टीव्ही आणि मी

दोन वर्षांपूर्वी मी मुंबईच्या एका आयटी कंपनीत रुजू झालो होतो. त्यावेळी मी माझ्या गिरगावमध्ये मावशीकडे राहायला होतो. तसा गिरगावात मी एकच महिना होतो. पण याच काळात माझ टीव्ही विषयीचे मत बनायला सुरवात झाली. कंपनीची अशी काही ठराविक वेळ नव्हती. कधीही या आणि आठ तास काम करून घरी जा. माझी कंपनी डीएन रोडवर होती. मला माझ्या मावशीचे घर ते कंपनी हे अंतर बेस्टने दहा मिनिटे आणि चालत २० मिनिटे. मी सकाळी दहाच्या सुमारास कंपनीत जायचो आणि ६:३० पर्यंत घरी यायचो. घरी आल्यावर फ्रेश होता होता सात वाजून जायचे. काय गप्पा होतील ते याच वेळेत. सात वाजले रे वाजले सगळे पहिल्या खोलीत टीव्ही समोर. मी त्यांच्याकडे पाहुणा म्हणून मी कधी काही बोलत नसायचो. त्यांचे ठरलेले कार्यक्रम सात ते दहा या वेळेत असायचे. Continue reading

Advertisements

पुन्हा कोणासाठी नोकरी शोधायची नाही

मध्यंतरी ती च्या लहान बहिणीने मला तिच्यासाठी अर्धवेळ(पार्टटाइम) नोकरी शोधायला सांगितली. खर तर मी आजकाल माझ्या स्वत:साठी नोकरी शोधात नाही. तर इतरांसाठी काय शोधणार? आणि मुख्य म्हणजे मला हे मनस्वी पटत देखील नाही. पण म्हटलं तीची बहिण आहे. तर चला बघुयात. याआधी मी कधीच कोणासाठी माझ्या बॉसशी बोललो नाही. काल कशीबशी हिम्मत करून त्याला विचारले कि, तुमच्या पाहण्यात कोणती अकौंटची पोझिशन आहे का? असेल तर मला नक्की कळवा. माझी एक मैत्रीण आहे तिला हवी आहे. आता आमची कंपनी हि आयटी कंपनी त्यामुळे तिला हवी तशी पार्टटाइम आमच्या कंपनीत मिळणे अवघड. Continue reading

इंश्योरेंस पॉलिसी

काही दिवसांपासून मला अनेक कंपन्यांचे फ़ोन येत आहेत. नाही, तस म्हणजे मला बऱ्याच आधी पासून कंपन्यांचे फ़ोन यायचे पण ते माझ्या नोकरी बद्दल असायचे. हे जे आजकाल फ़ोन येत आहे, ते इंश्योरेंस कम्पनीं कडून. प्रत्येक जन त्याची पॉलिसी किती छान आणि फायदेशीर आहे. याचे तो विश्लेषण करतो. यात तुमचा कसा आणि किती फायदा आहे याचे तो / ती साविस्तर वर्णन चालू असते. मला एक गोष्ट कळत नाही की यांना माझा मोबाइलचा क्रमांक कसा सापडतो हेच कळत नाही.  मध्यंतरी एका मुलीचा फ़ोन आला याचा इंश्योरेंस संदर्भात. Continue reading