, फोन नावाचा काही प्रकारच नाही. कधीच स्वत:हून फोन करत नाही. आणि मी मुर्खासारखा दर शनिवार – रविवार पायपीट करत जातो. अधून मधून फोन मीच करायचा. माझी एक बहिण तिथेच रहाते. एका वर्षात दोनदा माझ्या घरी आली आहे. काय बोलाव. तीच ही तेच कधीच फोन करत नाही. कधीही बघा. मोबाईलमध्ये पैसेच नाही. अजून माझ्या दोन बहिणी, आमच्या बहिणाबाई चिंचवडमध्ये राहतात. त्या चाफेकर चौकापासून माझ घर दोन किमी अंतरावर आहे. बर त्या दोघींकडे गाड्या आहेत. दोघींकडे महिन्यातून एक माझीच चक्कर होते. त्या कधीच माझ्या घरी येत नाही. Continue reading

होली का?

काल सकाळी इमारतीच्या बाजूच्या मोठ्या आवाजातील गाणी आणि धांगडधिंगाने जाग आली. बाहेर येऊन बघितलं तर ‘धुळवड’ चाललेली. अरे नाही ‘होळी’, नाही नाही ‘होली’. मग समजलं, पुण्यात ‘होळी’ सणापेक्षा मोठा सण साजरा होतो तो ‘होली’. माझी लहान भाऊ बहिण परवा रात्री माझ्या घरी सुट्टीला आले होते. भाऊ काल पर्यंत होता. पण लहान बहिण ताबडतोप घरी गेली. मला वाटल की काही तरी काम असेल. नंतर कळले ती तो ‘होली’ साजरा करायला गेली. गावी असताना आम्ही गल्लीतील होळीच्या बाजूचा चिखल होळीच्या दुसऱ्या दिवशी खेळायचो. आणि सुट्टी देखील धुळवडीची मिळायची. मस्त मजा यायची. आई त्या होळीच्या विस्तवावर पाणी गरम करून घेऊन जायची. आणि आम्ही सगळे एकमेकांना झालेला चिखल मारण्यात आणि त्यात लोळवण्यात दंग असायचो. अजूनही गावी आणि नगरमध्ये असेच चालते. Continue reading