आहे पण नाही

काय यार, सगळ आहे पण वेळेवर काहीच नाही. काल आई इथे माझ्या घरी आली. आज मी कंपनीत येतांना दिवाळीचा फराळ आणला.  खर तर तिच्यासाठी! ती आली सुद्धा. फराळ घेतल्यावर मला बोलली की, ‘नवीन मोबाईल कुठे आहे?’ काय सांगू? यार एकाच तर गोष्ट आमच्या दोघात कॉमन झाली असती. पण घर घेण्यासाठी रक्कम जमवाजमव केली. त्यामुळे मोबईलची इच्छा तूर्तास कंट्रोल करावी लागली. तिला घराचे बोलले तर पुन्हा ‘तुम्ही’ अस म्हणाली. काय यार, घर घेण्याची ताकद असलेले फक्त काय काका लोक असतात काय? असो, ते महत्वाचे नाही. मोबाईल घेणे फक्त निमित्त! तिच्या जवळ जाणे हे ‘ध्येय’. खर्चाला कधीच का अंत नसतो? Continue reading

Advertisements

काय करू काय नाही

काय करू आणि काय नाही हेच कळत नाही आहे. एकीकडे ती इतकी आवडते ना! की तीच हवी हवीशी वाटते. पण तिला हे सांगायला भीती वाटते. मी रोज रोज हाच विचार करतो की, तिच्याशी काय बोलायचे. आणि मन कसं मोकळ करायचे तिच्यासमोर. पण मग ती दिसली की, श्वास नीट घेता येत नाही. घसा कोरडा पडून जातो. ‘प्रपोज’ करणे फार मोठी गोष्ट नाही. म्हणजे ही माझी पहिलीच वेळ आहे, पण मी तिला प्रपोज करू शकतो. फक्त तीच्या नकाराची भीती वाटते. ती नाराज होईल याची भीती वाटते. Continue reading

रांग

काय बोलाव आता ‘रांग’ बद्दल. जीवनातील एक अपरिहार्य गोष्टच झाली आहे. बसचे रिझर्वेशन, बसमध्ये बसण्यासाठी, कॅन्टीनमध्ये जेवण घेण्यासाठी, अगदी सार्वजनिक स्वछगृहात देखील रांगच. त्या कसाब आणि गुरूची फाशी देखील रांगेत. परवा पुणे स्टेशनमध्ये रात्री दहावाजून दहा मिनिटांची लोणावळा लोकलच्या तिकिटासाठी तिकीट खिडकी समोर उभी असलेल्या रांगेत उभा राहिलो. मोबाईलमध्ये वेळ बघितली तर नऊ पंचेचाळीस झाले होते. आणि रांगही फार मोठी नव्हती. असतील वीस एक माणसे. नेहमी प्रमाणे मध्येच घुसून तिकिटे काढणारे देखील कमी नव्हते. कोणी घुसायला लागला की रांगेत असलेले लोक हिंदीतून त्याला घाण शिव्या द्यायचे. ऐकायलाही खूप किळस यायची. पण रांगेत घुसणारे काही ऐकत नसायचे. दहा वाजता मी ज्या खिडकीसमोर उभा होतो. ती खडकी बंद झाली. आणि दुसर्या बाजूची खिडकी उघडली. Continue reading

वाचलो!

मागील आठवड्यात वडिलांचा फोन आला होता. पुन्हा एक ‘स्थळ’. झालं! मी काही म्हणायच्या आत वडिलांनी छत्तीस गुण जुळत आहेत. आणि मुलगी देखील दिसायला बरी आहे. मग येत्या रविवारी पहाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. आता वडिलांना ‘नाही’ कसं बोलणार. ठीक आहे म्हणून मी फोन ठेवला. तरीच म्हणतोय, गेल्या आठवड्यापासून माझ्या डाव्या डोळ्याची पापणी का सारखी फडफडते आहे. परवा गेलो घरी. काल सकाळी श्रीरामपूरला पाहण्याचा कार्यक्रम होता. आईने मला तिचा फोटो दाखवला. फोटो बघण्याआधी आईला मी दोन वर्ष थांबता येत नाही का म्हणून वाद घालत होतो. पण तिचा तो फोटो बघितलं आणि वाद आपोआप बंद झाला. यार ती तर अप्सराच्याची पेक्षा सुंदर होती. मग काय गेलो निमुटपणे श्रीरामपूरला. तरीही माझा डाव्या डोळ्याची पापणी एवढी का फडफडते आहे, ते कळत नव्हते. Continue reading

आनंदी आनंद चालू आहे

परवा पश्चिम बंगालमध्ये लाल भोपळ्याचे पिक गेल्याची बातमी वाचली. आणि कॉंग्रेस गवताची सुद्धा वाट लागली. काय बोलणार, उन्हाळ्यात असच होणार! पण महाराष्ट्रात मात्र कितीही कडक उन्हाळा असला तरी कॉंग्रेसच्या गवताची वाढ जोमाने आहे. दगडांच्या देशात इतका कडक उन्हाळा, आणि त्यात पाणी नाही. जिथे आहे तिथे वीज नाही. मग कुठून भाजीपाला पिकणार? बर आता भाजीपाल्यात सुद्धा कचराच जास्त असतो. Continue reading

आला आला वारा..

दोन दिवस असा पुण्यात पाऊस पडला की काय सांगावे. कधी आला आणि किती वेळ पडला हे देखील कळले नाही. पण त्या टी-ट्वेंटी२० पेक्षा अधिक जास्त धुमाकूळ घालून गेला. काल सकाळी कंपनीत बसमधून जातांना सहजच रस्त्यांच्या बाजूला असलेले जाहिरातींचे मोठ मोठे फ्लेक्स बोर्ड पहिले तर फाटलेले. काही काही तर तुटून पडलेले. हिंजवडी, बालेवाडी, चिंचवड, शिवाजीनगर, चतुश्रुंगी, पिंपरी, निगडी, पुणे स्टेशन आणि जवळपास पुण्यातील सगळीकडेच पन्नास टक्के फ्लेक्स एकतर फाटले आहेत किंवा बोर्ड तुटून पडलेले आहेत. ते एक गाणे आहे ना ‘आला आला वारा संगे पावसाच्या धारा’ अगदी तसे पुण्यात घडले आहे. Continue reading

उपास

सकाळी नाष्ट्याला जातांना एका मित्राने आज संकष्टी आहे अस सांगितलं. झालं! मी आज उपास करणार अशी घोषणा मित्रांमध्ये करून टाकली. आजकाल मी कुठलाच काही विचार न करता निर्णय घेतो अस आजच्या निर्णयावरून कळायला अख्खा दिवस गेला. घोषणा केल्या केल्या मित्रांनी जणू काही फार मोठा विनोद सांगितल्यावर हसावं तस हसायला सुरवात केली. एका मित्राने तर, तुझा पापाचा घडा भरून वाहतोय. उपास केल्याने काही फरक पडणार नाही. असा शेरा देखील मारून टाकला. दुसऱ्याने तर, उपास केल्याने मुली भेटत नसतात अस देखील म्हणाला. तरीही माझा निर्णय ठाम ठेवला. आणि कॅन्टीनमध्ये शिरलो. Continue reading